Quick Answer
टेस्टोस्टेरॉनमुळे शरीराच्या काही भागांवर केसांची वाढ वाढते; मात्र टाळूवरील केसांसाठी त्याचा परिणाम याच्या अगदी विरुद्ध असू शकतो.
चेहरा, छाती आणि शरीराच्या इतर भागांवर बारीक आणि फारसे डोळ्याने न दिसणारे केस असतात. ते टेस्टोस्टेरॉनमुळे हळूहळू जाड आणि गडद होऊ शकतात. मात्र, टाळूवरील केसांवर याचा परिणाम वेगळा असतो. आनुवंशिकतेचा प्रभाव असलेल्या व्यक्तींमध्ये टेस्टोस्टेरॉनमुळे केसांची मुळे हळूहळू लहान आणि कमकुवत होऊ शकतात आणि पुढे जाऊन केसांची वाढ थांबू शकते. म्हणूनच काही पुरुषांच्या चेहऱ्यावर दाट दाढी आणि छातीवर भरपूर केस असले तरी डोक्यावरील केस कमी होताना दिसतात.
या विरोधाभासी परिणामामागे DHT चा प्रभाव हे एक कारण आहे. DHT हा टेस्टोस्टेरॉनपासून शरीरात तयार होणारा जास्त प्रभावी हार्मोन आहे. शरीराच्या वेगवेगळ्या भागांतील केसांच्या मुळांवर DHT चा परिणाम वेगवेगळा होतो. त्यामुळे शरीरावर जास्त केस असणे, दाढीची वाढ कमी असणे किंवा टाळूवरील केस गळणे यामागची प्रक्रिया समजून घेण्यासाठी हा फरक समजणे महत्त्वाचे आहे.
ज्या पुरुषांचे कपाळावरील केस मागे सरकत आहे, अनेकदा त्यांची दाढी दाट किंवा छातीवर भरपूर केस असू शकतात. या दोन्ही गोष्टींना टेस्टोस्टेरॉन कारणीभूत असतो. आनुवंशिकतेचा परिणाम असलेल्या पुरुषांमध्ये हेच हार्मोन चेहरा आणि शरीरावरील केसांची वाढ करते. परंतु , हेच हार्मोन टाळूवरील केसांच्या मुळांवर चुकीचा परिणाम करू शकते.
यावरून असे समजते की, शरीराच्या वेगवेगळ्या भागांतील केसांची मुळे एकाच हार्मोनच्या परिणामाला वेगवेगळ्या प्रकारे प्रतिसाद देतात.
हा परिणाम नेमका कसा होतो? त्याचा टाळूवरील केसगळतीशी काय संबंध आहे? आणि यावर काय उपाय करता येऊ शकतात? हे आपण या लेखात समजून घेऊया.
टेस्टोस्टेरॉनचा केसांवर वेगवेगळा होणारा परिणाम
टेस्टोस्टेरॉन हा पुरुषांच्या शरीरातील प्रमुख नैसर्गिक हार्मोन आहे. स्त्रियांच्या शरीरातही तो असतो, मात्र त्याचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेने कमी असते. स्नायूंची वाढ, हाडांची घनता, लैंगिक इच्छा आणि केसांची वाढ यांसारख्या अनेक शारीरिक प्रक्रियांमध्ये टेस्टोस्टेरॉनची भूमिका असते.
मात्र, केसांच्या वाढीच्या बाबतीत शरीराच्या वेगवेगळ्या भागांतील केसांच्या मुळांवर टेस्टोस्टेरॉनचा होणारा परिणाम वेगवेगळा असतो. चेहरा आणि शरीरावरील केसांची वाढ ते करु शकते; पण टाळूवरील केसांच्या मुळांना हळूहळू लहान करण्याची प्रक्रिया सुद्धा ते सुरू करू शकते. विशेषतः आनुवंशिकदृष्ट्या टक्कल पडण्याची शक्यता असलेल्या व्यक्तींमध्ये हा परिणाम जास्त दिसून येतो.
