icon Skip to content

डिफ्यूज आनुवंशिक केसगळती: कारणे, लक्षणे आणि उपचार

Dr Kalyani Deshmukh

Dr Kalyani Deshmukh
Dr. Kalyani Deshmukh brings 7 years of experience in dermatology, specializing in the diagnosis of complex conditions and performing advanced dermatosurgical procedures. Her areas of expertise include clinical dermatology, trichology, dermatosurgery and aesthetic medicine.

डिफ्यूज आनुवंशिक केसगळती

Quick Answer

आनुवंशिक केसगळती नेहमी आपल्या अपेक्षेप्रमाणेच दिसते असे नाही.

अनेक लोकांच्या बाबतीत टाळूवरील पूर्ण केस सारख्या प्रमाणात विरळ होत जातात. टक्कल फक्त एखाद्या ठराविक ठिकाणी पडत नाही किंवा कपाळावरील केस सुद्धा मागे जात नाही, तर पूर्ण टाळूवरील केस पातळ होतात. केसगळतीच्या या प्रकाराला डिफ्यूज हेअर थिनिंग (Diffuse Hair Thinning) म्हणजेच ‘ठरावीक पॅटर्न नसलेली आनुवंशिक केसगळती’ असे म्हणतात. हा प्रकार सुरुवातीच्या काळात ओळखणे कठीण असते. अनेकदा इतर कारणांमुळे होणारी केस गळती समजून आपला गोंधळही उडतो. आनुवंशिकतेची यात महत्त्वाची भूमिका असते; मात्र, केस विरळ होण्यामागे केवळ आनुवंशिकताच कारणीभूत असेल असे क्वचितच असते.

सारांश

केस विरळ होण्यामागे नेमके काय कारण आहे? हे जितक्या लवकर समजेल; तितक्या लवकर त्याचा वेग कमी करण्यासाठी योग्य उपाय करता येतात.

जेव्हा तुम्ही आनुवंशिक केसगळतीचा विचार करता; तेव्हा तुमच्या डोळ्यांसमोर कदाचित फक्त कपाळावरील पुढचे केस मागे गेलेले असणे किंवा डोक्याच्या वरच्या भागात पडलेले टक्कल असे चित्र येईल. पण तुमची केसगळती यापेक्षा वेगळीही असू शकते. उदाहरणार्थ:

  • केसांचा भांग आधीपेक्षा रुंद/पातळ दिसू लागतो.

  • पोनीटेलची/वेणीची जाडी कमी झालेली जाणवते.

  • केस ओले असताना टाळू पूर्वीपेक्षा जास्त दिसू लागतो.

तुमच्या पूर्ण टाळूवरील केस कोणत्याही ठराविक पॅटर्नशिवाय हळूहळू विरळ होत जातात. एखाद्या विशिष्ट भागात टक्कल पडत नाही; त्याऐवजी कालांतराने पूर्ण टाळूवरील केसांचे प्रमाण कमी होत जाते. याला डिफ्यूज म्हणजेच ठरावीक पॅटर्न नसताना आनुवंशिक केस विरळ होणे (Diffuse Genetic Hair Thinning) असे म्हणतात. केसगळतीच्या कारणांपैकी हा प्रकार ओळखताना गोंधळ होतो किंवा चूक होते.

केसगळतीचे योग्य निदान न झाल्यामुळे अनेक लोकांनी केस गळती कमी करण्यासाठी चुकीचे उपचार करण्यात अनेक वर्षे वाया घालवली आहेत.

तुमची केसगळती आनुवंशिक आहे का? ती वाढण्यामागे कोणते घटक कारणीभूत आहेत? आणि त्यासाठी तुम्ही काय करू शकता? हे समजून घेण्यासाठी हा ब्लॉग तुम्हाला मदत करेल.

तुमचे केस विरळ होण्यामागे आनुवंशिक कारण आहे का?

