Quick Answer
आनुवंशिक केसगळतीसाठी एकच उपचार प्रत्येकाला योग्य ठरत नाही. सुरुवातीच्या टप्प्यात डॉक्टरांच्या सल्ल्याने मिनॉक्सिडिल किंवा DHT वर परिणाम करणारी औषधे वापरली जाऊ शकतात. PRP आणि LLLT सारखे क्लिनिकल उपचार मुख्य उपचारांना पूरक ठरू शकतात, तर स्थिर आणि प्रगत केसगळतीमध्ये योग्य डोनर केस उपलब्ध असल्यास हेअर ट्रान्सप्लांटचा विचार केला जाऊ शकतो.
योग्य पर्याय केसगळतीचा टप्पा, केसांच्या मुळांची स्थिती, वय, आरोग्य, संभाव्य दुष्परिणाम आणि उपचार सातत्याने घेण्याची तयारी यांवर अवलंबून असतो. त्यामुळे स्वतःहून उपचार निवडण्याऐवजी वैद्यकीय तपासणीनंतर वैयक्तिक उपचार योजना ठरवणे महत्त्वाचे आहे.
आनुवंशिक केसगळती, ज्याला अँड्रोजेनेटिक अलोपेशिया (Androgenetic Alopecia) असेही म्हणतात. ही समस्या पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्येही दिसून येते. मात्र, वैद्यकीय, क्लिनिकल उपचार आणि शस्त्रक्रिया यासारख्या आधुनिक उपचारांच्या मदतीने केसांची वाढ पुन्हा होण्यास मदत मिळू शकते. नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार, आनुवंशिक केसगळती नियंत्रित करता येऊ शकते. यासाठी मिनॉक्सिडिल किंवा फायनास्टराइडसारखी बाहेरून वापरली जाणारी औषधे, फॉलिक्युलर युनिट एक्स्ट्रॅक्शन (FUE) आणि फॉलिक्युलर युनिट ट्रान्सप्लांटेशन (FUT) यांसारख्या हेअर ट्रान्सप्लांट पद्धती, लो-लेव्हल लेझर थेरपी (LLLT) आणि प्लेटलेट-रिच प्लाझ्मा (PRP) थेरपी यांसारखे उपचार उपलब्ध आहेत. यापैकी काही उपचारांसाठी FDA ची मान्यता आहे आणि ते केसांच्या मुळांना बळकट करुन केसांची वाढ होण्यास मदत करू शकतात.
आनुवंशिक केसगळती हा केसगळतीचा सर्वात सामान्य प्रकार आहे. आयुष्यात कधी ना कधी अनेकांना अँड्रोजेनेटिक अलोपेशियाचा सामना करावा लागतो. पूर्वी अशा प्रकारची केसगळती कमी करण्यासाठी लोक प्रामुख्याने नैसर्गिक किंवा घरगुती उपाय करायचे. मात्र, आज वैद्यकीयशास्त्र आणि तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आनुवंशिक केसगळतीवर उपचार करण्यासाठी अधिक प्रभावी आणि वैज्ञानिक पर्याय उपलब्ध झाले आहेत.
आनुवंशिक केसगळती म्हणजे काय?
आनुवंशिक केसगळतीची सुरुवात सहसा हळूहळू होते. सुरुवातीला काही छोटी लक्षणे जाणवू लागतात. जसे की, उशीवर, कंगव्यावर किंवा आंघोळीनंतर बाथरूमच्या जाळीत नेहमीपेक्षा जास्त केस दिसणे, केसांचा भांग रुंद/पातळ होणे किंवा कपाळाच्या दोन्ही बाजूंचे केस हळूहळू मागे जाणे. आनुवंशिक केसगळतीमध्ये डायहायड्रोटेस्टोस्टेरॉन (DHT) हे हार्मोन महत्त्वाचे काम करते. DHT मुळे केसांच्या मुळांचा आकार हळूहळू लहान होतो आणि केसांच्या वाढीचा काळ सुद्धा कमी होतो. त्यामुळे केस विरळ होत जातात आणि कालांतराने टक्कल पडण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.
आनुवंशिक केसगळती कशी ओळखावी?
