icon Skip to content

आनुवंशिक केस गळती कमी करण्याचे उपाय आणि उपचार

Dr Kalyani Deshmukh

Dr Kalyani Deshmukh
Dr. Kalyani Deshmukh brings 7 years of experience in dermatology, specializing in the diagnosis of complex conditions and performing advanced dermatosurgical procedures. Her areas of expertise include clinical dermatology, trichology, dermatosurgery and aesthetic medicine.

आनुवंशिक केस गळती कमी करण्याचे उपाय आणि उपचार

Quick Answer

आनुवंशिक केस गळती पूर्णपणे बरी करता येत नसली, तरी लवकर निदान आणि योग्य उपचारांमुळे तिची प्रगती मंदावू शकते, शिल्लक केस टिकवता येऊ शकतात आणि काही लोकांमध्ये केसांची जाडी किंवा वाढ सुधारू शकते. परिणाम केसांच्या मुळांची स्थिती, निवडलेले उपचार आणि सातत्य यांवर अवलंबून असतात.

आनुवंशिक केस गळतीमुळे गळालेले केस कधीही पुन्हा उगवत नाही असे वाटते. परंतु, वैद्यकीय क्षेत्रातील आधुनिक प्रगतीमुळे तुमच्या डोक्यावरील केस पुन्हा उगवण्यास मदत होऊ शकते. यासाठी 'मिनॉक्सिडिल' (Minoxidil) आणि 'फिनॅस्टराईड' (Finasteride) सारखी वैद्यकीय औषधे, 'फॉलिक्युलर युनिट एक्स्ट्रॅक्शन' (FUE) आणि 'हेअर ट्रान्सप्लांट' सारखे शस्त्रक्रियेचे पर्याय, तसेच 'पीआरपी' (PRP) आणि 'एलएलएलटी' (LLLT - लो-लेव्हल लेझर थेरपी) सारखे अत्याधुनिक उपचार उपलब्ध आहेत.

जर तुमच्या कुटुंबात आनुवंशिक केस गळतीची समस्या असेल, तर ही समस्या आपल्याबाबतीतही कधी ना कधी घडेल असे वाटणे साहजिक आहे. परंतु, अशा प्रकारची केस गळती पूर्णपणे तुमच्या नियंत्रणाबाहेर नाही. तुम्ही तुमची जनुके (जीन्स) बदलू शकत नसलात, तरी डोक्यावर पुन्हा केस नक्कीच वाढवू शकता. अत्याधुनिक आनुवंशिक केस गळतीवरील उपचार केसांच्या मुळांना (Hair Follicles) पुन्हा वाढण्यास कशी मदत करतात, हे जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.

निरोगी टाळू (Scalp) आणि केसांनी भरलेले डोके, केस लांब असोत किंवा छोटे, कोणालाही स्वतःबद्दल आत्मविश्वास निर्माण करून देतात. परंतु, कपाळावरील मागे जाणारे केस किंवा टक्कल पडण्याचे चट्टे माणसाचा आत्मविश्वास कमी करू शकतात.

वयाच्या २० वर्षांनंतर अनेक पुरुष आणि स्त्रियांना आनुवंशिक केस गळतीची समस्या जाणवू लागते. मात्र, आता काळ बदलला आहे आणि त्यासोबतच 'आनुवंशिक केस गळतीमुळे गळालेले केस पुन्हा उगवू शकतात का?' या प्रश्नाचे उत्तरही बदलले आहे. पूर्वी ज्याला 'वाईट जनुके' (Bad Genetics) आणि कधीही बरे न होणारे मानले जायचे, त्यावर मात करणे आता शक्य झाले आहे. आता तुम्हाला आयुष्यभर आनुवंशिक केस गळतीशी संघर्ष करत राहण्याची गरज नाही. आधुनिक उपचार पद्धती आनुवंशिक टक्कल पडण्याच्या समस्येला पूर्णपणे नष्ट करू शकत नसल्या, तरी डोक्यावर केस पुन्हा उगवण्यासाठी त्या नक्कीच मदत करू शकतात.


आनुवंशिक केस गळती म्हणजे काय?