अनेक लोकांसाठी याचे उत्तर ‘होय’ असते. पण, केस विरळ होण्यामागे केवळ आनुवंशिकताच कारणीभूत असते असे नाही.

आनुवंशिक केस विरळ होण्यामागे डायहायड्रोटेस्टोस्टेरॉन (DHT) या हार्मोनची महत्त्वाची भूमिका असते. तुमच्या शरीरात DHT चा परिणाम लवकर होत असल्यास, DHT केसांच्या मुळांशी जोडले जाते आणि कालांतराने त्यांचा आकार कमी करू लागते. त्यामुळे केस पूर्वीपेक्षा पातळ आणि लहान होतात आणि शेवटी त्यांची वाढ पूर्णपणे थांबू शकते.

मात्र, एक महत्त्वाची गोष्ट अनेकांना माहिती नसते. केस विरळ होण्याची आनुवंशिक शक्यता असली, तरी प्रत्येक व्यक्तीला केसगळतीचा त्रास होईलच असे नाही. याउलट, आनुवंशिकदृष्ट्या केस विरळ होण्याची शक्यता कमी असली; तरी पोषणाची कमतरता, ताणतणाव किंवा हार्मोन्समधील असंतुलन यांसारख्या इतर कारणांमुळे केस जास्त प्रमाणात विरळ होऊ शकतात.

केस विरळ होण्यामागे आनुवंशिक कारण आहे हे कसे ओळखाल?

  • तुमचे आई किंवा वडील, या दोन्हीकडच्या कोणत्याही कुटुंबात केस विरळ होण्याची समस्या असेल. हे आईच्या किंवा वडिलांच्या बाजूने वारशाने येऊ शकते.

  • तुमचे केस हळूहळू विरळ होऊ लागले आहेत आणि अनेक वर्षांपासून ही समस्या वाढत जात आहे.

  • ठराविक ठिकाणचे केस गळण्याऐवजी संपूर्ण केसांचीच जाडी किंवा दाटपणा कमी होत आहे.

  • कपाळावरील केस हळूहळू मागे जात आहे किंवा केसांचा भांग रुंद/पातळ होत आहे.

  • केसगळती होण्यामागे आजारपण, औषधे किंवा जास्त ताणतणाव यांसारखे कोणतेही स्पष्ट कारण दिसत नाही.

डिफ्यूज जेनेटिक हेअर थिनिंग वि पॅटर्न केस गळणे

बहुतेक व्यक्तींना अँड्रोजेनेटिक अलोपेशिया (Androgenetic Alopecia) या प्रकारच्या केसगळतीबद्दल माहिती असते. पुरुषांच्या कपाळावरील केस यामुळे मागे जाऊ शकतात, तर स्त्रियांच्या केसांचा भांग रुंद/पातळ होऊ शकतो. मात्र, डिफ्यूज केस गळती यापेक्षा वेगळी असते. यामध्ये केस कोणत्याही ठराविक पॅटर्नशिवाय संपूर्ण टाळूवर समान प्रमाणात विरळ होत जातात.

तुलनेचा मुद्दा पॅटर्न असलेली केसगळती ठराविक पॅटर्न नसताना आनुवंशिकरित्या केस विरळ होणे
स्वरूप कपाळावरील पुढील केस मागे जाणे किंवा काही ठिकाणी टक्कल पडणे संपूर्ण टाळूवरील केस समान प्रमाणात विरळ होणे
केसगळतीची वाढ ठराविक आणि अंदाज लावता येईल अशा पॅटर्ननुसार केस गळती वाढते हळूहळू आणि समान प्रमाणात केसांचा दाटपणा कमी होत जातो
केस गळती लक्षात येणे सुरुवातीच्या टप्प्यात ओळखणे तुलनेने सोपे असते केस मोठ्या प्रमाणात विरळ होईपर्यंत अनेकदा लक्षात येत नाही
कारण मुख्यतः शरीरात होणारा DHT चा परिणाम शरीरात होणारा DHT चा परिणाम आणि शरीरातील इतर कारणे
उपचारांचा परिणाम मिनॉक्सिडिल आणि फायनास्टराइडला वापरल्यास चांगला परिणाम होऊ शकतो मूळ कारणांवर उपचार करण्यासोबतच इतर उपचारांची गरज भासू शकते

