Quick Answer
जर तुमचे केस जास्त गळत असतील, तर सर्वात आधी केसगळती होण्यामागचे मूळ कारण शोधणे गरजेचे आहे. संतुलित आहार, योग्य हेअर केअर आणि वेळेवर तज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्य उपचार सुरू केले तर केसगळती नियंत्रणात आणण्यास आणि केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते. केसगळतीकडे दुर्लक्ष केल्यास काही वेळा समस्या अधिक वाढू शकते. त्यामुळे केस गळण्याचे प्रमाण अचानक वाढले असेल किंवा केस पातळ होत असल्याचे जाणवत असेल, तर त्याकडे वेळीच लक्ष देणे महत्त्वाचे आहे.
Traya ने केलेल्या एका सविस्तर अभ्यासानुसार, ५०.३१% भारतीय पुरुषांमध्ये वयाच्या २५ वर्षांआधीच केसगळतीची समस्या सुरू होते. तर २१ वर्षांपेक्षा कमी वयाच्या २५.८९% पुरुषांमध्ये केसगळती तिसऱ्या टप्प्यावर किंवा त्यापेक्षा जास्त गंभीर प्रमाणात आढळते. म्हणूनच, तुमचे केस जास्त गळत असतील तर, ही समस्या असणारे तुम्ही एकटे नाही आहात. पण, ही समस्या नियंत्रणात आणण्यासाठी अनेक उपाय उपलब्ध आहेत. केस जास्त गळत असतील तर काय करावे आणि केसगळतीची समस्या का उद्भवते आणि केस गळणे थांबवण्याचे उपाय कोणते आहेत, याबद्दल आपण या ब्लॉगमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत..
केस गळणे कसे थांबवावे? याचा तुम्ही विचार करत असाल, तर पहिली पायरी म्हणजे त्यामागचे कारण ओळखणे. केसगळती ही ताणतणाव, चुकीचा किंवा अपुरा आहार, टाळूच्या समस्या किंवा शरीरातील एखाद्या आरोग्याशी संबंधित आजार यांमुळे होऊ शकते.
केस झपाट्याने गळत असतील, तर कोणताही उपचार लगेच सुरू करण्यापेक्षा केसगळती मागील नेमके कारण शोधणे जास्त महत्त्वाचे आहे. केसगळती होण्याचे अनेक कारणे असू शकतात. उदाहरणार्थ: ताणतणाव, शरीरातील पोषक तत्त्वांची कमतरता, कठोर रसायने असलेल्या उत्पादनांचा वापर, थायरॉईडसारखे आजार किंवा टाळू संबंधित असलेल्या समस्या. म्हणूनच, योग्य कारण समजल्यावर योग्य उपचार निवडणेही सोपे होते.
केसगळती अचानक खूप जास्त प्रमाणात वाढल्यावर अनेक जण “केस जास्त गळत असतील तर काय करावे?” याबद्दल अनेक गोष्टी शोधतात. पण, याचे योग्य उत्तर प्रत्येक व्यक्तीच्या केसगळतीमागील कारणावर अवलंबून असते.
“केस जास्त गळत असतील तर काय करावे?” याबद्दल अनेक लोक विचारतात. यासाठी सुरुवातीला काही सोप्या गोष्टींकडे लक्ष देणे फायद्याचे ठरू शकते. संतुलित आहार घेणे, टाळूची योग्य काळजी घेणे, शरीराला पुरेसे पाणी मिळेल याची काळजी घेणे आणि केसांवर कठोर रसायनांचा वापर कमी करणे. केसांना वारंवार उष्णता देणे, खूप घट्ट हेअरस्टाइल करणे किंवा केसांची अयोग्य पद्धतीने काळजी घेणे टाळणेही उपयुक्त ठरू शकते.
जर तुमचे केस जास्त गळत असतील, तर तुम्ही Traya ची Hair Test घेण्याचा विचार करू शकता. ही टेस्ट डर्मेटोलॉजिस्ट आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने विकसित केलेली आहे. ज्यामुळे केसगळतीमागील मूळ कारण ओळखण्याचा प्रयत्न केला जातो. Traya च्या माहितीनुसार, अनेक लोकांनी या टेस्टच्या मदतीने आपल्या केसगळतीच्या समस्येवर नियंत्रण मिळवले आहे.
-
फक्त २ मिनिटांत घरबसल्या टेस्ट करा
-
अचूक रिपोर्ट + मोफत कन्सल्टेशन + वैयक्तिक उपचार
-
डाएट प्लॅन आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन
आधी कारण समजून घ्या, मग योग्य उपचार निवडा!
आता जाणून घेऊया केस गळणे कमी करण्याचे उपाय कोणते आहेत आणि घरगुती पद्धतीने केस निरोगी कसे ठेवावेत.
हे सुद्धा वाचा: पातळ केस दाट करण्यासाठी टिप्स
केस जास्त गळत असतील तर काय करावे?
जर तुमचे केस जास्त प्रमाणात गळत असतील, तर सर्वात आधी आहाराकडे लक्ष देणे, केसांची योग्य काळजी घेणे आणि ताणतणाव कमी ठेवणे महत्त्वाचे आहे. नारळ किंवा आवळ्याच्या तेलाने टाळूची मालिश करणे, प्रदूषण आणि उन्हापासून केसांचे संरक्षण करणे, रसायन असलेल्या उत्पादनांचा वापर कमी करणे आणि नियमित योगासने व व्यायाम करणे यामुळे केसांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होऊ शकते.
यासोबतच मेथी आणि दह्याचा पॅक, आवळा आणि नारळ तेलाचा हेअर मास्क किंवा ॲलोव्हेरा जेल यांसारखे केस गळण्यासाठी घरगुती उपायही तुम्ही करून पाहू शकता.
१. संतुलित आहार घ्या
केसगळती होत असेल, तर आपल्या आहारात आवश्यक असलेली पोषक तत्त्वे पुरेशा प्रमाणात आहेत की नाही, याकडे लक्ष द्या. व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई यांसारख्या पोषक तत्त्वांची कमतरता असेल तर केसांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे डाळी, अंडी, ॲव्होकॅडो, रताळे, हिरव्या पालेभाज्या, गाजर आणि मासे यांसारख्या पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश करा.
जर तुम्हाला “केस खूप जास्त प्रमाणात गळताय.” ही चिंता असेल, तर सुरुवात म्हणून प्रोटीन, आयरन, बायोटिन आणि झिंक यांचा आहारात पुरेसा समावेश करण्याकडे लक्ष द्या. शरीराला आवश्यक पोषक तत्त्वे नियमितपणे मिळाल्याने केसांच्या वाढीसाठी आणि त्यांच्या एकूण आरोग्यासाठी मदत होऊ शकते. मात्र, कोणत्याही पोषक तत्त्वाची कमतरता आहे असे वाटत असल्यास स्वतःहून सप्लिमेंट्स घेण्याऐवजी तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरते.
-
बायोटिन आणि व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी व व्हिटॅमिन ई केसांना मजबूत करण्यासाठी आणि त्यांच्या वाढीसाठी महत्त्वाचे असतात.
-
प्रोटीन हा केसांच्या रचनेमधील एक महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे आहारात प्रोटीन असलेल्या पदार्थांचा समावेश करा.