आनुवंशिक केस गळती, ज्याला 'अँड्रोजिनेटिक अलोपेसिया' (AGA) म्हणूनही ओळखले जाते, ही तुमच्या केसांच्या मुळांची (Hair Follicles) 'डायहायड्रोटेस्टोस्टेरॉन' (DHT) या हॉर्मोनशी असलेली अतिसंवेदनशीलता दर्शवते. हे हार्मोन केसांच्या मुळांना वाढीच्या टप्प्याकडून ('अॅनाजन फेझ') हळूहळू विश्रांतीच्या टप्प्याकडे ('टेलोजन फेझ') ढकलते. ज्यामुळे केसांची मुळे लहान होतात आणि केस दिवसेंदिवस बारीक होत जातात. कालांतराने, केसांची मुळे इतकी लहान होतात की, ती उघड्या डोळ्यांनी जवळजवळ दिसतही नाहीत आणि शेवटी टक्कल पडते.

केस गळणे हे आनुवंशिक असते हे आपल्याला माहीत असले, तरी हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे नक्की कसे जाते? याच्या नेमक्या पॅटर्नबद्दल अजूनही पुरेशी माहिती उपलब्ध नाही. पुरुषांमध्ये, याची पहिली लक्षणे म्हणजे कपाळावरील केस मागे जाणे किंवा कानांजवळील केस गळणे, ज्यामुळे हळूहळू पूर्ण टक्कल पडते. स्त्रियांमध्ये पूर्ण टक्कल पडत नाही; मात्र, त्यांच्या डोक्यावरील केस विरळ होतात किंवा भांग रुंद/पातळ होत जातो.

अनुवांशिक केस गळणे पूर्ववत किंवा थांबविले जाऊ शकते?

आनुवंशिक केस गळती मुळापासून पूर्णपणे बरी करता येत नाही, परंतु योग्य उपचार घेऊन तिचा वेग कमी करता येतो आणि काही प्रमाणात केस पुन्हा उगवू शकतात:

  • केसांची मुळे मजबूत करून केस बारीक होणे (Hair Thinning) रोखा.
  • टाळूचे (Scalp) संरक्षण करण्यासाठी डीएचटी (DHT) ची पातळी नैसर्गिकरीत्या कमी करा.
  • सर्वसमावेशक, नैसर्गिक किंवा वैद्यकीय उपचारांचा योग्य वापर करा.

तुम्ही जितक्या लवकर उपचार घ्यायला सुरुवात कराल, तितकी तुमचे केस टिकून राहण्याची आणि ते मजबूत असण्याची शक्यता जास्त वाढते.

आनुवंशिक केस गळतीसाठी उपचार (जेव्हा नैसर्गिक उपाय पुरेसे ठरत नाहीत)

हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की केसांची मुळे (Follicles) अचानक नष्ट होत नाहीत. ती आधी कमकुवत होतात आणि हीच पाऊल उचलण्याची योग्य वेळ असते.

जेव्हा आम्ही आनुवंशिक केस गळतीमुळे गळालेले केस पुन्हा उगवण्याबद्दल बोलतो , तेव्हा आम्ही हवेत गप्पा मारत नसतो. एफडीए (FDA) मान्यताप्राप्त आणि अनेक आधुनिक वैद्यकीय उपाय डोक्यावर केस पुन्हा उगवण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरत आहेत.

वैद्यकीय उपचार (Medical Treatments)

औषधोपचारांमध्ये 'एफडीए' (FDA) मान्यताप्राप्त पुढील प्रतिबंधात्मक औषधांचा वापर केला जातो:

  • टॉपिकल मिनॉक्सिडिल (Topical Minoxidil) हे औषध सुरुवातीला उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी विकसित केले गेले होते. हे टाळूतील रक्ताचा प्रवाह वाढवते, ज्यामुळे केसांच्या मुळांना वाढीसाठी अनुकूल वातावरण मिळते. हे सोल्यूशन (Liquid) आणि फोम (Foam) अशा दोन स्वरूपात उपलब्ध आहे. मिनॉक्सिडिल २% (स्त्रियांच्या चेहऱ्यावर केस उगवणे रोखण्यासाठी मिनॉक्सिडिल २% वापरण्याचा सल्ला दिला जातो) आणि मिनॉक्सिडिल ५% (पुरुषांसाठी शिफारस केलेले) या क्षमतेचे मिनॉक्सिडिल उपलब्ध आहेत.
  • फिनॅस्टराईड (Finasteride) हे औषध टेस्टोस्टेरॉनचे रूपांतर डीएचटीमध्ये करणाऱ्या '५-अल्फा-रिडक्टेस' या एन्झाईमला रोखते. डीएचटीची पातळी मर्यादित राहिल्यामुळे केसांच्या मुळांची वाढ होण्यास मदत होते. हे औषध जास्त करुन पुरुषांसाठी सुचविले जाते, तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने रजोनिवृत्तीनंतरच्या (Post-menopausal) स्त्रियांना दिले जाऊ शकते.
  • स्पायरनोलॅक्टोन (Spironolactone) हे औषध जास्त करुन स्त्रियांच्या केस गळतीवर ('फिमेल पॅटर्न हेअर लॉस') उपचार करण्यासाठी 'अँटी-अँड्रोजेन' म्हणून वापरले जाते. हे '१७a-हायड्रॉक्सिलेस' आणि 'डेस्मोलेस' या घटकांना थांबवते, ज्यामुळे मूत्रपिंडातील ग्रंथींमधून (Adrenal Gland) होणारी टेस्टोस्टेरॉनची निर्मिती कमी होते.

