icon Skip to content

आनुवंशिक केस गळतीवर नैसर्गिक उपाय: योग्य आहार आणि निरोगी जीवनशैली

Dr Kalyani Deshmukh

Dr Kalyani Deshmukh
Dr. Kalyani Deshmukh brings 7 years of experience in dermatology, specializing in the diagnosis of complex conditions and performing advanced dermatosurgical procedures. Her areas of expertise include clinical dermatology, trichology, dermatosurgery and aesthetic medicine.

आनुवंशिक केस गळतीवर नैसर्गिक उपाय: योग्य आहार आणि निरोगी जीवनशैली

Quick Answer

मिनॉक्सिडिल १०% हे तीव्र केसगळतीसाठी वापरले जाणारे उच्च-क्षमता असलेले टॉपिकल उपचार आहे, मात्र मिनॉक्सिडिल ५% पेक्षा ते अधिक प्रभावी असल्याचे ठोस पुरावे मर्यादित आहेत. त्यामुळे बहुतेक लोकांसाठी ५% हा तुलनेने सुरक्षित आणि विश्वासार्ह पर्याय मानला जातो, तर १०% चा वापर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करणे योग्य ठरते. मिनॉक्सिडिल १०% वापरताना सुरुवातीला केसगळती वाढणे, टाळूला खाज, लालसरपणा किंवा कोरडेपणा यांसारखे दुष्परिणाम होऊ शकतात. काही गंभीर प्रकरणांमध्ये हृदयाचे ठोके वाढणे, छातीत दुखणे, चक्कर येणे किंवा डोकेदुखी यांसारखे त्रासही होऊ शकतात. त्यामुळे मिनॉक्सिडिल १०% सुरू करण्यापूर्वी त्याची गरज आणि सुरक्षितता त्वचारोगतज्ज्ञांकडून तपासून घेणे महत्त्वाचे आहे.


'अँड्रोजिनेटिक अलोपेसिया' (Androgenetic Alopecia) म्हणजेच आनुवंशिक केस गळती. यामुळे पुरुषांचे कपाळावरील केस मागे जाणे किंवा टक्कल पडणे, तसेच स्त्रियांच्या डोक्यावरील संपूर्ण केस विरळ होणे अशी लक्षणे दिसतात. जर तुम्ही ‘आनुवंशिक केस गळती नैसर्गिकरीत्या कशी थांबवावी?’ असा विचार करत असाल, तर ही केस गळती पूर्णपणे थांबवणे शक्य नसते. पण तिची गती नक्कीच कमी करता येते. पोषक आहार, जीवनशैलीतील बदल आणि नैसर्गिक उपाय यांचा योग्य समतोल साधून आनुवंशिक केस गळतीची गती कमी करता येते. आनुवंशिक केस गळती पूर्णपणे थांबवता आली नाही, तरी टाळूचे आरोग्य सुधारण्यास आणि केसांची मुळे मजबूत होण्यास नक्कीच मदत होते.

दिवसाला ५० ते १०० केस गळणे ही सामान्य गोष्ट आहे आणि हे गळालेले केस काही दिवसांत परत उगवतात. परंतु, जर तुमचे केस खूप जास्त प्रमाणात गळत असतील आणि टक्कल पडण्यासारखी स्थिती निर्माण होत असेल, तर ही गोष्ट काळजी करण्यासारखी आहे. आजारपण, वाढते वय, मानसिक ताण (स्ट्रेस), हार्मोन्समधील बदल किंवा आनुवंशिक कारणे तुमचे केस पुन्हा उगवण्याच्या नैसर्गिक चक्रात अडथळा आणू शकतात. विशेष करुन जर कुटुंबात आधीपासूनच केस गळतीची समस्या असेल, तर ते जास्त चिंतेचे कारण ठरू शकते. अशा वेळी उत्तम आहार आणि जीवनशैलीतील बदल आनुवंशिक केस गळती कमी करण्यासाठी मदत करू शकतात. याविषयी अधिक सविस्तर जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.

‘केस’ हा आपल्या सौंदर्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे ज्यांचे केस खूप जास्त गळतात किंवा डोक्यावर टक्कल दिसू लागते, त्यांना स्वतःच्या दिसण्याबद्दल न्यूनगंड किंवा अस्वस्थता वाटू लागते. केस गळणे ही एक अत्यंत सामान्य समस्या असून, पुरुष आणि स्त्री दोघांनाही या समस्येला सामोरे जावे लागते. वाढते वय, आजारपण, बदलती जीवनशैली, ताणतणाव, हार्मोन्समधील बदल किंवा आनुवंशिकता या सर्व कारणांमुळे केस गळू शकतात.