आनुवंशिक केसगळती पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही होऊ शकते. मात्र, दोघांमध्ये तिची लक्षणे आणि केसगळतीचा पॅटर्न वेगळा असू शकतो.
पुरुषांमध्ये मेल पॅटर्न बॉल्डनेस (Male Pattern Baldness) म्हणजेच केस गळती सहसा कपाळाच्या दोन्ही बाजूंच्या केसांपासून सुरू होतो. कपाळाच्या वरील केस हळूहळू मागे सरकत जातात आणि M आकार तयार झालेला दिसू लागतो. केसगळती वाढत गेल्यावर हेअरलाइन M, U किंवा V आकारात मागे जाऊ शकते. डोक्याच्या वरच्या आणि मागील भागातील केस जास्त प्रमाणात विरळ झाले तर टाळूवर घोड्याच्या नालसारखा (Horseshoe) किंवा U आकाराचा केसांचा पॅटर्न दिसू शकतो.
स्त्रियांमध्ये केसगळती सहसा पुरुषांइतकी तीव्र नसते. मात्र, ती लुडविग पॅटर्न (Ludwig Pattern) सारखी दिसू शकते. यामध्ये प्रामुख्याने डोक्याच्या मधला भांग हळूहळू रुंद/पातळ होत जातो आणि टाळू जास्त स्पष्टपणे दिसू लागतो.
आनुवंशिक केसगळती थांबवण्यासाठी वैद्यकीय उपचार
आपल्याला आनुवंशिकता बदलता येत नाही. मात्र, त्याचा केसांवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी योग्य उपचार आणि उपाय करता येतात. आनुवंशिक केसगळतीसाठी थांबवण्यासाठी काही वैद्यकीय उपचार पुढीलप्रमाणे आहेत:
बाहेरून केले जाणारे उपचार
मिनॉक्सिडिल रक्तवाहिन्या रुंद करण्यासाठी मदत करते, त्यामुळे सुरुवातीला रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी त्याचा वापर केला जात होता. मिनॉक्सिडिल (Rogaine या नावानेही ओळखले जाते) टाळूतील रक्त प्रवाह सुधारण्यासाठी आणि केसांच्या मुळांना सक्रिय करण्यास मदत करते. हे मिनॉक्सिडिल २% आणि मिनॉक्सिडिल ५% अशा प्रमाणात सोल्यूशन किंवा फोमच्या स्वरूपात उपलब्ध असते. केस विरळ होत असलेल्या किंवा टक्कल पडू लागलेल्या भागातील टाळूवर ते लावले जाते.
फायनास्टराइड (Propecia या नावानेही ओळखले जाते) हे प्रिस्क्रिप्शन असल्यावरच मिळणारे औषध असून, प्रामुख्याने पुरुषांमधील ठराविक पॅटर्ननुसार होणाऱ्या केसगळतीवर उपचार करण्यासाठी ते वापरले जाते. हे टेस्टोस्टेरॉनचे डायहायड्रोटेस्टोस्टेरॉन (DHT) मध्ये होणारे रूपांतर कमी करते. DHT मुळे केसांच्या मुळांचा आकार लहान होऊ शकतो. रजोनिवृत्तीनंतरच्या स्त्रियांना हे औषध फक्त डॉक्टरांच्या देखरेखीखाली दिले जाते.
खाण्याच्या स्वरुपातून घेतली जाणारी औषधे
ड्युटास्टराइड हे 5-अल्फा-रिडक्टेस एन्झाइमचा प्रभाव थांबवणारे औषध आहे. हे औषध या एन्झाइमच्या टाइप १ आणि टाइप २ या दोन्ही प्रकारांवर काम करते. अनेक अभ्यासांनुसार, DHT कमी करण्याच्या आणि केसांच्या वाढीची गती वाढवण्यासाठी ड्युटास्टराइड हे फायनास्टराइडपेक्षा जास्त प्रभावी ठरू शकते.
हार्मोनल उपचार
स्पायरोनोलॅक्टोन (Spironolactone)
स्पायरोनोलॅक्टोनचा वापर स्त्रियांमधील पॅटर्ननुसार होणाऱ्या केसगळतीवर उपचार करण्यासाठी केला जातो. यामध्ये अँटी-अँड्रोजेनिक गुणधर्म असल्यामुळे शरीरातील अँड्रोजेन हार्मोन्सच्या प्रभावाला कमी करण्यास मदत होते. त्यामुळे स्त्रियांमधील पॅटर्ननुसार होणारी केसगळती कमी करण्यास मदत होऊ शकते.