अत्याधुनिक उपचार पद्धती (Advanced Treatments)

ज्या व्यक्तींना शस्त्रक्रिया (Surgical Treatments) करायची नसते, त्यांचे केस पुन्हा उगवण्यासाठी काही आधुनिक पद्धती अत्यंत लोकप्रिय ठरल्या आहेत:

  • प्लेटलेट-रिच-प्लाझ्मा (PRP) थेरपी: पीआरपी उपचार पद्धती केस वाढवण्यासाठी शरीरातील नैसर्गिक उपचारांचा वापर करते. यामध्ये रुग्णाच्या शरीरातून थोडे रक्त काढले जाते, सेंट्रीफ्यूज (Centrifuge) यंत्राच्या मदतीने त्यातील प्लाझ्मा आणि प्लेटलेट्स वेगळे केले जातात आणि ते टाळूवरील केस कमी असलेल्या किंवा टक्कल पडलेल्या भागात इंजेक्ट केले जातात.
  • मायक्रो-नीडलिंग (Micro-needling): या तंत्रज्ञानामध्ये टाळूवर (Scalp) सुयांच्या साहाय्याने हजारो लहान-लहान सूक्ष्म छिद्रे तयार केले जातात. यामुळे त्वचेतील 'कोलाजन' (Collagen) तयार होण्याची क्रिया वाढते आणि वरून लावले जाणारे औषध किंवा तेल त्वचेत जास्त प्रमाणात शोषले जाते.
  • लो-लेव्हल लेझर थेरपी (LLLT): लेझर उपकरणांमधून लाल रंगाचा तरंगोत्सर्जन (Wavelengths) असलेला प्रकाश टाळूवर टाकतात, जो डोक्याच्या त्वचेमध्ये खोलवर जाऊन केसांच्या मुळांना सक्रिय करतो. यामुळे एटीपी (ATP - Adenosine Triphosphate) ची निर्मिती वाढते, तसेच डोक्याच्या त्वचेतील रक्ताचा प्रवाह सुधारतो आणि केसांची जास्त वाढ होण्यास मदत होते.

शस्त्रक्रियेचे पर्याय (Surgical Options)

आनुवंशिक केस गळतीवरील उपचारांमध्ये शस्त्रक्रियेचे पर्याय अधिक यशस्वी ठरले आहेत. 'अँड्रोजिनेटिक अलोपेसिया'मुळे झालेल्या गळालेले केस पुन्हा मिळवण्यासाठी प्रामुख्याने दोन प्रकारच्या हेअर सर्जरी केल्या जातात:

  • फॉलिक्युलर युनिट एक्स्ट्रॅक्शन (FUE): ही एक हेअर ट्रान्सप्लांट (केस रोपण) प्रक्रिया आहे, ज्यामध्ये डोक्याच्या निरोगी भागातून (साधारणपणे डोक्याच्या मागच्या बाजूने) केसांची मुळे (Follicles) काढून ती केस गळलेल्या किंवा टक्कल पडलेल्या भागात लावली जातात. या प्रक्रियेत अगदी कमीत कमी निशाण (Scarring) राहतात आणि केस जास्त नैसर्गिक दिसतात.
  • फॉलिक्युलर युनिट ट्रान्सप्लांटेशन (FUT): ही केस पुन्हा जिवंत करण्याची एक अशी पद्धत आहे, ज्यामध्ये डोक्याच्या मागच्या भागातून त्वचेची एक लहान पट्टी (Strip) कापली जाते आणि केसांच्या मुळांना स्वतंत्र फॉलिक्युलर युनिट्समध्ये वेगळे केले जाते. त्यानंतर या मुळांचे टक्कल पडलेल्या भागात प्रत्यारोपण केले जाते.