केसांच्या मुळा लहान होणे म्हणजे ‘मिनीॲचरायझेशन’ असते. या प्रक्रियेत 5-अल्फा रिडक्टेस या एन्झाइमच्या मदतीने टेस्टोस्टेरॉनचे डायहायड्रोटेस्टोस्टेरॉन (DHT) मध्ये रूपांतर होते. त्यामुळे ही शरीरात एकाच हार्मोनमुळे होणारी प्रक्रिया असली, तरी त्याचा परिणाम शरीराच्या वेगवेगळ्या भागांतील केसांवर पूर्णपणे वेगवेगळा होऊ शकतो. हा परिणाम प्रत्येक व्यक्तीमध्येही वेगवेगळा असू शकतो.
पुरुष आणि स्त्रियांमध्ये टेस्टोस्टेरॉनमुळे केसांची वाढ कशी होते?
टेस्टोस्टेरॉनचा केसांच्या वाढीवर होणारा परिणाम पुरुष आणि स्त्रियांमध्ये वेगवेगळा असतो. यावर व्यक्तीचे जैविक लिंग, शरीरातील हार्मोन्सचे सामान्य प्रमाण आणि DHT चा आपल्या शरीरात असणारा आनुवंशिक प्रभाव याचा मोठा परिणाम असतो. केसगळतीसाठी अनेकदा टेस्टोस्टेरॉनला जबाबदार मानले जाते; मात्र विशेषतः स्त्रियांसाठी त्याची भूमिका जास्त गोंधळात टाकणारी असते.
| घटक | पुरुषांमध्ये दिसणारे परिणाम | स्त्रियांमध्ये दिसणारे परिणाम |
|---|---|---|
| केसगळतीचे मुख्य कारण | शरीरात DHT चा आनुवंशिक जास्त प्रभाव | जास्त अँड्रोजेन्स (जसे की PCOS) किंवा हार्मोनची गंभीर कमतरता |
| केसगळतीचा प्रकार | पुरुषांमध्ये दिसणारी पॅटर्न केसगळती, कपाळाच्या वरील केस मागे जाणे आणि टाळूच्या वरच्या भागातील केस विरळ होणे. | संपूर्ण टाळूवर केस विरळ होणे; कधी कधी कपाळाच्या वरचे केस मागे जाणे. |
| शरीरावरील /चेहऱ्यावरील केस | टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण जास्त असल्यास केसांची वाढ साधारणपणे वाढते. | टेस्टोस्टेरॉन किंवा इतर अँड्रोजेन्सचे प्रमाण जास्त असल्यास चेहरा आणि शरीरावर अनावश्यक केस वाढू शकतात, ज्याला हिर्सुटिझम म्हणतात. |
| उपचारांना प्रतिसाद | टेस्टोस्टेरॉन रिप्लेसमेंट थेरपीमुळे टाळूवरील केसगळती वेगाने वाढू शकते. | टेस्टोस्टेरॉनची कमतरता असल्यास रिप्लेसमेंट थेरपीमुळे टाळूवरील केसांची वाढ सुधारू शकते. |
| आनुवंशिक प्रभाव | केसगळतीची समस्या जास्त प्रमाणात आनुवंशिक असते. | हार्मोन्सचे संतुलन आणि आयुष्यातील वेगवेगळे टप्पे यांचा मोठा प्रभाव असतो. |
शरीरातील वेगवेगळ्या भागांतील केसांच्या मुळांमध्ये 5-अल्फा रिडक्टेस या एन्झाइमची क्रिया आणि DHT चा प्रभाव वेगवेगळा असतो. त्यामुळे टेस्टोस्टेरॉनचा परिणाम शरीरावरील केस आणि टाळूवरील केसांवर वेगवेगळ्या प्रकारे दिसतो.
यामुळेच टेस्टोस्टेरॉन किंवा त्याच्याशी संबंधित हार्मोनल बदलांमुळे दाढीचे केस जाड होत असतानाच टाळूच्या वरच्या भागातील आणि कानांजवळील केसांच्या मुळांवर वाईट परिणाम होऊ शकतो. याचाच परिणाम म्हणून केसगळती वाढून पॅटर्न केसगळती दिसू शकते.