म्हणूनच, केस गळती सुरू होताच उपाय आणि काळजी घेणे सुरू केले पाहिजे. असे केल्यास केस जास्त काळ निरोगी राहण्यास मदत होते. त्यामुळे जर तुम्हाला 'आनुवंशिक केस गळती नैसर्गिकरीत्या कशी थांबवावी?' याचे उत्तर हवे असेल, तर हा लेख तुमच्यासाठीच आहे.

आनुवंशिक केस गळती समजून घेऊया

टक्कल पडणे किंवा 'अँड्रोजिनेटिक अलोपेसिया' (AGA) ही केस गळतीची सर्वात चिंताजनक आणि सामान्य समस्या आहे. ही समस्या वयात आल्यानंतर सुरू होते आणि वयानुसार जास्त वाढत जाते. या प्रकारचे टक्कल आनुवंशिक (पिढीजात) असल्यामुळे, जेव्हा आपण आपले आई, वडील, आजी, आजोबा किंवा भाऊ, बहिणींना या त्रासातून जाताना पाहतो, तेव्हा साहजिकच भीती किंवा चिंता वाटू शकते.

ही आनुवंशिक केस गळती तुमच्या हातात नसली, तरीही केसांची चांगली वाढ व्हावी यासाठी तुम्ही निरोगी जीवनशैलीचा अवलंब करू शकता. यामुळे केस गळती नैसर्गिकरीत्या कमी करण्यास मदत होऊ शकते.

आनुवंशिक केस गळती म्हणजे काय?

'अँड्रोजिनेटिक अलोपेसिया' किंवा आनुवंशिक केस गळती ही जनुकांमुळे (जीन्समुळे) निर्माण होणारी एक समस्या आहे. ज्यामुळे पुरुष आणि स्त्री दोघांनाही प्रचंड केस गळती आणि केस विरळ होण्याचा त्रास होतो. मात्र, केस गळण्याचे प्रमाण हे आहार, धूम्रपान आणि जीवनशैलीतील इतर घटकांमुळे कमी-जास्त होऊ शकते.

सामान्यपणे टक्कल पडण्याची समस्या जास्त प्रमाणात पुरुषांमध्ये आढळून येते. ज्यात वयात आल्यानंतर केस गळण्यास सुरुवात होते. परंतु, ही समस्या स्त्रियांमध्येही तितकीच दिसून येते. स्त्रियांमध्ये ही समस्या वयाच्या उत्तरार्धात, विशेष करुन रजोनिवृत्तीनंतर (Post-Menopause) जास्त दिसून येते. कारण या काळात महिलांच्या शरीरात स्त्री संप्रेरकांच्या (Female Hormones) तुलनेत पुरुष संप्रेरकांचे (Male Hormones) प्रमाण वाढते.

आनुवंशिक केस गळती कशामुळे होते?

'अँड्रोजिनेटिक अलोपेसिया' (AGA) म्हणजेच ‘आनुवंशिक केस गळती’ ही समस्या आनुवंशिकतेमुळे होते हे सर्वांनाच माहिती आहे. ही समस्या कुटुंबात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कशी जाते? याचा नेमका पॅटर्न अजून स्पष्ट झालेला नाही. तरीही, ही समस्या एकापेक्षा जास्त जनुकांमुळे (जीन्समुळे) होते असे मानले जाते. यामध्ये 'अँड्रोजन रिसेप्टर' (Androgen Receptor) या एकच जनुकाचा (जीन्सचा) संबंध पूर्णपणे स्पष्ट झालेला आहे.

कुटुंबात पुरुषांमध्ये टक्कल पडण्याची समस्या असेल तर समजून घेणे सोपे जाते. पण, तरीही केस गळतीचा पॅटर्न प्रत्येकामध्ये वेगवेगळा असू शकतो. इतकेच नाही, तर अगदी जुळ्या भावांमध्येही केस गळतीचे प्रमाण कमी अधिक असू शकते.