प्रतिबंधात्मक उपाय: आनुवंशिक केस गळतीचा वेग कमी करता येतो का?

प्रभावी उपचार पद्धतींसोबतच काही प्रतिबंधात्मक उपाय केले तर आनुवंशिक केस गळतीची गती कमी करण्यास मदत होऊ शकते:

  • सल्फेट फ्री शॅम्पू वापरल्यामुळे टाळूवरचे (Scalp) नैसर्गिक तेल टिकून राहण्यास मदत होते.
  • रोझमेरी किंवा भोपळ्याच्या बियांच्या तेलामध्ये कॅरिअर ऑईल (खोबरेल किंवा जोजोबा तेल) मिसळा. हे तेल कोमट करून टाळूवर हलक्या हाताने मालिश करा, ज्यामुळे रक्ताचा प्रवाह सुधारतो.
  • केस जास्त ताणून किंवा घट्ट बांधल्याने केसांच्या मुळांवर ताण येतो आणि केस गळतात, त्यामुळे केस घट्ट बांधणे टाळा.
  • केस सरळ करणारे (Straighteners), कुरळे करणारे (Curling irons) किंवा ड्रायर (Hair dryers) यांसारख्या उष्णता देणाऱ्या उपकरणांचा वापर टाळा, कारण यामुळे केस कमजोर होऊन जास्त तुटतात.
  • केसांना डाय (Dye) किंवा ब्लीच (Bleach) करणे टाळा. यामध्ये वापरले जाणारे केमिकल्स केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक असतात.
  • पौष्टिक आणि न्यूट्रीशन असलेला आहार घ्या. प्रथिने (Proteins), पोषक घटक, ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स, झिंक, पोटॅशियम, मॅग्नेशियम, जीवनसत्त्वे (Vitamins) आणि खनिजांनी (Minerals) परिपूर्ण असलेला निरोगी व संतुलित आहार घ्या.
  • पुरेसे पाणी प्या, रोज ८ ते ९ तासांची शांत झोप घ्या आणि शरीरातील 'कोर्टिसॉल' (तणावाचे हॉर्मोन) ची पातळी कमी करण्यासाठी दररोज योग किंवा ध्यान (Meditation) करा.

 

केसांची काळजी कशी घ्यावी आणि त्यांची निगा कशी राखावी?

आपण आनुवंशिक केस गळती पूर्णपणे थांबवू शकतो का? तर याचे उत्तर ‘नाही’ असे आहे. पण, वर सांगितलेल्या कोणत्याही उपचारांच्या मदतीने एकदा का तुमच्या केसांची वाढ स्थिर (Stabilise) झाली, की केसांची मजबुती आणि आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी सातत्याने काळजी घेणे आवश्यक असते.

  • वरील सर्व प्रक्रिया आणि उपचारांचे प्रत्यक्ष परिणाम दिसण्यासाठी साधारणपणे ४ ते ६ महिने लागतात. त्यामुळे औषधे आणि उपचारांमध्ये सातत्य ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
  • केस वाढण्यासाठी निरोगी जीवनशैली आणि चांगल्या सवयी रोज पाळा .
  • उपचारांनंतर केसांमध्ये होणाऱ्या बदलांवर लक्ष ठेवा. हे सर्व उपचार घेऊनही जर केस गळणे थांबत नसेल, तर त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

नैसर्गिक घटकांच्या मदतीने केसांच्या मुळांची वाढ सुधारण्यासाठी तुम्ही Traya च्या 'अल्टिमेट हेअर सप्लीमेंट्स कॉम्बो' (Ultimate Hair supplements Combo) चा विचार करू शकता. विज्ञानावर आधारित असा हा उपाय आयुर्वेद, ॲलोपॅथी आणि पोषण यांचा योग्य समतोल साधून बनवला आहे. यामध्ये बायोटिन, भृंगराज, अश्वगंधा, गिलोय (गुडुची), अर्जुन, भोपळ्याच्या बियांचा अर्क आणि ग्रीन टीचा अर्क यासारख्या खऱ्या आणि प्रभावी घटकांचा समावेश आहे.

 

सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

१. केस गळतीची सुरुवातीची लक्षणे कोणती असतात?