-
आयरन आणि झिंक यांसारखी पोषक तत्त्वेही केसांच्या आरोग्यासाठी महत्त्वाची आहेत. त्यामुळे आहारात कडधान्ये, बिया, हिरव्या पालेभाज्या आणि इतर पौष्टिक पदार्थांचा समावेश करण्याचा प्रयत्न करा.
-
Hair Ras टॅब्लेटमध्ये भृंगराज, शतावरी, अर्जुन आणि आवळा यांसारख्या घटकांचा समावेश आहे, जे केसांच्या आरोग्यासाठी उपयोगी ठरू शकतात.
-
संतुलित आहारासोबत पुरेसे पाणी पिणे आणि नियमित वेळेत पौष्टिक आहार घेणेही महत्त्वाचे आहे. यामुळे शरीराला आवश्यक पोषक तत्त्वे मिळण्यास मदत होते.
२. केसांसाठी फायदेशीर असलेल्या तेलाने टाळूची मालिश करा
टाळू कोरडा आणि कमजोर झाला असेल केसगळतीचा त्रास जास्त वाढू शकतो. केसांसाठी फायदेशीर असलेल्या तेलाने टाळूची मालिश केली, तर टाळूमधील रक्ताचा प्रवाह सुधारण्यास आणि केसांच्या मुळांना पोषण मिळण्यास मदत होऊ शकते. आठवड्यातून कमीतकमी तीन वेळा Traya Nourish Hair Oil ने टाळूची मालिश करा.
“केसगळती थांबवण्यासाठी सर्वात चांगले तेल कोणते?” हा विचार जर तुम्ही करत असाल, तर फक्त केसांना वरून चमक देणारे तेल न निवडता टाळूला पोषण देणारे आणि केसांच्या मुळांना आधार देणारे तेल निवडा.
-
रात्री झोपण्याच्या जवळजवळ एक तास आधी तेल लावा आणि सकाळी शॅम्पू करा.
-
यामुळे टाळूला ओलावा आणि पोषण मिळण्यास मदत होते, ज्यामुळे केस मजबूत राहण्यास मदत होऊ शकते.
-
रतनजोत, आवळा आणि भृंगराज यांसारखे आयुर्वेदिक घटक केसांचे आरोग्य टिकवून ठेवण्यास मदत करू शकतात.
हे सुद्धा वाचा: केसगळती टाळण्यासाठी काय खावे?
३. ताणतणाव नियंत्रित ठेवा
National Institute of Health च्या माहितीनुसार, जास्त ताण आणि अपुरी झोप यामुळे केसगळती वाढू शकते. तणावामुळे शरीरातील काही हार्मोन्सच्या पातळीत बदल होतात, ज्याचा परिणाम केसांच्या मुळांवर होऊ शकतो आणि केस कमकुवत होऊ शकतात. त्यामुळे दररोज योगा आणि मेडिटेशन करा. तसेच, कमीतकमी ७ ते ८ तासांची पुरेशी झोप घ्या.
“केस खूप गळत असतील तर काय केले पाहिजे?” हा खूप सामान्य प्रश्न आहे. तर त्यासाठी चांगली झोप, ताणतणावावर नियंत्रण आणि रोजची योग्य दिनचर्या या गोष्टींकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.
-
सकाळी थोडे चालायला जा आणि मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.
-
ताणतणाव कमी करण्यासाठी मेडिटेशन आणि दीर्घ श्वास घेण्याचा सराव करा.
-
Calm Ras टॅब्लेट मन शांत ठेवण्यास आणि चांगली झोप लागण्यास मदत करू शकते.
४. आयरन आणि फोलेट असलेला आहार घ्या
काही संशोधनांनुसार, ॲनिमिया हे केसगळतीचे एक कारण असू शकते. विशेषतः ॲनिमियामध्ये महिलांच्या शरीरातील हिमोग्लोबिन आणि लाल रक्तपेशींची संख्या कमी होते. त्यामुळे टाळू आणि केसांच्या मुळांपर्यंत पुरेसा ऑक्सिजन आणि पोषण पोहचण्यास अडथळा येऊ शकतो.
-
कमकुवत केसांची मुळे लवकर गळू शकतात, ज्यामुळे केस पातळ आणि कमजोर होऊ शकतात.
-
पालक, डाळिंब, बीट, सोयाबीन आणि डाळी यांसारख्या पदार्थांमध्ये आयरन आणि फोलेट असते.
-
Iron Santulan सप्लिमेंट शरीरातील आयरनची कमतरता भरून काढण्यास मदत करू शकते.
५. केमिकल फ्री हेअर केअर उत्पादने वापरा
रसायन असलेला शॅम्पू आणि इतर हेअर केअर उत्पादनांचा अतिवापर केसांना कोरडे आणि कमजोर करू शकतो. सल्फेट्स, पॅराबेन्स आणि ट्रायक्लोसन यांसारख्या घटकांमुळे काही लोकांच्या टाळूला त्रास होऊ शकतो.
-
रसायनयुक्त उत्पादनांमुळे केस कोरडे होऊन तुटण्याची शक्यता वाढू शकते.
-
टाळूसाठी सौम्य आणि हर्बल उत्पादने निवडा, जे टाळूला नुकसान पोहचवणार नाहीत.
-
Traya चे १००% केमिकल फ्री उत्पादने केस गळतीची समस्या मुळापासून संपवण्यासाठी मदत करू शकतात.
हे सुद्धा वाचा: कमी वयात केसगळती का होते?
६. भरपूर पाणी प्या
पुरेसे पाणी प्या
शरीराला पुरेसे पाणी मिळणे केसांच्या आरोग्यासाठीही गरजेचे आहे. शरीरात पाण्याची कमतरता झाली तर केस कोरडे आणि कमजोर होऊन तुटण्याची शक्यता वाढू शकते. Kentico च्या माहितीनुसार, कमी पाणी पिणे किंवा खराब पाणी पिल्यामुळे केसांची मुळे कमकुवत होऊ शकतात, ज्यामुळे केस तुटू लागतात.
त्यामुळे “केस खूप जास्त प्रमाणात गळताय.” याचा विचार तुम्ही करत असाल, तर सर्वात आधी पुरेसे पाणी पिण्याकडे सुद्धा दुर्लक्ष करू नका. शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे केस जास्त कोरडे, कमजोर होऊन तुटण्याचे प्रमाण वाढू शकते.
७. आठवड्यातून कमीतकमी दोनदा केस धुवा
केस खूप प्रमाणात गळत असतील, तर टाळू स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे केसांच्या आणि टाळूच्या प्रकारानुसार आठवड्यातून कमीतकमी दोनदा केस धुवा. यामुळे केसांना ओलावा मिळतो, पोषण मिळते आणि टाळू स्वच्छ राहतो. पण, रसायन असलेल्या शॅम्पूमुळे केसांना नुकसान होऊ शकते, त्यामुळे योग्य उत्पादनाची निवड करा.
“केसगळती कशी थांबवावी?” असा प्रश्न जेव्हा लोक विचारतात, तेव्हा सौम्य शॅम्पू वापरणे आणि टाळू स्वच्छ ठेवणे हे तेल लावण्याइतकेच महत्त्वाचे ठरू शकते.
-
केसांना पुरेसे हायड्रेशन आणि पोषण मिळते.
-
टाळूवरील धूळ, घाण आणि अतिरिक्त तेल स्वच्छ होते.
-
केस मजबूत होतात आणि केसगळती कमी होते.