मग ठराविक पॅटर्न नसताना केस विरळ होणे आनुवंशिक आहे का? तर होय, बहुतेक व्यक्तींमध्ये ते आनुवंशिक असू शकते. मात्र, पॅटर्ननुसार टक्कल पडण्याच्या तुलनेत पॅटर्न नसताना केस विरळ होण्यामागे एकापेक्षा जास्त कारणे असण्याची शक्यता जास्त असते.

 

तुमचे केस विरळ होण्याची समस्या वाढत असल्याची चिन्हे

पॅटर्न नसलेली आनुवंशिकरित्या केस विरळ होण्याची समस्या हळूहळू वाढत जाते. खालीलपैकी काही बदल जाणवत असतील, तर ही तुमचे केस जास्त विरळ होत असल्याची लक्षणे असू शकतात आणि त्यावर वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे:

  • वर्षभरापूर्वीच्या तुलनेत तुमचा केसांचा भांग जास्त रुंद/पातळ दिसतो.

  • तुमची पोनीटेल/वेणी आधीपेक्षा पातळ दिसते.

  • केस ओले असताना टाळूचा भाग जास्त दिसू लागतो.

  • केस पूर्वीपेक्षा पातळ झाले आहेत आणि लवकर तुटतात.

  • कालांतराने तुमची केसगळती हळूहळू वाढत जात आहे.

  • केस धुतल्यानंतरही ते पूर्वीसारखे दाट दिसायला जास्त वेळ लागतो.

आनुवंशिकरित्या विरळ झालेले केस पुन्हा दाट करता येतात का?

या प्रश्नाचे उत्तर बहुतेकांना प्रामाणिकपणे जाणून घ्यायचे असते. आनुवंशिकरित्या विरळ झालेले केस पुन्हा दाट करता येतात का? तर काही प्रमाणात, ‘होय’

तुमची आनुवंशिकता बदलता येत नाही. पण, केस विरळ होण्याचा वेग कमी करता येतो. अनेक व्यक्तींच्या निष्क्रिय झालेल्या, पण अजूनही जिवंत असलेल्या केसांच्या मुळांमधून पुन्हा केसांची वाढ होऊ शकते. येथे एक महत्त्वाचा फरक लक्षात घेणे गरजेचे आहे तो म्हणजे, केसांची मुळे जिवंत असतील पण निष्क्रिय झालेली असतील, तर केस पुन्हा वाढण्याची शक्यता असते. मात्र, ती खूप दीर्घकाळापासून मुळे निष्क्रिय झालेली असतील, तर त्यांना पुन्हा सक्रिय करणे खूप कठीण होते.

तुम्ही यासाठी काय करू शकता?

  • नियमित उपचार केल्यास केस विरळ होण्याचा वेग कमी करता येतो.

  • निष्क्रिय केसांच्या मुळांना पूर्णपणे लहान आणि कमजोर होण्याआधी पुन्हा सक्रिय करता येते.

  • सध्या असलेले केस मजबूत करून ते लवकर विरळ होण्यापासून थांबवता येते.

  • आनुवंशिक केसगळती वाढवणाऱ्या शरीरातील इतर कारणांवरही लक्ष देता येते.

तुम्ही काय करू शकत नाही?

  • केसांची मुळे पूर्णपणे नष्ट झाल्यानंतर त्या ठिकाणचे केस विरळ झाले असतील तर ते पुन्हा दाट करता येत नाही.

  • तुमच्या शरीरात होणारा DHT चा आनुवंशिक परिणाम बदलता येत नाही.

  • नियमित उपचार न घेतल्यास केस विरळ होण्याची समस्या कायमस्वरूपी थांबवता येत नाही.