केस गळतीची सुरुवातीची लक्षणे खालीलप्रमाणे आहेत:

  • तुमच्या कंगव्यात, शॉवरच्या जाळीवर आणि उशीवर नेहमीपेक्षा जास्त केस दिसणे
  • जास्त प्रमाणात केस गळाल्यामुळे डोक्यावरील भांग रुंद/पातळ होणे
  • पुरुषांचे कपाळावरील केस मागे जाणे (Receding Hairline), जे कानापासून सुरू होऊन इंग्रजी 'M' आकारासारखे खोल होत जातात
  • टाळूवरील पूर्ण केस पातळ होऊन केसांचा दाटपणा आणि व्हॉल्यूम (Volume) कमी होणे
  • डोक्यावर टक्कल पडल्यासारखे गोल चट्टे (Bald Patches) दिसणे

२. डॉक्टरांचा किंवा त्वचारोगतज्ज्ञांचा (Dermatologist) सल्ला कधी घ्यावा?

खालील परिस्थितींमध्ये त्वरित त्वचारोगतज्ज्ञांशी संपर्क साधा:

  • टाळूवर (Scalp) सूज, जळजळ, खाज किंवा लालसरपणा येणे
  • वेगवेगळे उपचार करूनही सतत केस गळत राहणे
  • आनुवंशिक पॅटर्नपेक्षा वेगळ्या प्रकारे किंवा एकाच बाजूने (Asymmetric) केस विरळ होणे

३. ताणतणावाचा (Stress) आनुवंशिक केस गळतीवर कसा परिणाम होतो?

ताणतणावाचा आनुवंशिक केस गळतीशी थेट संबंध नसतो. परंतु, ताणतणावामुळे केस जास्त प्रमाणात गळण्याच्या टप्प्यात (Shedding Phase) जातात, ज्यामुळे केस गळतीची गती वाढू शकते.

४. नैसर्गिक डीएचटी ब्लॉकर्स (Natural DHT Blockers) खरोखर परिणामकारक असतात का?

सॉ पाल्मेटो (Saw Palmetto) किंवा भोपळ्याच्या बियांचा अर्क (Pumpkin Seed Extract) यांसारखे नैसर्गिक डीएचटी ब्लॉकर्स '५-अल्फा-रिडक्टेस' या एन्झाईमला वाढण्यापासून थांबतात, जे टेस्टोस्टेरॉनचे रूपांतर डीएचटीमध्ये करते. पण, हे उपाय सौम्य असतात आणि वैद्यकीय औषधांच्या तुलनेत कमी प्रभावी ठरतात.

५. केस गळतीवरील आधुनिक उपचार दीर्घकालीन वापर करण्यासाठी सुरक्षित आहेत का?

होय, 'टॉपिकल मिनॉक्सिडिल' आणि 'फिनॅस्टराईड'सारखे आधुनिक केस गळतीवरील सर्व उपचार 'एफडीए' (FDA) द्वारे मान्य केलेले आहेत आणि ते तज्ज्ञ डॉक्टरांच्या कडक देखरेखीखाली वापरले जातात.

६. स्त्रिया पुरुषांसारखेच उपचार घेऊ शकतात का?

'फिनॅस्टराईड' (Finasteride) वगळता 'टॉपिकल मिनॉक्सिडिल', 'लो-लेव्हल लेझर थेरपी' (LLLT) आणि 'पीआरपी' (PRP) यांसारखे उपचार पुरुष आणि स्त्री दोघांसाठीही योग्य आहेत. फिनॅस्टराईड हे औषध महिलांना फक्त रजोनिवृत्तीनंतरच (Post-menopause) दिले जाते, कारण गर्भधारणेच्या काळात त्याचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात.

**संदर्भ : **

Read More Blogs

आनुवंशिक केस गळतीवर नैसर्गिक उपाय: योग्य आहार आणि निरोगी जीवनशैली

आनुवंशिक केस गळतीवर नैसर्गिक उपाय: योग्य आहार आणि निरोगी जीवनशैली

Quick Answer मिनॉक्सिडिल १०% हे तीव्र केसगळतीसाठी वापरले जाणारे उच्च-क्षमता असलेले ...

स्त्रियांसाठी मिनॉक्सिडिल: केसांच्या पुनर्वाढीसाठी संपूर्ण मार्गदर्शन

स्त्रियांसाठी मिनॉक्सिडिल: केसांच्या पुनर्वाढीसाठी संपूर्ण मार्गदर्शन

Quick Answer स्त्रियांसाठी मिनॉक्सिडिल हे केसविरळ होणे आणि आनुवंशिक केसगळती कमी करण...