-
केमिकल फ्री Mild Defence Shampoo वापरू शकता.
८. केसांना जास्त उष्णतेपासून वाचवा
गरम पाणी आणि हीट स्टायलिंगमुळे केसांचे नुकसान होऊ शकते. जास्त तापमानामुळे केसांमधील ओलावा कमी होतो. यामुळेच केस जास्त कोरडे, कमजोर होऊन तुटण्याचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे केसांना उष्णतेपासून वाचवणे गरजेचे आहे.
अनेकदा केसगळती ही एकाच कारणामुळे होत नाही. तर पोषणाची कमतरता, टाळूच्या समस्या, उष्णतेमुळे होणारे नुकसान आणि रोजच्या जीवनशैलीतील सवयी यांचा एकत्रित परिणाम केसांच्या आरोग्यावर होऊ शकतो.
विशेषतः हेअर ड्रायर, स्ट्रेटनर किंवा कर्लर यांसारख्या केसांना उष्णता देणाऱ्या साधनांचा कमीत कमी वापर करणे किंवा वापर न करणे फायद्याचे ठरू शकते. कारण यामुळे हळूहळू केस कमकुवत होत जातात आणि केसगळती कधी सुरू होते, हे कळत सुद्धा नाही.
-
केस गरम पाण्याने धुवू नका.
-
हीट स्टायलिंग टूल्सचा कमीत कमी वापर करा.
-
कडक उन्हात बाहेर जाताना टोपी किंवा स्कार्फचा वापर करा.
-
जास्त उष्णतेमुळे केसांच्या प्रोटीन रचनेचे नुकसान होऊ शकते.
हे सुद्धा वाचा: केसगळती कशी थांबवावी?
९. केसांची योग्य काळजी घ्या
केस निरोगी ठेवण्यासाठी त्यांची योग्य पद्धतीने काळजी घेणे गरजेचे आहे. चुकीच्या पद्धतीने केस विंचरणे, केस खूप घट्ट बांधणे किंवा केस नियमित न कापल्याने केस कमजोर होऊ शकतात. University of Virginia च्या माहितीनुसार, केसांची योग्य काळजी घेणे हे केसांचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाचे आहे.
-
मोठ्या दातांचा कंगवा वापरा.
-
ओले केस असतील तर ते हळुवारपणे सोडवा.
-
केस खूप घट्ट बांधू नका आणि टाळूवर अनावश्यक ताण येणार नाही याची काळजी घ्या.
-
साधारण ६ ते १२ आठवड्यांनी केस कापा.
१०. आवश्यक असलेल्या सप्लिमेंट्स घ्या
आहारातून शरीराला आवश्यक असलेली पोषक तत्त्वे पुरेशा प्रमाणात मिळत नसतील, तर काही वेळा सप्लिमेंट्सची मदत होऊ शकते. बायोटिन, आयरन, व्हिटॅमिन D3 आणि ओमेगा-3 फॅटी ॲसिड्स केसांच्या आरोग्यासाठी मदत करू शकतात. Harvard Health च्या माहितीनुसार, पोषक तत्त्वांची कमतरता असेल तर खालील सप्लिमेंट्सचा विचार केला जाऊ शकतो:
-
बायोटिन केसांच्या वाढीसाठी आवश्यक पोषक तत्त्वांपैकी एक आहे.
-
आयरनची कमतरता केसगळतीचे एक कारण असू शकते. कमतरता आढळल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट घेता येऊ शकते.
-
व्हिटॅमिन D3 केसांच्या मुळांसह टाळूच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.
-
ओमेगा-3 फॅटी ॲसिड्स केसांचे आरोग्य आणि मजबुती टिकवून ठेवण्यास मदत करू शकतात.
-
केसांच्या संपूर्ण आरोग्यासाठी Hair Vitamin घेण्याचा विचार करू शकता.
हे सुद्धा वाचा: केसगळती टाळण्यासाठी काय खावे?
Traya कशी मदत करू शकते?
जर तुमचे केस जास्त प्रमाणात गळत असतील, तर लगेच कोणताही उपचार सुरू करण्याऐवजी सर्वात आधी केसगळतीमागचे मूळ कारण समजून घेणे गरजेचे आहे. हे कारण शोधण्यासाठी Traya तुम्हाला मदत करू शकते. Traya च्या मोफत Hair Test द्वारे अनेक लोकांनी त्यांच्या केसांच्या समस्येमागील शक्य असलेली कारणे समजून घेतली आहेत आणि त्यानुसार योग्य उपचार घेण्यास सुरुवात केली आहे. ही टेस्ट मोफत असून घरबसल्या देता येते आणि ती पूर्ण करण्यासाठी साधारण २ ते ३ मिनिटे लागतात. ह्या टेस्टच्या मदतीने तुम्ही केस गळतीमागील मूळ कारण जाणून घेऊ शकता.
जर टेस्ट बद्दल बोलायचं झालं, तर ही फक्त एक साधी टेस्ट नाहीये. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि तज्ज्ञ डर्मेटोलॉजिस्ट यांच्या मदतीने ही टेस्ट विकसित करण्यात आली आहे. टेस्ट पूर्ण केल्यानंतर काही मिनिटांत तुम्हाला तुमचा Hair Test Report मिळतो. या रिपोर्टमध्ये तुमच्या केसांच्या समस्येसोबतच त्यावर काय उपाय करता येतील, याचीही माहिती दिली जाते. म्हणून उशीर न करता आजच मोफत Hair Test करा आणि केसगळतीचे कारण समजून घेण्याच्या दिशेने पहिले पाऊल उचला.
जास्त प्रमाणात केस गळण्यावर घरगुती उपाय
जर तुमचे केस जास्त प्रमाणात गळत असतील, तर तुम्ही काही घरगुती उपाय करून पाहू शकता. पण, केसगळतीचे मूळ कारण समजून घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. कारण कळाले नाही, तर घरगुती उपायांचा अपेक्षित असलेला परिणाम मिळेलच असे नाही. उदाहरणार्थ, जर केसगळती ॲनिमिया किंवा रसायन असलेले उत्पादन वापरल्यामुळे होत असेल, तर केसांना अंडे, तेल, दही किंवा ॲव्होकॅडो कितीही लावले तरी त्याचा फारसा फायदा होणार नाही.
कारण समजून न घेता कोणताही उपचार केल्याने नुकसान होऊ शकते. त्यामुळे सर्वात आधी Free Hair Test घेण्याचा सल्ला दिला जातो. या टेस्टच्या मदतीने केसगळतीमागील शक्य असलेली कारणे समजून घेता येतात आणि त्यानुसार पुढील उपचार ठरवता येतात.
१. आवळ्याच्या तेलाने केसांची मालिश करा
जर तुमचे केस जास्त प्रमाणात गळत असतील, तर आठवड्यातून तीन वेळा आवळा किंवा नारळाच्या तेलाने टाळूची हलक्या हाताने मालिश करण्यास सुरुवात करू शकता. आवळा आणि नारळ या दोन्हींमध्ये केसांच्या आरोग्यासाठी उपयोगी असलेले घटक असतात. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असते, जे एक अँटिऑक्सिडंट असून केसांच्या मुळांना ऑक्सिडेटिव्ह नुकसानापासून संरक्षण मिळण्यास मदत करू शकते.