केसगळतीवरील क्लिनिकल (शस्त्रक्रिया नसलेले) उपचार
प्लेटलेट-रिच प्लाझ्मा (PRP) थेरपी
ही आधुनिक आणि शस्त्रक्रिया न करता उपचार करता येणारी पद्धत आहे. यामध्ये रुग्णाच्याच रक्तातील प्लेटलेट्स वेगळे करून त्यांचे जास्त प्रमाण असलेले सोल्यूशन तयार केले जाते आणि ते टाळूच्या टक्कल पडलेल्या भागात इंजेक्शनद्वारे दिले जाते. यामुळे केसांच्या मुळांपर्यंत होणारा रक्तपुरवठा सुधारण्यास मदत होऊ शकते. तसेच, केसांच्या मुळांना आवश्यक असलेले पोषक घटक मिळण्यास मदत होऊन केस जास्त दाट होण्यास आणि नवीन केसांची वाढ होण्यास मदत मिळू शकते.
लो-लेव्हल लेझर थेरपी (LLLT)
रेड लाइट थेरपी किंवा लो-लेव्हल लेझर थेरपी (LLLT) मध्ये विशिष्ट तरंगलांबी (wavelengths) असलेल्या लाल रंग असणाऱ्या प्रकाशाचा वापर केला जातो. हा प्रकाश केसांच्या मुळांना सक्रिय करण्यास, टाळूतील रक्ताचा प्रवाह सुधारण्यास आणि केसांची वाढ सुधारण्यास मदत करू शकतो.
Alma TED आणि Tricopat यांसारख्या इतर LLLT पद्धतींचाही केसांच्या मुळांना सक्रिय करण्यासाठी वापर केला जातो.
एक्सोसोम थेरपी
एक्सोसोम थेरपी ही रिजनरेटिव्ह मेडिसिनमधील एक नवीन उपचारपद्धती आहे. स्टेम सेल्समध्ये असलेल्या सूक्ष्म पुटिकांमध्ये केसांची वाढ होण्यास मदत करणारे विविध सायटोकिन्स असतात. हे एक्सोसोम पेशींमधून बाहेर पडून वेगवेगळ्या ऊतींपर्यंत पोहोचतात आणि पेशींमधील संदेशांची देवाणघेवाण करण्याचे काम करतात.
या उपचारामध्ये स्टेम सेल्सपासून मिळवलेले एक्सोसोम एकत्रित स्वरूपात तयार करून टाळूवर टक्कल पडलेल्या भागात इंजेक्शनद्वारे दिले जातात. यामुळे निष्क्रिय झालेल्या केसांच्या मुळांना पुन्हा सक्रिय होण्यास मदत मिळू शकते.
आनुवंशिक केसगळती रोखण्यासाठी शस्त्रक्रिया
हेअर ट्रान्सप्लांटचा आढावा
नैसर्गिक दिसणारे केस पुन्हा मिळवण्यासाठी हेअर ट्रान्सप्लांट हा सर्वात जास्त प्रभावी उपाय मानला जातो.
FUE आणि FUT यामध्ये काय फरक आहे?
फॉलिक्युलर युनिट एक्स्ट्रॅक्शन (FUE) आणि फॉलिक्युलर युनिट ट्रान्सप्लांटेशन (FUT) या केस प्रत्यारोपणाच्या प्रभावी पद्धती आहेत.
FUE पद्धतीमध्ये केसांच्या मुळांमधील स्वतंत्र फॉलिकल्स टाळूच्या एका भागातून काढले जातात आणि केस विरळ झालेल्या किंवा केस नसलेल्या भागात प्रत्यारोपित केले जातात. ही तुलनेने कमी त्रासदायक प्रक्रिया असल्यामुळे यात निशाण कमी राहण्याची शक्यता असते. FUT पद्धतीमध्ये सामान्यतः डोक्याच्या मागील बाजूच्या टाळूचा एक पट्टा शस्त्रक्रिया करुन काढला जातो. त्यानंतर या पट्ट्याचे सूक्ष्मदर्शकाखाली स्वतंत्र फॉलिक्युलर युनिट्समध्ये विभाजन केले जाते आणि केसांची कमतरता असलेल्या टाळूच्या भागात त्यांचे प्रत्यारोपण केले जाते. मात्र, ज्या ठिकाणाहून टाळूचा पट्टा काढला जातो, त्या भागावर एक बारीक रेषेसारखी खूण राहू शकते.