लवकर उपचार सुरू केल्यास केसांची वाढ सुधारण्याचा आणि केस विरळ होण्याचा वेग कमी होण्याची शक्यता जास्त असते.

 

आनुवंशिकरित्या केस विरळ होण्यापासून थांबवण्यासाठी नैसर्गिक उपाय

आनुवंशिकरित्या केस विरळ होण्यापासून थांबवायचे असतील तर, चांगले परिणाम मिळवण्यासाठी नैसर्गिक उपायांचा परिणाम फक्त केसांच्या मुळांवर होणे पुरेसे नाही. तर, केस विरळ होण्याचा वेग वाढवणाऱ्या शरीरातील इतर कारणांवरही या उपायांनी काम करणे गरजेचे आहे.

भृंगराज

केसगळतीसाठी विकसित करण्यात आलेल्या आयुर्वेदिक वनस्पतींपैकी भृंगराज ही एक महत्त्वाची वनस्पती आहे. मिनॉक्सिडिलसारख्या लोकप्रिय औषधाप्रमाणेच भृंगराज केसांच्या मुळांना सक्रिय होण्यास मदत करते, असे अभ्यासातून दिसून आले आहे. पण, यामुळे मिनॉक्सिडिलप्रमाणे अवलंबित्व निर्माण होण्याचा धोका नसतो.

अश्वगंधा

ताणतणाव हे कारण आनुवंशिक केस विरळ होण्यामागील प्रमुख कारणांपैकी एक आहे. ताणतणावामुळे ‘कॉर्टिसोल’ या हार्मोनची पातळी वाढते आणि त्यामुळे केसांची मुळे विश्रांतीच्या अवस्थेत जाऊ शकतात.

दुसरीकडे, अश्वगंधा फक्त ६० दिवसांत कॉर्टिसोलची पातळी २७.९% पर्यंत कमी करण्यास मदत करते, असे अभ्यासातून दिसून आले आहे. त्यामुळे आनुवंशिक केस विरळ होण्यामागील प्रमुख कारणांपैकी एका कारणावर थेट काम करण्यास मदत होऊ शकते.

बायोटिन, लोह आणि झिंक

शरीरात आवश्यक पोषक तत्त्वांची कमतरता हे पॅटर्न नसलेले केस विरळ होण्यामागील प्रमुख कारणांपैकी एक आहे. या पोषक तत्त्वांची कमतरता केसांच्या मुळांचा आकार लहान होण्याची गती वाढवू शकते.

 

कोल्ड-प्रेस्ड तेलांनी टाळूची मालिश करणे

कोल्ड-प्रेस्ड तेलांनी टाळूची मालिश केल्याने केसांची मुळे सक्रिय होण्यास मदत होते, ज्यामुळे केस जास्त दाट वाढण्यास मदत होऊ शकते.

आतड्यांचे आरोग्य

कोणताही पॅटर्न नसताना केस विरळ होण्यामागील प्रमुख कारणांपैकी एक म्हणजे शरीराला आवश्यक पोषक तत्त्वे योग्य प्रमाणात शोषून न घेता येणे. आहारातून पुरेशी पोषक तत्त्वे मिळत असली, तरी शरीर त्यांचे योग्य प्रकारे शोषण करू शकत नसेल, तर केसांच्या मुळांना आवश्यक पोषण मिळत नाही. योग्य पोषणाचा अभाव राहिल्यामुळे केसांच्या मुळांना पुरेसे पोषक तत्त्व मिळत नाही आणि त्यामुळे केसगळती होऊ शकते.

जेव्हा नैसर्गिक उपचार पुरेसे ठरत नाहीत

आनुवंशिकरित्या विरळ होणाऱ्या केसांसाठी नैसर्गिक उपचार काही प्रमाणात प्रभावी ठरू शकतात, पण त्यांच्या काही मर्यादा सुद्धा आहेत. उदाहरणार्थ, तुमच्या शरीरात DHT चा होणारा परिणाम जास्त असेल आणि केसांची मुळे झपाट्याने लहान होत असतील, तर फक्त नैसर्गिक उपचार पुरेसे ठरण्याची शक्यता कमी असते.