शरीरावरील केसांवर आणि टाळूवरील केसांवर टेस्टोस्टेरॉनचा परिणाम वेगवेगळा का होतो?
शरीराच्या वेगवेगळ्या भागांतील केसांवर टेस्टोस्टेरॉनचा परिणाम एकसारखा होत नाही. यामागे शरीर टेस्टोस्टेरॉनसारख्या अँड्रोजेन्सवर कशी प्रक्रिया करते आणि त्वचेच्या वेगवेगळ्या भागांतील केसांच्या मुळांवर कोणते रिसेप्टर्स असतात, यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात.
-
शरीरावरील केस: टेस्टोस्टेरॉन केसांची वाढ होण्यास मदत करू शकते. त्यामुळे चेहरा, छाती आणि हात-पायांवरील बारीक, डोळ्यांनी फारसे न दिसणारे केस हळूहळू जाड आणि गडद केसांमध्ये रूपांतरित होऊ शकतात.
-
टाळूवरील केस: आनुवंशिक परिणामांचा प्रभाव असलेल्या व्यक्तींमध्ये टेस्टोस्टेरॉन केसांच्या मुळांचा आकार लहान करण्यास कारणीभूत ठरू शकते. या प्रक्रियेत केसांची मुळे हळूहळू लहान होत जातात. त्यामुळे केसांची वाढ कमी होऊन ते जास्त बारीक आणि लहान होत जातात आणि पुढे केसगळती होऊ शकते.
-
चेहऱ्यावरील केस: दाढीच्या केसांच्या मुळांमध्ये असलेले टेस्टोस्टेरॉन केसांच्या वाढीला मदत करतात. मात्र टाळूवरील केसांच्या मुळांमध्ये त्याच्याशी संबंधित हार्मोनल प्रक्रिया केसांच्या वाढीला अडथळा निर्माण करू शकतात.
यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, टेस्टोस्टेरॉन केसांच्या वाढीसाठी महत्त्वाचे असले, तरी त्याचा परिणाम केसांचे मूळ शरीराच्या कोणत्या भागात आहे यावर अवलंबून असतो.
टेस्टोस्टेरॉनमुळे टाळूवरील केसांची केसगळती का होते?
टेस्टोस्टेरॉनचे DHT मध्ये रूपांतर झाल्यानंतर, आनुवंशिकतेचा प्रभाव असलेल्या केसांच्या मुळांमधील अँड्रोजेन रिसेप्टर्सशी ते जोडले जाऊ शकते. त्यामुळे केसांच्या मुळांमध्ये हळूहळू बदल होतात आणि केसगळती वाढू शकते. याचे परिणाम आणि त्यामागील कारणे पुढीलप्रमाणे आहेत:
| घटक | तपशील |
|---|---|
| केसांच्या मुळांवर परिणाम | केसांची मुळे हळूहळू लहान होतात. त्यामुळे टाळूवरील मजबूत आणि जाड केसांच्या जागी अधिक बारीक व कमकुवत केस येऊ लागतात. (विशेषतः चेहरा, मान आणि हातांवर) |
| केस वाढीच्या चक्रावर परिणाम | केसांची वाढ होणारा ॲनाजेन टप्पा हळूहळू कमी होत जातो. |
| परिणाम | केस जास्त बारीक आणि लहान होत जातात आणि पुढे त्यांची दिसणारी वाढ थांबू शकते. |
| शरीराच्या वेगवेगळ्या भागांतील फरक | आनुवंशिकतेचा प्रभाव असला तर टाळूवर DHT मुळे केसगळती होऊ शकते. मात्र चेहरा आणि शरीरावरील केसांच्या बाबतीत DHT केसांची वाढ करू शकते. |
म्हणूनच एकाच हार्मोनचा केसांवर असणारा परिणाम शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पूर्णपणे वेगळा असू शकतो.
आनुवंशिकतेची भूमिका: काही लोकांमध्ये केसगळतीची शक्यता जास्त का असते?