दोन्ही पद्धतींच्या मदतीने केस पुन्हा दाट करण्यास मदत होऊ शकते आणि त्यामुळे आत्मविश्वासही वाढू शकतो.
हेअर ट्रान्सप्लांट कोण करू शकते?
आनुवंशिक केसगळती थांबवण्यासाठी दीर्घकालीन उपाय शोधणाऱ्या व्यक्ती हेअर ट्रान्सप्लांटसाठी योग्य ठरू शकतात. मात्र, ही प्रक्रिया प्रत्येकासाठी योग्य असेलच असे नाही. केसांची स्थिती, केसांची उपलब्धता आणि एकूण आरोग्य यांचा विचार करून तज्ज्ञ डॉक्टर निर्णय घेतात.
केस पुन्हा उगवण्याच्या प्रक्रियेला वेळ लागू शकतो. चांगले परिणाम मिळवण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दोन किंवा अधिक उपचारपद्धती एकत्र वापरण्याचा विचार केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, PRP थेरपी किंवा हेअर ट्रान्सप्लांटसोबत मिनॉक्सिडिलचा वापर केसांची वाढ होण्यासाठी मदत करू शकतो.
तुम्ही योग्य उपचार कसा निवडाल?
आनुवंशिक केसगळतीवर उपचार करण्यासाठी सर्वांसाठी सारखाच उपचार योग्य ठरेल असे नाही. तुम्हाला योग्य उपचार निवडताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो.
- सध्या तुमची केसगळती किती वाढली आहे आणि कोणत्या टप्प्यावर आहे.
- वयानुसार केसांची स्थिती आणि उपचारांचा परिणाम वेगळा असू शकतो.
- उपचारासाठी तुम्ही किती खर्च करू शकता.
- औषधे घेणे किंवा वैद्यकीय उपचार घेणे तुम्हाला किती सोयीचे आहे.
आनुवंशिक केसगळतीची समस्या त्रासदायक वाटू शकते. मात्र, वैद्यकीय शास्त्रातील प्रगतीमुळे आज केसगळतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि केसांची वाढ सुधारण्यासाठी अनेक उपचार उपलब्ध आहेत. तुम्ही Traya’s Ultimate Hair Supplements Combo चा सुद्धा विचार करू शकता. यामध्ये Hair Ras आणि Hair Vitamin हे दोन सप्लिमेंट्स आहेत. त्यामध्ये बायोटिन, गुळवेल (Guduchi), अर्जुन, भृंगराज, अश्वगंधा, भोपळ्याच्या बियांचा अर्क आणि ग्रीन टीचा अर्क यांसारख्या नैसर्गिक घटकांचा समावेश आहे. हे घटक केसांच्या वाढ होण्यासाठी आणि टाळूचे आरोग्य टिकवून ठेवण्यास मदत करू शकतात.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
आनुवंशिक केसगळती कोणत्या वयात सुरू होते?
आनुवंशिक केसगळती सुरू होण्याचे वय प्रत्येक व्यक्तीनुसार वेगळे असते. पुरुषांमध्ये ती उशिरा किशोरवयात किंवा वयाच्या विसाव्या वर्षाच्या सुरुवातीला सुरू होऊ शकते. स्त्रियांमध्ये ही समस्या प्रामुख्याने वयाच्या तिसाव्या वर्षाच्या मध्यापासून ते चाळिसाव्या वर्षाच्या मध्यापर्यंत, विशेषतः रजोनिवृत्तीच्या काळात सुरू होऊ शकते.
आनुवंशिक केसगळतीवरील उपचारांचा परिणाम दिसण्यासाठी किती वेळ लागतो?