“केसगळती थांबवण्यासाठी सर्वात चांगले तेल कोणते?” असा प्रश्न पडत असेल, तर आवळ्यावर आधारित किंवा पोषण देणारे स्कॅल्प ऑइल हा एक पर्याय असू शकतो. अशा तेलांमुळे टाळूला ओलावा मिळण्यास आणि केसांच्या मुळांना आधार मिळण्यास मदत होऊ शकते.
आवळ्यामध्ये आयरन आणि फॅटी ॲसिड्ससारखे इतर पोषक घटक सुद्धा असतात, जे केसांच्या आरोग्यासाठी उपयोगी ठरू शकतात. याशिवाय काही अभ्यासांनुसार, आवळा पुरुषांमधील केसगळतीशी संबंधित 5-अल्फा रिडक्टेस या एन्झाइमच्या क्रियेला रोखण्यास मदत करू शकतो.
ScienceDirect मध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार, आवळ्याच्या सिरपचा महिलांमधील अँड्रोजेनेटिक केसगळतीवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. तसेच, केसांच्या वाढीचा सक्रिय टप्पा म्हणजेच ‘ॲनाजेन फेज’ जास्त काळ टिकवून ठेवण्यासही मदत होऊ शकते.
हे सुद्धा वाचा: केसांची वाढ कशी वाढवावी?
२. मेथीच्या दाण्यांची पेस्ट केसांना लावा
केस खूप गळत असतील, तर मेथीच्या दाण्यांची पेस्ट करून केसांना आणि टाळूला लावावी. मेथीच्या दाण्यांमध्ये प्रोटीन भरपूर असतात, जे केसांसाठी बिल्डिंग ब्लॉक म्हणून काम करू शकतात. प्रोटीन हे केसांच्या रचनेसाठी आवश्यक घटक आहेत. त्यामुळे मेथीतील प्रोटीन केसांच्या मुळांना मजबूत ठेवण्यास आणि केसांच्या वाढीस मदत करू शकतात.
सोबतच काही अभ्यासांनुसार, मेथीच्या दाण्यांची पेस्ट लावल्याने टाळूतील रक्ताचा प्रवाह सुधारण्यास मदत होऊ शकते. रक्ताचा प्रवाह वाढल्यास केसांच्या मुळांपर्यंत पोषक तत्त्वे पोहोचण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे केसांची वाढ आणि मजबुती टिकवून ठेवण्यास मदत मिळू शकते.
मेथीची पेस्ट तयार करण्यासाठी मेथीचे दाणे काही तास पाण्यात भिजवून त्याची बारीक पेस्ट करा. ही पेस्ट टाळूवर आणि केसांच्या मुळांवर हलक्या हाताने लावा. काही वेळ ठेवून नंतर सौम्य शॅम्पूने केस धुवू शकता. मात्र, टाळू संवेदनशील असल्यास किंवा पेस्ट लावल्यानंतर खाज, जळजळ किंवा लालसरपणा जाणवत असल्यास त्याचा वापर थांबवा.
३. ॲलोव्हेरा जेल वापरा
केसगळतीसोबतच टाळूला खाज किंवा कोरडेपणा जाणवत असेल, तर केसांना ॲलोव्हेरा जेलचा वापर करू शकता. काही अभ्यासांनुसार, ॲलोव्हेरामध्ये जळजळ कमी करणारे आणि मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात.
ॲलोव्हेरा टाळूला शांत करण्यास आणि केस गळणे कमी करण्यासाठी मदत करू शकते. तसेच कोरडेपणा आणि खाज कमी करण्यास मदत होऊ शकते. निरोगी टाळू हा केसांच्या चांगल्या वाढीसाठी महत्त्वाचा असतो. त्यामुळे टाळूची स्वच्छता आणि योग्य काळजी घेण्यासोबत ॲलोव्हेराचा वापर केला जाऊ शकतो.
आठवड्यातून साधारण तीन वेळा ॲलोव्हेराचा वापर करू शकता. जेल टाळूवर हलक्या हाताने लावून काही वेळ ठेवता येते आणि त्यानंतर केस धुवू शकता. मात्र, प्रत्येकाच्या टाळूची संवेदनशीलता वेगळी असते. त्यामुळे प्रथम थोड्या भागावर वापर करून पाहणे योग्य ठरू शकते.
हे सुद्धा वाचा: केसगळती थांबवण्यासाठी घरगुती उपाय
४. कडुनिंब सुद्धा उपयोगी ठरू शकतो
कडुनिंबाच्या तेलामध्ये बॅक्टेरियाविरोधी आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. त्यामुळे कोंडा किंवा बुरशीजन्य संसर्गासारख्या टाळूच्या समस्यांमुळे केसगळती होत असेल, तर कडुनिंब काही प्रमाणात मदत करू शकतो. कोंडामुक्त आणि निरोगी टाळू केसांच्या वाढीसाठी चांगले वातावरण देऊ शकतो.
सोबतच, कडुनिंबामध्ये जळजळ कमी करणारे गुणधर्मही असतात. त्यामुळे खाज किंवा जळजळ होत असलेल्या टाळूला आराम मिळण्यास मदत होऊ शकते. टाळूवरील जळजळ सुद्धा कधी कधी केसगळतीचे कारण ठरू शकते. त्यामुळे केसगळतीसोबत टाळूशी संबंधित समस्या जाणवत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष न करता योग्य काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
कडुनिंबाचे कोणतेही उत्पादन थेट टाळूवर वापरण्यापूर्वी त्यातील घटक आणि आपल्या त्वचेला ते योग्य आहेत का, हे तपासा. संवेदनशील टाळू असल्यास प्रथम थोड्या भागावर वापर करून पाहणे चांगले. कोंडा, खाज किंवा जळजळ सतत होत असल्यास घरगुती उपायांवर अवलंबून न राहता तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरू शकते.
५. केसांना दही लावा
दही प्रोटीनचा चांगला स्रोत आहे. प्रोटीन केसांच्या रचनेसाठी आवश्यक असतात आणि केसांच्या मुळांना मजबूत करण्यास मदत करू शकतात. त्यामुळे दह्याचा आहारात समावेश करणे केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
दह्याचा आहारात समावेश करणे सुद्धा फायदेशीर ठरू शकते, कारण काही प्रकारच्या दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात. हे जिवंत चांगले बॅक्टेरिया असतात, जे आतड्यांच्या आरोग्यासाठी उपयोगी ठरू शकतात. आतडे आणि केसांचे आरोग्य यांच्यातील संबंधावर अजूनही संशोधन सुरू आहे; पण काही अभ्यासांमध्ये निरोगी गट मायक्रोबायोम आणि एकूण केसांच्या आरोग्यामधील संबंध दिसून आला आहे.
दही थेट केसांना लावण्याची पद्धत काही लोक वापरतात, मात्र त्याचा केसगळतीवर थेट उपचार म्हणून ठोस पुरावा मर्यादित आहे. त्यामुळे दह्याचा मुख्य फायदा आहारातून मिळणाऱ्या पोषणाच्या दृष्टीने पाहणे अधिक योग्य ठरते. केसगळती जास्त प्रमाणात होत असल्यास केवळ घरगुती उपायांवर अवलंबून न राहता त्यामागचे कारण शोधणे महत्त्वाचे आहे.