तुमच्या केसांच्या मुळांवर DHT चा किती परिणाम होईल, हे मोठ्या प्रमाणात आनुवंशिकतेवर अवलंबून असते. त्यामुळे शरीरातील हार्मोन्सचे प्रमाण सारखे असलेल्या दोन पुरुषांमध्येही केसगळतीचा परिणाम पूर्णपणे वेगळा असू शकतो.
अभ्यासांनुसार, अँड्रोजेनेटिक ॲलोपेशियाची आनुवंशिक संवेदनशीलता टक्कल पडण्याच्या एकूण जोखमीमध्ये सुमारे 80% योगदान देऊ शकते. यामध्ये X गुणसूत्रावर असलेल्या अँड्रोजेन रिसेप्टर (AR) जनुकाची महत्त्वाची भूमिका असते. या जनुकातील बदलांमुळे केसांच्या मुळांची DHT बद्दलची संवेदनशीलता कमी-जास्त होऊ शकते.
ज्या पुरुषांना अशा प्रकारचे AR जनुकातील बदल वारशाने मिळतात ज्यामुळे केसांच्या मुळांची संवेदनशीलता कमी राहते, त्यांचे DHT चे प्रमाण जास्त असले तरी केस बराच काळ निरोगी राहू शकतात. याउलट, केसांच्या मुळांमध्ये DHT बद्दल संवेदनशीलता जास्त असल्यास, शरीरातील हार्मोन्सचे प्रमाण सामान्य असतानाही केसांची मुळे हळूहळू लहान होत जाऊ शकतात.
DHT तयार करणाऱ्या एन्झाइमच्या टाळूवरील कार्यावरही आनुवंशिकतेचा परिणाम होतो. काही पुरुषांच्या टाळूच्या ऊतींमध्ये या एन्झाइमची नैसर्गिक क्रिया कमी असते. त्यामुळे टाळूवर स्थानिक पातळीवर DHT कमी तयार होते आणि हार्मोन्सचे प्रमाण समान असतानाही त्यांच्या केसांचे संरक्षण होण्यास मदत होऊ शकते.
टेस्टोस्टेरॉनशी संबंधित केसगळतीवरील उपचार
टाळूवरील केसगळतीचे कारण DHT मुळे केसांच्या मुळांचे मिनीॲचरायझेशन असल्यास, उपचारांमध्ये प्रामुख्याने अँड्रोजेनशी संबंधित या प्रक्रियेला लक्ष्य केले जाते.
वैद्यकीय उपचार
| उपचार | कसे काम करते? |
|---|---|
| फिनास्टेराइड (दररोज 1 mg) | 5-अल्फा रिडक्टेसच्या टाइप 2 एन्झाइमची क्रिया कमी करते आणि टाळूवरील DHT चे प्रमाण कमी करण्यास मदत करते. |
| ड्युटास्टेराइड (दररोज 0.5 mg) | 5-अल्फा रिडक्टेसच्या टाइप 1 आणि टाइप 2 या दोन्ही प्रकारांवर परिणाम करते आणि DHT चे प्रमाण कमी करण्यास मदत करते. |
| टॉपिकल मिनॉक्सिडिल | केसांच्या वाढीचा ॲनाजेन टप्पा लांबवण्यास आणि केसांच्या मुळांच्या वाढीस चालना देण्यास मदत करते. |
इतर उपचार
| उपचार | कसे काम करते? |
|---|---|
| प्लेटलेट-रिच प्लाझ्मा (PRP) | व्यक्तीच्या स्वतःच्या रक्तातून तयार केलेले प्लेटलेट्स आणि वाढीचे घटक टाळूमध्ये टोचले जातात, ज्यामुळे कमकुवत किंवा निष्क्रिय केसांच्या मुळांना पुन्हा सक्रिय होण्यास मदत होऊ शकते. |
| लो-लेव्हल लेझर थेरपी (LLLT) | वैद्यकीय दर्जाच्या लेझर किंवा प्रकाशाच्या मदतीने केसांच्या मुळांमधील पेशींची क्रिया सुधारण्यास आणि केसांच्या वाढीचा ॲनाजेन टप्पा लांबवण्यास मदत करते. |
| टॉपिकल अँटी-अँड्रोजेन्स | स्पायरोनोलॅक्टोन किंवा केटोकोनाझोलसारखी काही औषधे केसांच्या मुळांवरील अँड्रोजेनशी संबंधित प्रक्रियेवर परिणाम करू शकतात. |
DHT ब्लॉकरवर आधारित उपचारांचे दुष्परिणाम काय आहेत?