अशा परिस्थितीत नैसर्गिक उपचारांसोबत मिनॉक्सिडिल किंवा फायनास्टराइडसारख्या वैद्यकीय उपचारांचा वापर करावा लागू शकतो. मिनॉक्सिडिलचा केसांच्या मुळांवर परिणाम निष्क्रिय झालेल्या केसांच्या मुळांना पुन्हा सक्रिय होण्यास मदत करते, तर फायनास्टराइड DHT वर थेट परिणाम करते.

फायनास्टराइड आणि मिनॉक्सिडिल हे अँड्रोजेनेटिक अलोपेशियावरील वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झालेले उपचार आहेत. मात्र, या उपचारांच्याही काही मर्यादा सुद्धा आहेत.

केस विरळ होणे रोखण्यासाठी सर्वोत्तम उपचार कोणता?

प्रामाणिकपणे सांगायचे तर, केस विरळ होणे रोखण्यासाठी सर्वोत्तम परिणाम म्हणून टाळूवर थेट परिणाम करणारे वैद्यकीय उपचार आणि केसगळतीमागील मूळ कारणांवर काम करणारे अंतर्गत उपचार, या दोन्हींचा योग्य समतोल साधणे आवश्यक असते. फक्त वैद्यकीय उपचार किंवा फक्त नैसर्गिक उपचार यापैकी कोणताही एक पर्याय केस विरळ होण्यामागील पूर्ण कारण समजून घेण्यासाठी पुरेसा ठरत नाही.

ट्राया (Traya) चा दृष्टिकोन

याच ठिकाणी ट्राया(Traya) ची भूमिका महत्त्वाची ठरते. ट्राया (Traya) चे ३-सायन्स मॉडेल आयुर्वेद, हेअर सायन्स आणि न्यूट्रिशन या तीनही पद्धतींचा वापर करून आनुवंशिकरित्या केस विरळ होणाच्या समस्येवर वेगवेगळ्या बाजूंनी काम करते.

  • केसांच्या मुळांच्या पातळीवर DHT चा होणारा परिणाम थांबवणे: आनुवंशिक केस विरळ होण्यामागे DHT हा प्रमुख घटक आहे. कालांतराने तो केसांच्या मुळांचा आकार लहान करतो. ट्राया (Traya) च्या ReCaP Serum मध्ये Procapil आहे, जे टाळूमध्ये DHT तयार होण्यास कारणीभूत असणाऱ्या एन्झाइमची क्रिया थांबवण्यास मदत करते. यामध्ये Redensyl सुद्धा आहे, जे केसांच्या मुळांमधील स्टेम सेल्स पुन्हा सक्रिय होण्यास मदत करते. तसेच Capixyl केसांची घनता आणि दाटपणा वाढवण्यास मदत करते.

  • शरीराच्या आत होणारी DHT ची निर्मिती कमी करण्यास मदत करणे: आपण फक्त टाळूवर काय लावतो याला महत्त्व नाही, तर शरीराच्या आतून तुम्ही काय घेता हेही तितकेच महत्त्वाचे आहे. पुरुषांसाठी असलेल्या Hair Vitamin आणि स्त्रियांसाठी असलेल्या Hair Vitamin For Her यामध्ये भोपळ्याच्या बियांचा अर्क आहे. हा नैसर्गिकपणे DHT ला थांबवण्याचे काम करतो, असे वैज्ञानिक अभ्यासातून दिसून आले आहे. यामध्ये बायोटिन, लोह, झिंक आणि व्हिटॅमिन D सुद्धा आहेत, ज्यामुळे केसांच्या मुळांना वाढीच्या अवस्थेत जास्त काळ टिकून राहण्यासाठी आवश्यक पोषण मिळते.