आपले केस वाढण्याचे चक्र 'अॅनाजन फेज' (Anagen Phase) ने सुरू होते, जो केसांच्या वाढीचा सर्वात मोठा टप्पा असतो आणि तो २ ते ६ वर्षे टिकून राहतो. परंतु, आनुवंशिक केस गळतीमध्ये वाढीचा हा काळ कमी होऊन फक्त १ वर्षाचा राहतो आणि गळण्याच्या टप्प्यात ('टेलोजन फेज' Telogen Phase) असणाऱ्या केसांचे प्रमाण वाढते.

संशोधनानुसार असे दिसून आले आहे की, जनुकांमधील बदलांमुळे (Genetic Variants) ही केस गळती होते. वैज्ञानिक अभ्यासातून मिळालेल्या माहितीनुसार, 'एआर जीन' (AR Gene) हा केस गळतीचे मुख्य कारण आहे. जो अँड्रोजन रिसेप्टर्स बनवण्याचे काम करतो. हे असे प्रोटीन असते जे 'डीएचटी' (DHT) आणि इतर अँड्रोजन हार्मोन्सला प्रतिसाद देते. या एआर जीन (AR Gene) मध्ये बदल झाल्यामुळे अँड्रोजन रिसेप्टर्स जास्त सक्रिय होतात आणि त्यामुळे केसांच्या मुळांवर त्यांचा चुकीचा परिणाम होऊन केस गळू लागतात.

संप्रेरके (हार्मोन्स) आणि डीएचटी (DHT) ची भूमिका

पुरुषांचे टक्कल पडणे (Male Pattern Baldness)

पुरुषांमध्ये केस गळतीसाठी मुख्यतः 'डायहायड्रोटेस्टोस्टेरॉन' (DHT) हे संप्रेरक कारणीभूत असते. टेस्टोस्टेरॉनपासून तयार होणारे हे हॉर्मोन (DHT) त्याला संवेदनशील असलेल्या केसांच्या मुळांवर परिणाम करते. त्यामुळे विशेषतः कपाळावरील, डोक्याच्या मध्यभागी असलेले (क्राउन) केस विरळ होतात. केस मोठ्या प्रमाणात विरळ झाल्यास बाजूच्या भागातही केस पातळ होऊ लागतात.

हळूहळू, डीएचटी (DHT) पुरुषांच्या केसांची मुळे लहान करते, ज्यामुळे कपाळावरील केस मागे जाऊन 'M' आकाराचा पॅटर्न तयार होतो. त्यामुळे, दाट आणि निरोगी केस बारीक, हलके, लहान होतात आणि शेवटी त्यांची वाढ पूर्णपणे थांबते. ही प्रक्रिया हळूहळू पुढे सरकत राहते आणि केस गळती वाढत जाते.

स्त्रियांचे टक्कल पडणे (Female Pattern Baldness)

स्त्रियांमध्ये केस गळतीचे प्रमाण पुरुषांइतके जास्त नसते आणि स्त्रियांचे पूर्ण टक्कल पडण्याची शक्यता फार कमी असते. स्त्रियांची केस गळती ही 'लुडविग पॅटर्न' (Ludwig Pattern) मध्ये होते, ज्यामध्ये डोक्याच्या मधोमध असलेला भांग रुंद होत जातो. स्त्रियांच्या केस गळतीचा थेट संबंध हार्मोन्सच्या असंतुलनाशी (Hormonal Imbalances) असतो, ज्यामुळे पीसीओएस (PCOS) सारख्या समस्या उद्भवतात. याशिवाय, रजोनिवृत्तीदरम्यान (Menopause) होणाऱ्या बदलांमुळे कपाळावरील केस विरळ होऊ शकतात.

मासिक पाळीच्या काळात तरुण स्त्रियांमध्ये लोहाची (Iron) कमतरता निर्माण होऊ शकते, त्यामुळे सुद्धा केस गळती होऊ शकते.