टेस्टोस्टेरॉनशी संबंधित केसगळतीवरील पारंपरिक उपचारांमध्ये प्रामुख्याने DHT कमी करण्यावर भर दिला जातो. DHT ब्लॉकरमुळे केसगळती कमी होण्यास मदत होऊ शकते; मात्र काही व्यक्तींमध्ये त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात.
पुरुषांमध्ये दिसू शकणारे दुष्परिणाम
-
लैंगिक कार्यामध्ये अडचणी आणि प्रजनन क्षमतेवर संभाव्य परिणाम
-
गायनेकोमास्टिया म्हणजे पुरुषांच्या स्तनांच्या ऊती वाढणे
-
त्वचेवर पुरळ किंवा सूज
महिलांमध्ये दिसू शकणारे दुष्परिणाम
-
गर्भधारणेदरम्यान बाळाच्या विकासावर गंभीर परिणाम होण्याचा धोका
-
मासिक पाळी अनियमित होणे
-
हार्मोन्समधील बदलांमुळे मुरुम, चेहरा किंवा शरीरावर जास्त केस येणे आणि चक्कर येणे यांसारखे त्रास
DHT ब्लॉकर वापरण्यापूर्वी त्याचे संभाव्य फायदे आणि दुष्परिणाम समजून घेणे आणि योग्य वैद्यकीय सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
स्वतःची काळजी आणि जीवनशैलीतील बदल
DHT ब्लॉकरचे दुष्परिणाम टाळण्यासाठी जीवनशैलीत काही बदल करणे उपयुक्त ठरू शकते. यासाठी तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:
-
आहारातून इन्सुलिन प्रतिरोध नियंत्रित करा: जास्त साखर आणि प्रक्रिया केलेले कार्बोहायड्रेट्स घेतल्याने इन्सुलिनचे प्रमाण वाढू शकते, ज्यामुळे अँड्रोजेन हार्मोन्सचे उत्पादन वाढू शकते.
-
झिंक आणि व्हिटॅमिन D चे पुरेसे प्रमाण राखा: हे दोन्ही पोषक घटक 5-अल्फा रिडक्टेसच्या क्रियेशी संबंधित असू शकतात.
-
दीर्घकाळचा ताण कमी करा: सततच्या ताणामुळे कॉर्टिसोलचे प्रमाण वाढू शकते आणि अप्रत्यक्षपणे शरीरातील अँड्रोजेन हार्मोन्सचे संतुलन बिघडू शकते.
-
वैद्यकीय सल्ल्याशिवाय अॅनाबॉलिक स्टेरॉइड्स किंवा टेस्टोस्टेरॉन सप्लिमेंट्स घेणे टाळा: यामुळे DHT चे प्रमाण वाढू शकते आणि आनुवंशिकदृष्ट्या संवेदनशील व्यक्तींमध्ये केसगळती वेगाने वाढू शकते.
-
अँटिऑक्सिडंट्सयुक्त आहार घ्या: यामुळे टाळूवरील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यास मदत होऊ शकते. हा स्ट्रेस DHT मुळे केसांच्या मुळांना होणारे नुकसान वाढवू शकतो.
अँड्रोजेनेटिक केसगळतीवर सर्वांगीण उपचारपद्धती
पारंपरिक उपचारांमुळे काही व्यक्तींमध्ये दुष्परिणाम होऊ शकतात, तर केवळ जीवनशैलीतील साधे बदल गंभीर केसगळतीच्या बाबतीत पुरेसे ठरतीलच असे नाही. त्यामुळे शरीरातील असंतुलनाची मूळ कारणे समजून घेऊन त्यावर काम करणे महत्त्वाचे ठरते.