  • आयुर्वेदिक सप्लिमेंट्सच्या मदतीने केसांच्या मुळांचे आरोग्य टिकवणे: Hair Ras मध्ये भृंगराज, अश्वगंधा, आवळा आणि शतावरी यांसारख्या आयुर्वेदिक वनस्पती आहेत. या वनस्पती केसांच्या मुळांपर्यंत रक्तपुरवठा वाढवण्यास मदत करतात. तसेच त्या टाळूची जळजळ कमी करण्यास आणि हार्मोन्सचे संतुलन राखण्यास मदत करतात. त्यामुळे आनुवंशिक कारणांमुळे केस विरळ होण्याचे प्रमाण नैसर्गिकरित्या कमी करण्यास मदत होऊ शकते.

  • शरीरातील पोषक तत्त्वांचे शोषण वाढवणे: तुम्ही योग्य पोषक तत्त्वे घेत असाल, तरीही अपेक्षित परिणाम मिळत नसतील, तर त्यामागील कारण म्हणजे, शरीर ही पोषक तत्त्वे योग्य प्रकारे शोषून घेत नाही असे ही असू शकते. Health Tatva शरीराला पोषक तत्त्वे शोषून घेण्यास मदत करते आणि केसांच्या मुळांपर्यंत पोषक तत्त्वांचा पुरवठा वाढवण्यासही मदत करते.

  • ताणतणावामुळे होणारी केसगळती कमी करण्यास मदत: दीर्घकाळ असणारा ताणतणाव कॉर्टिसोलची पातळी वाढवतो आणि केसांच्या मुळांना विश्रांतीच्या अवस्थेत ढकलतो. त्यामुळे आनुवंशिकरित्या केस विरळ होण्याची क्रिया वेगाने वाढू शकते. Calm Ras कॉर्टिसोलच्या पातळीवर थेट काम करून शरीरातील ताणतणाव आणि केसगळतीच्या या चक्राला कमी करण्यास मदत करते.

  • टाळूला थेट पोषण देणे: Scalp Oil with Growth Oil Shots मधील कोल्ड-प्रेस्ड तेल आणि आयुर्वेदिक घटक थेट टाळूपर्यंत पोहोचतात. त्यामुळे टाळूमधील रक्ताचा पुरवठा सुधारण्यास आणि केसांच्या मुळांना निरोगी राहण्यासाठी आवश्यक असलेले बाह्य पोषण मिळण्यास मदत होते.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

1. कोणताही ठराविक पॅटर्न नसताना विरळ झालेले केस पुन्हा दाट करणे शक्य असते का?

काही प्रमाणात, हो. तुमच्या शरीरात असणारा DHT चा परिणाम बदलता येत नाही. मात्र, केसांची मुळे अजूनही सक्रिय असतील, तर नियमित उपचार घेतल्याने केस विरळ होण्याचा वेग कमी करता येतो आणि पुन्हा केसांची वाढ होण्यास मदत होऊ शकते. उपचार जितक्या लवकर सुरू कराल, तितके चांगले परिणाम मिळण्याची शक्यता जास्त असते.

2. कोणताही ठराविक पॅटर्न नसताना केस विरळ होणे आनुवंशिक असू शकते का?

होय. कोणताही ठराविक पॅटर्न नसताना केस विरळ होणे हे बहुतेक वेळा अँड्रोजेनेटिक अलोपेशियाशी संबंधित असते. तुमच्या केसांच्या मुळांमध्ये DHT चा परिणाम असल्यास, कालांतराने DHT मुळे केसांच्या मुळांचा आकार लहान होऊ लागतो. पण, पोषणाची कमतरता, ताणतणाव आणि हार्मोन्समधील असंतुलन यांसारखे शरीरातील इतर घटक सुध्दा केस विरळ होण्याची प्रक्रिया जास्त वेगाने वाढवू शकतात.

3. माझे केस विरळ होण्यामागे आनुवंशिक कारण आहे हे मला कसे कळेल?