हे सुद्धा वाचा: नवीन केस येण्यासाठी उपाय
६. कांद्याचा रस केसांसाठी फायदेशीर आहे
कांद्याचा रस टाळूवर लावल्याने केसांच्या मुळांना मजबुती मिळण्यास आणि टाळूतील रक्ताचा प्रवाह सुधारण्यास मदत होऊ शकते, ज्यामुळे नवीन केस येण्यास मदत होऊ शकते. कांद्यामध्ये सल्फर असते, जे केसांना पोषण देऊन त्यांना तुटण्यापासून वाचवण्यास मदत करू शकते.
कांद्याचा रस काढून तो टाळूवर हलक्या हाताने लावा आणि सुमारे ३० मिनिटांनंतर केस धुवा. चांगल्या परिणामांसाठी आठवड्यातून दोन वेळा वापरून पाहू शकता. मात्र, कांद्याचा रस प्रत्येकाच्या टाळूला अनुकूल असेलच असे नाही. त्याचा वापर केल्यानंतर जळजळ, लालसरपणा किंवा खाज जाणवत असल्यास लगेच केस धुवून वापर थांबवणे योग्य ठरते.
कांद्याचा रस वापरण्यापूर्वी थोड्या भागावर पॅच टेस्ट करून पाहणेही चांगले. तसेच केसगळतीचे कारण आनुवंशिकता, हार्मोन्स किंवा इतर आरोग्याशी संबंधित समस्या असेल, तर कांद्याचा रस हा त्या मूळ कारणावर उपचार करू शकत नाही.
७. नारळ तेल आणि कढीपत्त्याचे मिश्रण
नारळाचे तेल केसांमध्ये ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते. तर कढीपत्त्यामध्ये असलेले बीटा-कॅरोटीन आणि प्रोटीन केस गळण्याचे प्रमाण कमी करण्यास मदत करू शकतात. हे मिश्रण केसांच्या मुळांना मजबूत करण्यासाठी आणि केसांची योग्य काळजी घेण्यासाठी उपयोगी ठरू शकते.
कढीपत्त्याची पाने नारळाच्या तेलात उकळवा आणि तेल थंड झाल्यानंतर त्याने टाळूची हलक्या हाताने मालिश करा. ते काही तास किंवा रात्रभर केसांवर ठेवून सकाळी माइल्ड शॅम्पूने केस धुवा. टाळूची मालिश करताना खूप जोराने घासणे टाळा, कारण त्यामुळे केस तुटण्याची किंवा टाळूला त्रास होण्याची शक्यता असते.
नारळ तेलामुळे केसांमध्ये ओलावा टिकून राहण्यास आणि कोरडेपणा कमी होण्यास मदत होऊ शकते. मात्र, या मिश्रणामुळे केसगळतीचे मूळ कारण दूर होईलच असे नाही. त्यामुळे केसगळती सातत्याने वाढत असल्यास इतर संभाव्य कारणांकडेही लक्ष देणे आवश्यक आहे.
८. ग्रीन टीने टाळूची मालिश करा
ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात, जे केसांच्या आरोग्यासाठी काही प्रमाणात उपयुक्त ठरू शकतात. ग्रीन टी कोंडा कमी करण्यासाठी सुद्धा काही प्रमाणात उपयोगी ठरू शकते.
गरम पाण्यात ग्रीन टीची बॅग काही मिनिटे ठेवून ती थंड होऊ द्या. त्यानंतर या पाण्याने टाळूची हलक्या हाताने मालिश करा आणि सुमारे ३० मिनिटांनंतर केस धुवा. याचा वापर करताना टाळूवर जास्त घासणे किंवा खूप गरम पाणी वापरणे टाळा.
ग्रीन टी केसगळती थांबवण्यासाठी किंवा नवीन केस उगवण्यासाठी निश्चित उपचार आहे, असे म्हणता येत नाही. केसगळतीचे प्रमाण जास्त असेल, टाळूवर खाज किंवा जळजळ असेल किंवा केस अचानक मोठ्या प्रमाणात गळू लागले असतील, तर योग्य कारण शोधण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे अधिक महत्त्वाचे आहे.
हे सुद्धा वाचा: केस लांब आणि निरोगी ठेवण्यासाठी सर्वोत्तम तेल आणि शॅम्पू
केस जास्त प्रमाणात गळण्याची कारणे कोणती असतात?
केस जास्त प्रमाणात गळण्यामागे खूप कारणे असू शकतात. ताणतणाव, शरीरातील पोषक तत्त्वांची कमतरता, ॲनिमिया, टाळूचे अस्वास्थ्य, हीट स्टायलिंग टूल्सचा वापर, रसायनयुक्त उत्पादनांचा अतिवापर, कोंडा, हार्मोन्समधील बदल, काही आजार, वाढते वय, आनुवंशिकता, प्रदूषण, केसांची योग्य काळजी न घेणे आणि थायरॉईडच्या समस्या यांसारख्या कारणांमुळे केसगळती वाढू शकते. काही वेळा एकापेक्षा जास्त कारणे एकाच वेळी केसगळतीस कारणीभूत ठरू शकतात.
केसगळती कशी थांबवावी? हे समजून घेण्यासाठी सर्वात आधी केसगळती नेमकी कशामुळे होत आहे, हे जाणून घेणे गरजेचे आहे. ती तात्पुरती केसगळती आहे की हार्मोन्समधील बदलांमुळे होत आहे, थायरॉईडशी संबंधित आहे की टाळूवर जळजळ किंवा इतर समस्या आहेत, हे समजणे महत्त्वाचे आहे. केसगळतीचा प्रकार आणि त्यामागचे कारण समजल्यास पुढील उपचारांची दिशा ठरवणे अधिक सोपे होऊ शकते.
जास्त प्रमाणात केस गळण्यामागे २० पेक्षा जास्त कारणे असू शकतात. त्यामुळे नेमके कारण समजून न घेता उपचार सुरू केले तर हवा तसा फायदा मिळेलच असे नाही. म्हणूनच, योग्य तपासणीशिवाय थेट उपचार सुरू करण्यापेक्षा आधी केसगळतीमागचे कारण शोधणे जास्त योग्य ठरते. कारण प्रत्येक व्यक्तीची केसगळतीची समस्या वेगळी असू शकते आणि त्यानुसार उपायही वेगळे असू शकतात.
-
मोफत Hair Test घ्या – फक्त २ मिनिटांत, घरबसल्या स्मार्टफोनवरून.
-
केसगळतीचे संभाव्य कारण समजून घ्या आणि त्यानुसार योग्य उपचार निवडण्याबाबत मार्गदर्शन मिळवा.
-
केसगळतीकडे दुर्लक्ष करू नका – समस्या सतत वाढत असल्यास योग्य वेळी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
आधी कारण समजून घ्या, मग योग्य उपचार निवडा!
कोणत्या पोषक तत्त्वांच्या कमतरतेमुळे केस जास्त गळतात?
कोणत्या पोषक तत्त्वांच्या कमतरतेमुळे केस जास्त गळतात?
केसगळतीमागील एक महत्त्वाचे कारण म्हणजे पोषक तत्त्वांची कमतरता असते. विशेषतः बायोटिन, आयरन, झिंक, व्हिटॅमिन D, प्रोटीन आणि ओमेगा-3 फॅटी ॲसिड्स यांची कमतरता असेल तर केस कमजोर होऊन जास्त गळू शकतात. जेव्हा शरीराला ही आवश्यक पोषक तत्त्वे पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत, तेव्हा केसांची वाढ मंदावू शकते आणि केस वेळेआधीच गळू लागतात.