केसगळती रोखण्यासाठी मिनॉक्सिडिल २%: वापर, परिणाम आणि दुष्परिणाम यांचे संपूर्ण मार्गदर्शन

केसगळती रोखण्यासाठी मिनॉक्सिडिल २%: वापर, परिणाम आणि दुष्परिणाम यांचे संपूर्ण मार्गदर्शन

Quick Answer मिनॉक्सिडिल २% हे आनुवंशिक केसगळतीमध्ये, विशेषतः सुरुवातीच्या टप्प्यात...

मिनोक्सिडिल आणि केसांची पुनर्वाढ: पुरुषांसाठी संपूर्ण माहिती

मिनोक्सिडिल आणि केसांची पुनर्वाढ: पुरुषांसाठी संपूर्ण माहिती

Quick Answer मिनोक्सिडिल पुरुषांमधील आनुवंशिक केसगळती (Male Pattern Baldness) कमी करण्...

Popular Posts

Collapsible content

Disclaimers

The claims and results mentioned are based on multiple internal studies and customer research surveys that Traya has conducted with a statistically significant sample size of users who were under expert observation and guidance.

93% saw results*

Traya conducted an internal study over both men and females facing hair fall and 93% saw results* after using the complete Traya customized plan consistently for a period of 5 months. This study was conducted in December 2022.

5-month money-back guarantee

Traya’s 100% money-back policy is valid only if you have been regular with the complete customized plan for a period of 5 whole consecutive months. Each customised hair kit is valid for only 30 days. If any individual has not seen any regrowth or control in hair fall, you can ask for a refund. However, once you apply for the 5-month - money-back policy, the team would then do a thorough check on consumer regularity based on every order date. An exception to this policy is for those customers undergoing serious health conditions like autoimmune diseases and cancer.

Traya’s Holistic 3 Science Formula

Traya’s 3 Science Formula is a synergistic mix of Ayurveda, Allopathy & Food Science designed specifically to cater to hair fall conditions stemming from multiple root causes. With clinically tested ingredients and adaptogenic herbs, Traya’s Science-Backed formula clears internal blockages and boosts hair regeneration naturally. When blended with a healing dietary plan, it delivers great results in attaining long-term hair growth.

Traya Free hair test (™)

Traya’s Hair Dx test is powered by a proprietary algorithm to examine a user's hair & health profile. With the help of a distinctive image-capturing technique & physician- formulated examination, it is able to precisely check the type, stage & root causes of a certain hair fall condition.

2 lakh+ Indians

Traya Free hair test (™) has been taken by more than 2 lakh+ Indians - Data acquired from Traya customers.

Ayush Certified - Digest Boost, Cholest Vati and Consti Clear are Ayush Certified Products.

Traya’s Ayurvedic Products are based on natural and Ayurvedic formulations. These are completely safe for human use, but it is possible that certain ingredients may cause allergic reactions to some individuals.

Accurate hair check

The Traya free hair test (™) is a proprietary algorithm developed with the help of our in-house hair experts that provides Accurate hair and health checks, provided you mention all the correct details about yourself. It gives a precise checks about the type, stage and root cause of a specific hair fall condition.

Long Lasting Visible Hair Results

Traya’s complete customized plan gives visible and long-lasting results provided you’re on Traya’s hair maintenance kit. Since Traya works on the internal root causes of hair fall and hence our customers have seen long lasting results

Trusted by 100+ Hair Experts

Traya has been tried and loved by over 100 hair experts all over India to maintain healthy hair growth.

Award Winning Trusted Brand

India’s Healthcare Excellence initiated by Brands Impact has awarded Traya as the Most Effective Haircare Product of the Year 2022

FDA approved ingredients

These are completely safe for human use, but it is possible that certain ingredients may cause allergic reactions to some individuals.

Traya Women Santulan (™)

Traya’s Women Santulan is a unique technology that uses a combination of herbs treated in a specific manner (kalpa) to meet the bio-specific needs of women going through different stages of life. Santulan is a supplementary range to Traya’s 3 Science Formula which balances and nourishes the body inside-out delivering long-lasting hair growth results and overall health.

Hair Growth Plan starts at Rs 1699 pm* - The price mentioned is for a male of age 23 with stage 1 type hair fall based on the results of the hair test taken on the website. Prices may vary for individual customers depending on the results of the hair test and internal root causes

Hair Growth Plan starts at Rs 2000 pm* - The price mentioned is for a male of age 25 with stage 1 type hair fall based on the results of the hair test taken on the website. Prices may vary for individual customers depending on the results of the hair test and internal root causes.