आनुवंशिक केस गळती वाढवणारे इतर घटक

आनुवंशिक कारणांशिवाय, खालील घटकदेखील आनुवंशिक केस गळतीची समस्या जास्त वाढवण्यास कारणीभूत ठरतात:

  • धूम्रपान करणे (Smoking)

  • जंक फूड आणि पौष्टिक घटकांची कमतरता असलेला अयोग्य आहार

  • अपुरी झोप

  • सततचा किंवा तीव्र मानसिक ताण (Chronic Stress)

आनुवंशिक केस गळतीची लक्षणे आणि सुरुवातीची चिन्हे

दिवसाला साधारण ५० ते १०० केस गळणे हे सामान्य आहे. पण, त्याहून जास्त केस गळत असतील तर ते काळजीचे कारण असू शकते. जर तुम्हाला बाथरूमच्या जाळीत किंवा उशीवर नेहमीपेक्षा जास्त केस दिसू लागले, तर हे आनुवंशिक केस गळतीचे पहिले चिन्ह असू शकते. याशिवाय इतर काही प्रमुख लक्षणे खालीलप्रमाणे:

  • डोक्याच्या मध्यभागी (क्राऊन भागात) केस विरळ होणे

  • कपाळावरील केस मागे जाणे (Receding Hairline)

  • आंघोळ करताना किंवा केस विंचरताना खूप जास्त केस गळणे (विशेषतः वजन कमी झाले असल्यास किंवा शरीरात प्रथिनांची कमतरता असल्यास)

  • डोक्याचा भांग रुंद/पातळ होत जाणे

  • केसांचा दाटपणा कमी होणे

आनुवंशिक केस गळती कमी करण्यासाठी आहारातील महत्त्वाचे बदल

निरोगी आणि मजबूत केसांचा मार्ग तुमच्या आहारातूनच जातो. जीवनसत्त्वे (व्हिटॅमिन्स) आणि खनिजे (मिनरल्स) यांनी परिपूर्ण असलेले अन्न हे आनुवंशिक केस गळती नैसर्गिकरीत्या कमी करण्यासाठी सर्वात चांगले माध्यम आहे.

प्रथिने (प्रोटिन) असणारे अन्नपदार्थ

केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी पोषक घटक आणि प्रथिने असलेले पुढील पदार्थ तुमच्या आहारात नक्की समाविष्ट करा:

  • हिरव्या पालेभाज्या

  • अंडी

  • डाळी आणि कडधान्ये

  • ग्रीक योगर्ट (घट्ट दही)

  • सुकामेवा (नट्स) आणि विविध बिया (बियाणे)

ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स आणि अँटीऑक्सिडंट्स

'मेडिटेरेनियन' (भूमध्य सागरी) आहारात संपृक्त चरबी (Saturated Fats) आणि प्राणिजन्य प्रथिने कमी प्रमाणात असतात. खरं पाहायचं तर, या आहारात असंपृक्त चरबी (Unsaturated Fats), पॉलिफेनॉल्स, अँटीऑक्सिडंट्स, फायबर (तंतूमय पदार्थ) आणि दाहक-विरोधी (Anti-inflammatory) घटक जास्त प्रमाणात असतात, जे केसांच्या वाढीस मदत करतात.

याशिवाय तुम्ही तुमच्या आहारात ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स भरपूर प्रमाणात असणारा सुकामेवा, विविध बिया आणि साल्मन माशांचा समावेश करू शकता.

केसांची काळजी घेण्याच्या साध्या सोप्या पद्धती

तुमच्या केसांची ताणाताण करण्यापासून काळजी घ्या. केसांची योग्य आणि सौम्य पद्धतीने काळजी घेतली, तर केस गळणे कमी करता येते. विशेषतः ज्यांची आनुवंशिक केस गळती होत असेल त्यांच्यासाठी हे जास्त फायद्याचे ठरते.

  • शरीरात पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी दिवसाला किमान ८ ते १० ग्लास पाणी प्या.

  • ओले केस वाळवण्यासाठी मायक्रोफायबर टॉवेलचा (Microfiber Towel) वापर करा.

  • केस स्वच्छ धुण्यासाठी सल्फेट फ्री (Sulphate-free) शॅम्पू आणि कंडिशनर वापरा.

  • ओले केस विंचरताना आणि गुंता काढण्यासाठी मोठ्या दातांच्या फणीचा/कंगव्याचा वापर करा.

  • केस खूप घट्ट बांधणे टाळा. यामुळे केसांच्या मुळांवर ताण पडतो आणि केस जास्त तुटतात.

  • स्त्रियांनी केस कुरळे करण्याचे (Curling Iron), सरळ करण्याचे (Straightener) किंवा ड्रायरने वाळवण्याचे प्रकार टाळावेत किंवा कमीत कमी करावेत. अशा उपकरणांमुळे केसांची मुळे कमकुवत होतात आणि केस जास्त गळू लागतात.