केस जास्त प्रमाणात गळत असतील, तर संतुलित आहार आणि योग्य पोषणाकडे लक्ष देणे खूप महत्त्वाचे आहे. आहारात हिरव्या पालेभाज्या, कडधान्ये, नट्स, अंडी, मासे आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करा. सोबतच शरीरात एखाद्या पोषक तत्त्वाची कमतरता असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हिटॅमिन आणि मिनरल सप्लिमेंट्स घेण्याचा विचार करता येऊ शकतो.
“केस गळणे कसे थांबवावे?” हा प्रश्न लोक नेहमीच विचारता. पण आयरन, प्रोटीन, बायोटिन आणि इतर आवश्यक पोषक तत्त्वांची कमतरता असेल तर ती भरून काढणे हे सर्वात आधी गरजेचे आहे.
हे सुद्धा वाचा: केसांचे सौंदर्य कसे वाढवावे?
केस जास्त प्रमाणात गळतात म्हणजे नेमकं काय होतं?
तुम्ही कधी विचार केला आहे का की, केस खूप जास्त गळतात म्हणजे नेमके किती केस गळतात? दिवसाला किती केस गळाल्यानंतर चिंता करण्याची गरज आहे? सामान्यपणे दररोज थोडे केस गळणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण, केसगळतीचे प्रमाण वाढले किंवा केसांच्या घनतेमध्ये बदल जाणवू लागला, तर त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. खूप वेळा सामान्य केसगळती पाहूनही लोक घाबरतात आणि वेगवेगळी उत्पादने वापरायला सुरुवात करतात. चुकीची उत्पादने किंवा त्यांचा अतिवापर केस आणि टाळूसाठी नुकसानकारक ठरू शकतो. खालील तक्त्याच्या मदतीने सामान्य आणि गंभीर केसगळतीमधील फरक समजून घेऊया:
|
सामान्य केसगळती |
चिंताजनक केसगळती |
गंभीर केसगळती |
|
दिवसाला ५०–१०० केस गळणे |
दिवसाला १००–१५० केस गळणे |
दिवसाला १५० पेक्षा जास्त केस गळणे |
|
केस विंचरताना किंवा आंघोळीनंतर काही केस गळणे |
उशीवर जास्त प्रमाणात केस दिसणे |
हातात केसांचे गुच्छ येणे |
|
केसांच्या जाडीमध्ये विशेष फरक जाणवत नाही |
केस पातळ होत असल्याचे जाणवते |
टाळू स्पष्ट दिसू लागतो किंवा टक्कल पडलेले दिसते |
|
गळालेले केस हळूहळू पुन्हा वाढत राहतात |
कपाळाच्या वरील केसांची रेषा मागे सरकते |
केसांची मुळे कमजोर होतात किंवा केस तुटतात |
|
काय करावे: संतुलित आहार घ्या, ताणतणाव कमी करा आणि पुरेसे पाणी प्या. |
काय करावे: Hair Test द्या, आवश्यक असल्यास रक्ताची तपासणी करा आणि योग्य शॅम्पू वापरा. |
काय करावे: तातडीने Hair Test करा, त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि गरजेनुसार उपचार सुरू करा. |
काळजी कधी करावी?
तुमचे केस फक्त गळतच नाहीत, तर त्यासोबत इतर काही लक्षणे सुद्धा दिसत असतील, तर त्याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, केसगळतीसोबत टाळूला तीव्र खाज, जळजळ, वेदना, लालसरपणा, त्वचा सोलणे, जखमा किंवा फोड येत असतील, तर तत्काळ तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
केस जास्त प्रमाणात गळत असतील तर काय करावे? हा विचार वारंवार येत असेल, तर फक्त घरगुती उपायांवर अवलंबून राहू नका. केसगळतीसोबतच टाळूला खाज येणे, ठराविक ठिकाणी केसांचे पॅच तयार होणे किंवा अचानक केस पातळ होणे यांसारखी लक्षणे दिसत असतील, तर वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे असू शकते.
याशिवाय, केस गोलाकार पॅचच्या स्वरूपात गळत असतील (ॲलोपेशिया एरियाटा), अचानक जास्त प्रमाणात केस गळत असतील किंवा डोक्याच्या एखाद्या भागातील केस जास्त प्रमाणात कमी होत असतील, तर ही सामान्य केसगळती मानली जात नाही.
केसगळतीसोबतच केस स्पष्टपणे पातळ दिसणे, हेअरलाइन मागे जाणे, टाळूवर जळजळ होणे किंवा केसांचे गुच्छ गळणे अशी लक्षणे दिसत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
सोबतच केसांच्या पोतामध्येही अचानक बदल झाला असेल, उदाहरणार्थ केस खूप पातळ, कोरडे किंवा निस्तेज झाले असतील आणि हा बदल काही आठवड्यांतच जाणवू लागला असेल, तर त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. केसगळती सुरू होण्याआधी टाळूला टोचल्यासारखे वाटणे किंवा जळजळ होणे हे देखील गंभीर संकेत असू शकतात.
तसेच, केसगळतीसोबत शरीरात इतरही काही बदल जाणवत असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. उदाहरणार्थ:
-
सतत खूप जास्त थकवा जाणवणे
-
वजन अचानक वाढणे किंवा कमी होणे
-
नेहमीपेक्षा जास्त थंडी वाजणे
-
त्वचा खूप कोरडी होणे
(ही थायरॉईडशी संबंधित लक्षणे असू शकतात)
-
मासिक पाळी अनियमित होणे
-
चेहऱ्यावर अनावश्यक केस वाढणे
(हे PCOS चे लक्षण असू शकते)
-
सतत ताप येणे किंवा अशक्तपणा जाणवणे
(ॲनिमिया किंवा इतर आरोग्य समस्यांशी याचा संबंध असू शकतो)
तुमची आताच कोणतीही मोठी शस्त्रक्रिया झाली असेल किंवा तुम्हाला गंभीर संसर्ग किंवा दीर्घकाळ आजार झाला असेल आणि त्यानंतर २–३ महिन्यांनी केस अचानक जास्त प्रमाणात गळू लागले असतील, तर हे ‘टेलोजन एफ्लुवियम’ असू शकते. अशा परिस्थितीत वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्यक आहे. तसेच, कुटुंबात कोणाला ऑटोइम्यून आजार, थायरॉईडची समस्या किंवा गंभीर केसगळतीची समस्या असेल, तर जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. अशावेळी Traya ची मोफत Hair Test करून केसगळतीमागील शक्य असलेले कारण समजून घेणे आणि योग्य वेळी योग्य उपचार घेणे उपयोगी ठरू शकते.
केस खूप गळत असतील तर काय खावे?
केस जास्त प्रमाणात गळत असतील, तर त्यामागचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे शरीरातील पोषक तत्त्वांची कमतरता असू शकते. संतुलित आहार न घेतल्यास केस कमजोर होऊन गळू लागतात. शरीरातील अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सची कमतरता थेट किंवा अप्रत्यक्षपणे केसगळतीसाठी कारणीभूत ठरू शकते.
केसांसाठी काय खावे?