आनुवंशिक केसगळतीवरील बहुतेक उपचारांचा परिणाम दिसण्यासाठी काही महिने लागू शकतात. साधारण २ ते ३ महिन्यांत केसगळती कमी झाल्याचे जाणवू शकते. मात्र, स्पष्ट परिणाम दिसण्यासाठी साधारण ४ ते ६ महिने, तर केसांची वाढ पुन्हा आधीसारखी होऊन त्यांची स्थिती सुधारण्यासाठी ६ ते १२ महिने लागू शकतात.
हेअर ट्रान्सप्लांटचा विचार कधी करावा?
केसगळती खूप वाढली असेल किंवा औषधोपचार करूनही केसगळती सुरूच असेल, तर हेअर ट्रान्सप्लांटचा विचार केला जाऊ शकतो. मात्र, हा निर्णय केसांची स्थिती आणि केसांच्या मुळांची तपासणी केल्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावा.
हेअर ट्रान्सप्लांट हा कायमस्वरूपी उपाय आहे का?
केसगळती खूप वाढून टक्कल पडले असेल, तर हेअर ट्रान्सप्लांट हा दीर्घकाळ टिकणारा उपाय ठरू शकतो. मात्र, त्याचा परिणाम व्यक्तीच्या केसांची स्थिती, प्रत्यारोपण केलेल्या केसांची गुणवत्ता आणि केसगळतीच्या मूळ कारणांवर अवलंबून असतो.
केसांची वाढ होण्यासाठी दोन किंवा त्यापेक्षा जास्त उपचार एकत्र घेणे चांगले आहे का?
केसांची वाढ सुधारण्यासाठी एका उपचारापेक्षा दोन किंवा त्यापेक्षा जास्त उपचारपद्धती एकत्र वापरण्याचा विचार केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, PRP किंवा हेअर ट्रान्सप्लांटसोबत मिनॉक्सिडिलचा वापर केसांची वाढ करण्यासाठी केला जाऊ शकतो. मात्र, उपचारपद्धती एकत्र वापरण्याचा निर्णय डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेणे योग्य आहे.
हे उपचार आयुष्यभर सुरू ठेवावे लागतात का?
बहुतेक वेळा, होय. आनुवंशिक केसगळती पूर्णपणे थांबवता येत नाही, त्यामुळे केसांची वाढ आणि घनता टिकवून ठेवण्यासाठी काही उपचार सातत्याने सुरू ठेवावे लागू शकतात. उपचार बंद केल्यास, उपचारामुळे वाढलेले किंवा टिकून राहिलेले केस पुन्हा हळूहळू पातळ होऊ शकतात आणि केसगळती वाढू शकते.
References:
- International Society of Hair Restoration Surgery. (2021). Surgical and Non-Surgical Treatments for Hair Loss. International Society of Hair Restoration Surgery. https://ishrs.org/treatments-for-hair-loss-in-men/
- Nestor MS, Ablon G, Gade A, Han H, Fischer DL. (2021). Treatment options for androgenetic alopecia: Efficacy, side effects, compliance, financial considerations, and ethics. Journal of Cosmetic Dermatology. DOI: 10.1111/jocd.14537
Read More Blogs
केसांची मुळे लहान होणे: आनुवंशिक केसगळतीचे पहिले लक्षण
Quick Answer केसांची मुळे हळूहळू लहान होणे (Hair Miniaturization) हे आनुवंशिक केसगळत...
डिफ्यूज आनुवंशिक केसगळती: कारणे, लक्षणे आणि उपचार
Quick Answer आनुवंशिक केसगळती नेहमी आपल्या अपेक्षेप्रमाणेच दिसते असे नाही. अनेक लोका...
आनुवंशिक केस गळतीवर नैसर्गिक उपाय: योग्य आहार आणि निरोगी जीवनशैली
Quick Answer मिनॉक्सिडिल १०% हे तीव्र केसगळतीसाठी वापरले जाणारे उच्च-क्षमता असलेले ...
स्त्रियांसाठी मिनॉक्सिडिल: केसांच्या पुनर्वाढीसाठी संपूर्ण मार्गदर्शन
Quick Answer स्त्रियांसाठी मिनॉक्सिडिल हे केसविरळ होणे आणि आनुवंशिक केसगळती कमी करण...





