यासाठी Traya सारखी सर्वांगीण उपचारपद्धती वेगवेगळ्या स्तरांवर काम करते. या उपचारपद्धतीमध्ये तीन प्रमुख घटकांचा समावेश आहे:
-
आयुर्वेद: आतून शरीराचे संतुलन सुधारण्यावर भर दिला जातो. यामध्ये आतड्यांचे आरोग्य, कॉर्टिसोलचे प्रमाण आणि शरीरातील एकूण अँड्रोजेन संतुलन यांसारख्या घटकांवर लक्ष दिले जाते.
-
पोषण: शरीराला आवश्यक पोषक घटकांची कमतरता भरून काढण्यास मदत केली जाते. बायोटिन, फेरिटिन, झिंक आणि व्हिटॅमिन D यांसारख्या पोषक घटकांची कमतरता असल्यास ती भरून काढण्यासाठी आवश्यक सप्लिमेंट्स दिले जाऊ शकतात.
-
टॉपिकल डर्मेटोलॉजी-आधारित उपचार: मिनॉक्सिडिलसारखे बाहेरून लावायचे उपचार टाळूवरील केसांच्या मुळांना आधार देण्यास आणि केसांच्या वाढीस चालना देण्यास मदत करतात.
निष्कर्ष
टेस्टोस्टेरॉन केसांची वाढ फक्त वाढवते किंवा फक्त केसगळती घडवून आणते असे नाही. त्याचा परिणाम केसांचे मूळ शरीराच्या कोणत्या भागात आहे, तुमच्या आनुवंशिकतेमुळे त्या केसांच्या मुळांची संवेदनशीलता कशी ठरलेली आहे आणि टाळूवर टेस्टोस्टेरॉनचे DHT मध्ये किती कार्यक्षमतेने रूपांतर होते, यावर अवलंबून असतो.
हे समजून घेणे योग्य उपचार निवडण्यासाठी महत्त्वाचे आहे. उद्देश टेस्टोस्टेरॉन पूर्णपणे कमी करणे नसून, केसांच्या मुळांवर त्याचा परिणाम कसा होतो हे समजून घेणे आणि केसांची वाढ किंवा केसगळती ठरवणारे पोषण व शरीरातील इतर घटक योग्य पद्धतीने हाताळणे हा आहे.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
1. टेस्टोस्टेरॉनमुळे शरीरावर आणि चेहऱ्यावर केसांची वाढ वाढते का?
होय. टेस्टोस्टेरॉन आणि त्याचे अधिक प्रभावी रूप DHT यामुळे पौगंडावस्थेपासून चेहरा, छाती, पोट आणि शरीराच्या इतर भागांवरील बारीक केस हळूहळू जाड आणि गडद केसांमध्ये बदलू शकतात. शरीरातील अँड्रोजेनचे प्रमाण जास्त असणे आणि त्या भागात 5-अल्फा रिडक्टेसची क्रिया जास्त असणे यामुळे शरीरावर आणि चेहऱ्यावर दाट केस येऊ शकतात.
2. शरीरावर जास्त केस असणे म्हणजे टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण जास्त आहे का?
गरजेचे नाही. अँड्रोजेनमुळे बारीक केस जाड होण्यास मदत होते; मात्र शरीरावरील केसांची घनता केवळ टेस्टोस्टेरॉनच्या प्रमाणावर अवलंबून नसते. त्यामध्ये आनुवंशिक संवेदनशीलतेचीही मोठी भूमिका असते. टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण सामान्य असले तरी केसांच्या मुळांवरील रिसेप्टर्स अधिक संवेदनशील असल्यास एखाद्या व्यक्तीच्या शरीरावर अधिक केस असू शकतात.
3. टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण जास्त असल्यास जास्त केस येतात का?