डीएचटी (DHT) नैसर्गिकरीत्या कमी करण्यासाठी पुरावा असलेले (Evidence-based) उपाय

शरीरातील 'डीएचटी'ची पातळी कमी करण्यासाठी आणि टाळूचे आरोग्य सुधारण्यासाठी तुम्ही नैसर्गिक उपाय करू शकता. पुरुष आणि स्त्रियांची आनुवंशिक केस गळती नैसर्गिकरीत्या कशी कमी करावी, याचे काही प्रभावी उपाय खालीलप्रमाणे:

  • डीएचटी रोखणारे अन्नपदार्थ (DHT-Blocking Foods), जसे की भोपळ्याच्या बिया (यामध्ये झिंक आणि फायटोस्टेरॉल्स असतात, जे डीएचटी ब्लॉक करतात), ग्रीन टी (यामध्ये 'EGCG' [Epigallocatechin gallate] हा घटक असतो, जो '5-अल्फा-रिडक्टेस' या एन्झाईमचा प्रभाव थांबवतो), पालक आणि केल (यांच्यात मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात), टोमॅटो (यामध्ये 'लायकोपीन' [Lycopene] हे अत्यंत उपयुक्त असलेले अँटीऑक्सिडंट असते), केळी (यामध्ये पोटॅशियम आणि व्हिटॅमिन B6 भरपूर प्रमाणात असते), सुकामेवा आणि बिया (विशेषतः जवस आणि अक्रोड) आहारात समाविष्ट करावे.

  • वनस्पती असलेले हर्बल सप्लीमेंट्स (सॉ पाल्मेटो [Saw Palmetto], स्टिंगिंग नेटल रूट (खाजखुजलीची मुळे), ज्येष्ठमध [Licorice Root] आणि पुदिन्याचा चहा [Spearmint Tea]) यांचा आहारात समावेश करा; कारण यामध्ये नैसर्गिकरीत्या 'अँटी-अँड्रोजेनिक' गुणधर्म असतात.

  • केसांच्या मुळांपर्यंत रक्ताचा प्रवाह वाढवण्यासाठी हाताच्या बोटांनी हलक्या हाताने डोक्याची मालिश करा. रोझमेरी, भोपळ्याच्या बिया, टी ट्री ऑइल आणि पेपरमिंट (पुदिना) या तेलांचे काही थेंब कॅरिअर ऑईलमध्ये (खोबरेल तेल किंवा जोजोबा तेल) मिसळून वापरणे जास्त फायद्याचे ठरते.

  • ताणतणाव आणि आनुवंशिक केस गळतीचा थेट संबंध नसला, तरी ताणतणावामुळे होणारी केस गळती टक्कल पडण्याच्या समस्येचा वेग वाढवू शकते. यासाठी ध्यान (Meditation) किंवा योगा करा. रोज कमीतकमी ३५ मिनिटे चाला, जॉगिंग करा, पोहा किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग करा. तसेच, स्नायूंना विश्रांती देण्यासाठी दररोज ८ ते ९ तासांची पुरेशी झोप घ्या.

  • दारू, कॅफिन, प्रक्रिया केलेली साखरेची उत्पादने आणि धूम्रपान करणे टाळा. कारण हे घटक शरीरातील हार्मोन्सच्या कामामध्ये अडथळा निर्माण करतात.

  • ५-अल्फा-रिडक्टेस (5-alpha-reductase) हे एन्झाइम टेस्टोस्टेरॉनचे डीएचटी (DHT) मध्ये रूपांतर करते. हे एन्झाइम रोखल्यास शरीरातील डीएचटीचे प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकते. फिनास्टेराइड (Finasteride) आणि ड्युटास्टेराइड (Dutasteride) यांसारखी परिणामकारक औषधे ५-अल्फा-रिडक्टेसच्या टाइप १ आणि टाइप २ या दोन्हीही प्रकारांवर काम करून टेस्टोस्टेरॉनचे डीएचटीमध्ये होणारे रूपांतर थांबवतात.