खालील पोषक तत्त्वांनी समृद्ध पदार्थांचा आहारात समावेश करा:
-
प्रोटीन: अंडी, मासे, डाळी
-
बायोटिन: अक्रोड, बदाम, मोड आलेले हरभरे
-
आयरन: लाल मांस, हिरव्या पालेभाज्या
-
व्हिटॅमिन A: रताळे, गाजर
-
झिंक: भोपळ्याच्या बिया, ॲव्होकॅडो
हे पदार्थ नियमितपणे खाल्याने केसगळती कमी होण्यास आणि केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते.
केस जास्त प्रमाणात गळत असतील तर कोणता शॅम्पू वापरावा?
जर तुमचे केस जास्त प्रमाणात गळत असतील, तर तुम्ही Traya Defence Shampoo वापरण्याचा विचार करू शकता. हा शॅम्पू टाळू स्वच्छ ठेवण्यासोबतच केसांच्या मुळांना आवश्यक पोषण देऊन त्यांना मजबूत ठेवण्यास मदत करतो. या शॅम्पूमध्ये बायोटिन आणि अनाजेनसारखे घटक आहेत, जे केस आणि टाळू स्वच्छ ठेवण्यासोबतच केसांचा लवचिकपणा टिकवून ठेवण्यास आणि केस तुटणे कमी करण्यास मदत करतात.
या सौम्य शॅम्पूमध्ये व्हिटॅमिन B3 आणि मटारच्या अंकुरांचा अर्क यांसारखे घटक आहेत. हे घटक टाळू स्वच्छ ठेवण्यास आणि त्याचा योग्य pH संतुलित ठेवण्यास मदत करतात. हा शॅम्पू एक चांगला क्लिनसिंग अँजेंट आहे, त्यामुळे टाळू स्वच्छ ठेवण्यासाठी आणि केसांचे आरोग्य टिकवण्यासाठी हा सौम्य शॅम्पू उपयोगी ठरू शकतो.
केस जास्त प्रमाणात गळत असतील तर कोणते तेल वापरावे?
जर तुमचे केस जास्त प्रमाणात गळत असतील, तर तुम्ही Traya Nourish Hair Oil नियमितपणे वापरू शकता. हे तेल टाळूतील रक्त प्रवाह सुधारण्यास तसेच टाळू आणि केसांना आवश्यक पोषण देऊन त्यांना मजबूत ठेवण्यास मदत करते. या तेलामध्ये आवळा, अर्जुन, रतनजोत, आर्गन, भृंगराज, एरंडेल आणि रोझमेरी यांसारख्या आयुर्वेदिक घटकांचे मिश्रण आहे. हे घटक केसांचे आरोग्य आणि मजबुती टिकवून ठेवण्यासाठी उपयोगी ठरू शकतात.
सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे या तेलाचा कोणताही साइड इफेक्ट होत नाही. हे तेल कोणत्याही वेगवेगळ्या प्रकारच्या केसांसाठी वापरता येते आणि अनेक लोकांनी हे तेल वापरून सकारात्मक परिणाम अनुभवले आहेत. पण, प्रत्येक व्यक्तीच्या केसगळतीचे कारण वेगळे असू शकते. त्यामुळे तेल वापरण्यासोबत केसगळतीचे मूळ कारण समजून घेणेही महत्त्वाचे आहे. आम्ही तुम्हाला हाच सल्ला देऊ की, एक वेळा आपल्या रोजच्या तेलाच्या जागी हे तेल नक्की वापरून पाहा, तुम्हाला नक्की फरक दिसेल.
केस जास्त प्रमाणात गळत असतील तर कोणते व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स आवश्यक आहेत?
जर तुमचे केस सतत गळत असतील, तर शरीरात काही आवश्यक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सची कमतरता असण्याची शक्यता आहे. केस मजबूत आणि निरोगी ठेवण्यासाठी काही पोषक तत्त्वे महत्त्वाची असतात. चला, अशाच ५ महत्त्वाच्या व्हिटॅमिन्स आणि मिन्सरल्स विषयी जाणून घेऊया, ज्यांच्या कमतरतेमुळे केस कमजोर होऊ शकतात.
१. व्हिटॅमिन D
व्हिटॅमिन D केसांच्या वाढीच्या चक्रात महत्त्वाची भूमिका बजावते आणि केसांची नवीन मुळे उगवण्यासाठी सुद्धा मदत करते. त्याची कमतरता असल्यास ॲलोपेशियासारख्या समस्यांचा धोका वाढू शकतो. दररोज १५–२० मिनिटे उन्हात राहण्याचा प्रयत्न करा. आहारात मासे, अंड्याचा बलक आणि मशरूम यांचा समावेश करा. शरीरात व्हिटॅमिन D ची कमतरता असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट्स घेऊ शकता.
२. व्हिटॅमिन B कॉम्प्लेक्स
व्हिटॅमिन B मधील विशेषतः बायोटिन (B7) आणि B12 हे केस मजबूत करतात आणि त्यांची वाढ करण्यास मदत करतात. बायोटिनची कमतरता असेल तर केस पातळ आणि कमजोर होऊ शकतात. अंडी, नट्स, डाळी, हिरव्या पालेभाज्या, दही आणि केळी हे याचे चांगले स्रोत आहेत. Traya चे Hair Vitamin सप्लिमेंट सुध्दा यासाठी मदत करू शकते.
३. व्हिटॅमिन E
व्हिटॅमिन E टाळूतील रक्त प्रवाह सुधारण्यास आणि केसांना ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून संरक्षण देण्यास मदत करते. तसेच केसांची चमक टिकवून ठेवण्यासाठी सुद्धा ते उपयुक्त ठरू शकते. बदाम, सूर्यफुलाच्या बिया, ॲव्होकॅडो, पालक आणि ब्रोकोली यामध्ये व्हिटॅमिन E चांगल्या प्रमाणात असते. रोज मूठभर नट्स खाल्ल्याने त्याची पूर्तता होण्यास मदत होऊ शकते.
४. आयरन
शरीरात आयरनची कमतरता म्हणजेच ॲनिमियामुळे केसगळती वाढू शकते. ही कमतरता विशेषतः महिलांमध्ये आढळून येते.आयरन शरीराच्या विविध भागांपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्यास मदत करते आणि केसांच्या वाढीसाठीही ते महत्त्वाचे आहे. पालक, बीट, डाळिंब, सोयाबीन, लाल मांस आणि डाळी यांसारख्या पदार्थांचा आहारात समावेश करा. शरीरात आयरनची कमतरता असेल तर Iron Santulan सारखे सप्लिमेंट डॉक्टरांच्या सल्ल्याने घेता येऊ शकते.
५. झिंक
झिंक शरीरातील ऊतींची दुरुस्ती करण्यास आणि केसांची मुळे निरोगी ठेवण्यास मदत करते. त्याची कमतरता असल्यास केस तुटण्याचे प्रमाण वाढू शकते आणि कोंडा सुद्धा वाढू शकतो. भोपळ्याच्या बिया, काजू, हरभरे, दही, ओट्स आणि अंडी यामध्ये झिंक चांगल्या प्रमाणात असते. पण, झिंकचे प्रमाण जास्त असणेही शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकते, त्यामुळे ते योग्य प्रमाणात घेणे महत्त्वाचे आहे.