यामध्ये एक विरोधाभास आहे. टेस्टोस्टेरॉन आणि DHT चे प्रमाण जास्त असल्यास चेहरा आणि शरीरावरील केस जाड आणि गडद होऊ शकतात. मात्र, आनुवंशिकदृष्ट्या संवेदनशील व्यक्तींमध्ये टाळूवरील केसांच्या मुळांचे मिनीॲचरायझेशन होऊन केस विरळ होऊ शकतात आणि टक्कल पडू शकते. म्हणजेच, मानेखालील भागात केसांची वाढ वाढवणारे हार्मोन टाळूवरील केसांसाठी मात्र उलट परिणाम करू शकते.
4. केसांच्या वाढीसाठी “Big 3” उपचार कोणते आहेत?
केसगळती कमी करण्यासाठी आणि केसांच्या वाढीस चालना देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तीन उपचारांच्या संयोजनाला “Big 3” असे म्हटले जाते. यामध्ये फिनास्टेराइड (Propecia), मिनॉक्सिडिल (Rogaine) आणि केटोकोनाझोल शॅम्पू (Nizoral) यांचा समावेश होतो. हे उपचार अनुक्रमे DHT कमी करणे, केसांच्या मुळांना वाढीस चालना देणे आणि टाळूवरील दाह कमी करणे यासाठी वापरले जातात.
5. टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण जास्त असल्यास केसगळती जास्त होते का?
गरजेचे नाही. टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण जास्त असणे म्हणजे केसगळती होईलच असे नाही. यामध्ये टाळूवर टेस्टोस्टेरॉनचे किती प्रमाण DHT मध्ये रूपांतरित होते आणि केसांच्या मुळांची DHT बद्दलची संवेदनशीलता किती आहे, हे अधिक महत्त्वाचे असते.
6. टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण कमी असल्यामुळे केसगळती होते का?
थेट तसे नाही. अँड्रोजेनेटिक ॲलोपेशियामध्ये दिसणाऱ्या पॅटर्न केसगळतीचे सामान्य कारण कमी टेस्टोस्टेरॉन नसते. मात्र, टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण कमी असल्यास वेगळ्या प्रक्रियेद्वारे केस विरळ होऊ शकतात. केसांच्या मुळांना आवश्यक अँड्रोजेनिक उत्तेजना कमी झाल्यास केसांची एकूण गुणवत्ता आणि घनता कमी होऊ शकते.
संदर्भ:
- Randall VA. (2008). Androgens and hair growth. Dermatologic Therapy.
- Dhanotia R, Dahiya A, Verma D, Sharma A, Sunkaria A. (2023). Molecular insights into androgenetic alopecia and potential therapeutic targets. Journal of Cosmetic Dermatology.
- Grymowicz M, Rudnicka E, Podfidlinga A, Napierała P, Smolarczyk R, Machura K. (2020). Hormonal Regulation of Hair Growth. International Journal of Molecular Sciences.
Read More Blogs
केसांना कंडिशनर किती वेळ लावून ठेवावे?
Quick Answer कंडिशनर केसांना किती लावून वेळ ठेवायचे, हे तुम्ही कोणत्या प्रकारचा कंडि...
केसांसाठी एरंडेल तेल वापरल्यावर परिणाम दिसायला किती वेळ लागतो?
Quick Answer केसांसाठी एरंडेल तेलाचा नियमित वापर केल्यानंतर साधारण ६ ते ८ आठवड्यांत ...
आनुवंशिक केसगळती करण्यात येणारे वैद्यकीय उपचार आणि शस्त्रक्रिया
Quick Answer आनुवंशिक केसगळतीसाठी एकच उपचार प्रत्येकाला योग्य ठरत नाही. सुरुवातीच्या...
केसांची मुळे लहान होणे: आनुवंशिक केसगळतीचे पहिले लक्षण
Quick Answer केसांची मुळे हळूहळू लहान होणे (Hair Miniaturization) हे आनुवंशिक केसगळत...





