तुमचे आई किंवा वडील, दोन्हीपैकी कोणत्याही बाजूच्या कुटुंबात केसगळतीची समस्या आहे का, हे पाहा. तुमचे केस अनेक वर्षांपासून हळूहळू विरळ होत असतील, केसांचा भांग रुंद/पातळ होत असेल आणि आजारपण किंवा औषधांसारखे केसगळतीचे कोणतेही इतर बाह्य कारण नसेल, तर ही शक्यता आनुवंशिकतेमुळे केस विरळ होण्याची असू शकते.

संदर्भ :

  1. Roy RK, Thakur M, Dixit VK. (2008). Hair growth promoting activity of Eclipta alba in male albino rats. Archives of Dermatological Research. DOI: 10.1007/s00403-008-0860-3
  2. Chandrasekhar K, Kapoor J, Anishetty S. (2012). A Prospective, Randomized Double-Blind, Placebo-Controlled Study of Safety and Efficacy of a High-Concentration Full-Spectrum Extract of Ashwagandha Root in Reducing Stress and Anxiety in Adults. Indian Journal of Psychological Medicine. DOI: 10.4103/0253-7176.106022
  3. Almohanna HM, Ahmed AA, Tsatalis JP, Tosti A. (2018). The Role of Vitamins and Minerals in Hair Loss: A Review. Dermatology and Therapy. DOI: 10.1007/s13555-018-0278-6
  4. Thom E. (2016). Stress and the Hair Growth Cycle: Cortisol-Induced Hair Growth Disruption. Journal of Drugs in Dermatology. 
  5. Harvard Health Publishing. (2023). Hereditary Patterned Baldness. Harvard Health Publishing. 
  6. Healthify. (n.d.). Hair Loss - Normal or Hereditary. Healthify. 
  7. QHT Clinic. (n.d.). Understanding How Genetics Affect Hair Loss and Restoration. QHT Clinic. 
  8. Dr Batra's. (n.d.). No One in My Family Is Bald, Why Am I Losing Hair? Dr Batra's. 
  9. Medical News Today. (2019). What Causes Hair Loss in Men? Medical News Today. 
  10. Medical News Today. (2019). What Causes Hair Loss in Men? Medical News Today. 
  11. Dromics Labs. (n.d.). Early Signs of Genetic Hair Loss. Dromics Labs. 
  12. Dr Bonaros. (n.d.). The Biology of Hair Loss. Dr Bonaros. https://drbonaros.com/the-biology-of-hair-loss/

Read More Blogs

आनुवंशिक केस गळती कमी करण्याचे उपाय आणि उपचार

आनुवंशिक केस गळती कमी करण्याचे उपाय आणि उपचार

Quick Answer आनुवंशिक केस गळती पूर्णपणे बरी करता येत नसली, तरी लवकर निदान आणि योग्य ...

आनुवंशिक केस गळतीवर नैसर्गिक उपाय: योग्य आहार आणि निरोगी जीवनशैली

आनुवंशिक केस गळतीवर नैसर्गिक उपाय: योग्य आहार आणि निरोगी जीवनशैली

Quick Answer मिनॉक्सिडिल १०% हे तीव्र केसगळतीसाठी वापरले जाणारे उच्च-क्षमता असलेले ...

स्त्रियांसाठी मिनॉक्सिडिल: केसांच्या पुनर्वाढीसाठी संपूर्ण मार्गदर्शन

स्त्रियांसाठी मिनॉक्सिडिल: केसांच्या पुनर्वाढीसाठी संपूर्ण मार्गदर्शन

Quick Answer स्त्रियांसाठी मिनॉक्सिडिल हे केसविरळ होणे आणि आनुवंशिक केसगळती कमी करण...