निष्कर्ष
केस जास्त प्रमाणात गळत असतील, तर संतुलित आहार घेणे, केस आणि टाळूला तेलाने मसाज करणे, ताणतणावापासून दूर राहणे, गरजेनुसार सप्लिमेंट्स घेणे, योग्य शॅम्पू आणि कंडिशनर वापरणे, रसायनयुक्त उत्पादनांचा अतिवापर टाळणे, शरीर हायड्रेट ठेवणे आणि केसांची योग्य काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
लक्षात ठेवा, केसगळती ही एक सामान्य समस्या आहे आणि जगभरातील खूप लोक याचा सामना करत आहेत. पण समस्या असेल, तर तिच्यावर उपायही असतो आणि यासाठी Traya मदत करू शकते. हे आम्हीच सांगत नाही, तर आमचे समाधानी ग्राहक आणि त्यांच्या सकारात्मक प्रतिक्रिया सुद्धा हेच सांगतात.
“केस गळणे थांबवण्यासाठी काय करावे?” याबद्दल जे लोक वारंवार विचारत आहेत, तर त्यांना हे माहिती हवं की फक्त एकाच उपायावर अवलंबून राहण्यापेक्षा केसगळतीचे मूळ कारण समजून घेणे, योग्य पोषण घेणे आणि नियमितपणे टाळूची काळजी घेणे जास्त महत्त्वाचे आहे.
तुमचे केस जास्त प्रमाणात गळत असतील, तर एक साधी Hair Test करून तुम्ही योग्य दिशेने पहिले पाऊल टाकू शकता. “केस जास्त प्रमाणात गळत असतील तर काय करावे?” या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची सुरुवात या टेस्टपासून करू शकता.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
1. जास्त प्रमाणात होणारी केसगळती कशी थांबवावी?
जास्त प्रमाणात होणारी केसगळती थांबवायची असेल तर संतुलित आहार घ्या, ताणतणाव कमी करा, टाळूला तेलाने मसाज करा आणि आठवड्यातून २–३ वेळा योग्य शॅम्पू आणि कंडीशनर वापरा. रसायनयुक्त उत्पादनांचा अतिवापर टाळा आणि सोबतच, शरीर हायड्रेट ठेवा.
2. केस जास्त प्रमाणात गळण्याचे कारण काय असू शकते?
केस जास्त प्रमाणात गळण्यामागे अनेक कारणे असू शकतात. यामध्ये ताणतणाव, शरीरातील पोषक तत्त्वांची कमतरता, ॲनिमिया, टाळूशी संबंधित समस्या, हीट स्टायलिंग टूल्सचा वापर, रसायनयुक्त उत्पादनांचा अतिवापर, कोंडा, हार्मोन्समधील बदल, काही आजार, वाढते वय, आनुवंशिकता, प्रदूषण, केसांची योग्य काळजी न घेणे आणि थायरॉईडच्या समस्या यांचा समावेश होतो.
3. केसगळती लगेच कमी करण्यासाठी काय खावे?
केसगळती लगेच थांबवेल असा कोणताही एक पदार्थ नाही. पण, केसांच्या आरोग्यासाठी अंडी, मासे, रताळे, ॲव्होकॅडो, मोड आलेले हरभरे, लाल मांस, बदाम, अक्रोड, भोपळ्याच्या बिया, गाजर, हिरव्या पालेभाज्या आणि डाळी यांसारखे पोषक पदार्थ आहारात घेणे फायद्याचे ठरू शकते.
4. दररोज किती केस गळणे सामान्य आहे?
दररोज साधारण ५०–१०० केस गळणे ही सामान्य बाब मानली जाते. पण, गळणाऱ्या केसांची संख्या अचानक वाढली असेल आणि दिवसाला १०० पेक्षा जास्त केस गळत असतील किंवा हातात केसांचे गुच्छ येत असतील, तर केसगळतीकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
5. जास्त केस गळणे कोणत्या आजाराचे लक्षण असू शकते?
जास्त करुन केसगळतीमागे अँड्रोजेनिक ॲलोपेशिया (पुरुष आणि महिला पॅटर्न टक्कल), टेलोजन एफ्लुवियम, ॲनिमिया, थायरॉईडमधील असंतुलन, पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS) किंवा टाळूचा संसर्ग यांसारख्या समस्या असू शकतात. केसगळतीचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी Hair Test घ्या किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.
6. घरच्या घरी केसगळती लगेच कशी कमी करावी?
केसगळती कमी करण्यासाठी संतुलित आहार घ्या, टाळूची मसाज करा, सौम्य शॅम्पू वापरा आणि ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न करा. याशिवाय नारळाचे तेल, कांद्याचा रस, आवळा आणि ॲलोव्हेरा यांसारखे नैसर्गिक उपायही वापरून पाहता येऊ शकतात. पण, केसगळती जास्त किंवा सतत होत असेल, तर Hair Test करून त्यामागचे कारण समजून घेणे जास्त योग्य ठरेल.
7. रोज शॅम्पू केल्याने केस गळतात का?
हो, जास्त वेळा शॅम्पू केल्याने टाळूवरील नैसर्गिक पोषण कमी होऊ शकते आणि खूप जास्त किंवा कठोर शॅम्पू वापरल्यास टाळूची नैसर्गिक आर्द्रता कमी होऊन केस कोरडे होऊन तुटण्यास सुरुवात होऊ शकते. केस आणि टाळूच्या गरजेनुसार आठवड्यातून २–३ वेळा शॅम्पू करणे योग्य ठरू शकते.
8. बायोटिन सप्लिमेंट घेतल्याने केसगळती खरोखर थांबते का?
केसगळतीचे कारण बायोटिनची कमतरता असेल, तर बायोटिन सप्लिमेंट्सचा फायदा होऊ शकतो. पण, प्रत्येक व्यक्तीला बायोटिन सप्लिमेंट्सची गरज असतेच असे नाही. त्यामुळे सप्लिमेंट सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य आहे.
संदर्भ :
-
Cleveland Clinic. (2022). Telogen Effluvium: Symptoms, Causes, Treatment & Regrowth. Cleveland Clinic. https://my.clevelandclinic.org/health/diseases/24486-telogen-effluvium
-
Worth, T. (2025). Causes of Hair Loss in Women: Medical Reasons and More. WebMD. https://www.webmd.com/skin-problems-and-treatments/hair-loss/women-hair-loss-causes
-
WebMD Editorial Contributor. (2026). Best Treatments for Thinning Hair: What Really Works? WebMD. https://www.webmd.com/beauty/thinning-hair
Read More Blogs
कमी वयात केस पांढरे होण्याची कारणे आणि उपाय
Quick Answer वयाच्या 21 ते 25 व्या वर्षी केस पांढरे होण्यामागे अनुवंशिकता, पोषणाची ...
केस गळणे थांबवण्यासाठी सर्वात चांगले तेल कोणते आहे? पूर्ण लेख वाचा.
Quick Answer केस गळणे थांबवण्यासाठी असे तेल निवडा जे टाळूला पोषण देईल, केसांच्या मु...
त्रिफळा चूर्णाचे १२ प्रमुख फायदे आणि नुकसान – योग्य वापर, डोस आणि घ्यायची काळजी
Quick Answer त्रिफळा हे आवळा, हिरडा आणि बेहडा यांपासून तयार केलेले पारंपरिक आयुर्वेदिक...
व्हिटॅमिन ई कॅप्सूलचे फायदे, उपयोग आणि नुकसान
Quick Answer व्हिटॅमिन ई हे शरीरासाठी आवश्यक असलेले एक अँटीऑक्सिडंट आहे. ते शरीराती...





