केसगळती रोखण्यासाठी मिनॉक्सिडिल २%: वापर, परिणाम आणि दुष्परिणाम यांचे संपूर्ण मार्गदर्शन

केसगळती रोखण्यासाठी मिनॉक्सिडिल २%: वापर, परिणाम आणि दुष्परिणाम यांचे संपूर्ण मार्गदर्शन

Quick Answer मिनॉक्सिडिल २% हे आनुवंशिक केसगळतीमध्ये, विशेषतः सुरुवातीच्या टप्प्यात...

Popular Posts

Collapsible content

Disclaimers

The claims and results mentioned are based on multiple internal studies and customer research surveys that Traya has conducted with a statistically significant sample size of users who were under expert observation and guidance.

93% saw results*

Traya conducted an internal study over both men and females facing hair fall and 93% saw results* after using the complete Traya customized plan consistently for a period of 5 months. This study was conducted in December 2022.

5-month money-back guarantee

Traya’s 100% money-back policy is valid only if you have been regular with the complete customized plan for a period of 5 whole consecutive months. Each customised hair kit is valid for only 30 days. If any individual has not seen any regrowth or control in hair fall, you can ask for a refund. However, once you apply for the 5-month - money-back policy, the team would then do a thorough check on consumer regularity based on every order date. An exception to this policy is for those customers undergoing serious health conditions like autoimmune diseases and cancer.

Traya’s Holistic 3 Science Formula

Traya’s 3 Science Formula is a synergistic mix of Ayurveda, Allopathy & Food Science designed specifically to cater to hair fall conditions stemming from multiple root causes. With clinically tested ingredients and adaptogenic herbs, Traya’s Science-Backed formula clears internal blockages and boosts hair regeneration naturally. When blended with a healing dietary plan, it delivers great results in attaining long-term hair growth.

Traya Free hair test (™)

Traya’s Hair Dx test is powered by a proprietary algorithm to examine a user's hair & health profile. With the help of a distinctive image-capturing technique & physician- formulated examination, it is able to precisely check the type, stage & root causes of a certain hair fall condition.

2 lakh+ Indians

Traya Free hair test (™) has been taken by more than 2 lakh+ Indians - Data acquired from Traya customers.

Ayush Certified - Digest Boost, Cholest Vati and Consti Clear are Ayush Certified Products.

Traya’s Ayurvedic Products are based on natural and Ayurvedic formulations. These are completely safe for human use, but it is possible that certain ingredients may cause allergic reactions to some individuals.

Accurate hair check

The Traya free hair test (™) is a proprietary algorithm developed with the help of our in-house hair experts that provides Accurate hair and health checks, provided you mention all the correct details about yourself. It gives a precise checks about the type, stage and root cause of a specific hair fall condition.

Long Lasting Visible Hair Results

Traya’s complete customized plan gives visible and long-lasting results provided you’re on Traya’s hair maintenance kit. Since Traya works on the internal root causes of hair fall and hence our customers have seen long lasting results

Trusted by 100+ Hair Experts

Traya has been tried and loved by over 100 hair experts all over India to maintain healthy hair growth.

Award Winning Trusted Brand

India’s Healthcare Excellence initiated by Brands Impact has awarded Traya as the Most Effective Haircare Product of the Year 2022

FDA approved ingredients

These are completely safe for human use, but it is possible that certain ingredients may cause allergic reactions to some individuals.

Traya Women Santulan (™)

Traya’s Women Santulan is a unique technology that uses a combination of herbs treated in a specific manner (kalpa) to meet the bio-specific needs of women going through different stages of life. Santulan is a supplementary range to Traya’s 3 Science Formula which balances and nourishes the body inside-out delivering long-lasting hair growth results and overall health.

Hair Growth Plan starts at Rs 1699 pm* - The price mentioned is for a male of age 23 with stage 1 type hair fall based on the results of the hair test taken on the website. Prices may vary for individual customers depending on the results of the hair test and internal root causes

Hair Growth Plan starts at Rs 2000 pm* - The price mentioned is for a male of age 25 with stage 1 type hair fall based on the results of the hair test taken on the website. Prices may vary for individual customers depending on the results of the hair test and internal root causes.