आनुवंशिक केस गळतीमुळे निराशा येणे साहजिक आहे. पण, हे नैसर्गिक उपाय नियमित केल्यास केस गळतीचा वेग कमी होतो आणि केस मजबूत होण्यास मदत होते. जास्त परिणामकारक उपचारांसाठी तुम्ही Traya च्या 'अल्टिमेट हेअर सप्लीमेंट्स कॉम्बो' (Ultimate Hair supplements combo)चा वापर करू शकता. यामध्ये केसांच्या वाढीसाठी 'हेअर रस' (Hair Ras) आणि केसांचे पोषण सुधारण्यासाठी 'हेअर व्हिटॅमिन' (Hair Vitamin) चा समावेश आहे. यात भृंगराज, अश्वगंधा, गिलोय (गुडुची), बायोटिन, भोपळ्याच्या बियांचा अर्क आणि ग्रीन टीचा अर्क यांसारख्या सर्वोत्तम नैसर्गिक घटकांचा समावेश असून, हे आयुर्वेद, ॲलोपॅथी आणि न्यूट्रीशनचा योग्य समतोल आहे.

सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

१. नैसर्गिक उपायांचा परिणाम दिसण्यासाठी किती वेळ लागतो?

नैसर्गिक उपायांचे परिणाम दिसण्यासाठी साधारण ३ ते ६ महिने लागू शकतात.

२. आनुवंशिक केस गळती पूर्णपणे थांबवता येऊ शकते का?

आनुवंशिक केस गळती पूर्णपणे थांबवता येत नाही. परंतु, काही विशिष्ट नैसर्गिक उपाय करून तिची गती कमी करता येऊ शकते.

३. आनुवंशिक केस गळतीची समस्या किती प्रमाणात आढळते?

आनुवंशिक केस गळती ही अत्यंत सामान्य समस्या असून, सुमारे ५०% पुरुष आणि स्त्रियांमध्ये आनुवंशिक केस गळती दिसून येते.

४. आनुवंशिक केस गळतीमुळे गेलेले केस पुन्हा पूर्ववत होऊ शकतात का?

नाही, आनुवंशिक केस गळती पूर्णपणे पूर्ववत करता येत नाही. पण, वर सांगितलेल्या पद्धतींचा वापर करून केस तुटण्यापासून रोखता येतात. सुरुवातीच्या टप्प्यातच नैसर्गिक उपाय केल्यास केसांचा दाटपणा जास्त काळासाठी टिकवून ठेवण्यास मदत होते.

५. डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

जरी हे घरगुती उपाय केस गळती कमी करण्यास मदत करत असले, तरी काही वेळा वैद्यकीय सल्ल्याची आवश्यकता असते. खालील लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या:

  • डोक्यावर टक्कल पडल्यासारखे गोल चट्टे (Bald Patches) दिसणे

  • टाळूवर (Scalp) तीव्र खाज सुटणे, जळजळ होणे किंवा लालसरपणा येणे

  • केस गळतीवरील उपचार सुरू केल्यानंतरही जास्त प्रमाणात केस गळणे

६. फक्त योग्य आहार घेऊन आनुवंशिक केस गळती थांबवता येऊ शकते का?

झिंक, लोह, प्रथिने (प्रोटिन), मॅग्नेशियम, ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स, अँटीऑक्सिडंट्स आणि आवश्यक जीवनसत्त्वे असलेला पौष्टिक आहार तुमच्या केसांना पोषण देऊ शकतो. पण, फक्त चांगला आहार पुरेसा ठरत नाही. निरोगी जीवनशैलीतील बदल आनुवंशिक केस गळती पूर्णपणे रोखू शकत नसले, तरी तिचा प्रभाव काही काळासाठी नक्कीच पुढे ढकलू शकतात.

संदर्भ : 

Popular Posts

Collapsible content

Disclaimers

The claims and results mentioned are based on multiple internal studies and customer research surveys that Traya has conducted with a statistically significant sample size of users who were under expert observation and guidance.

93% saw results*

Traya conducted an internal study over both men and females facing hair fall and 93% saw results* after using the complete Traya customized plan consistently for a period of 5 months. This study was conducted in December 2022.

5-month money-back guarantee

Traya’s 100% money-back policy is valid only if you have been regular with the complete customized plan for a period of 5 whole consecutive months. Each customised hair kit is valid for only 30 days. If any individual has not seen any regrowth or control in hair fall, you can ask for a refund. However, once you apply for the 5-month - money-back policy, the team would then do a thorough check on consumer regularity based on every order date. An exception to this policy is for those customers undergoing serious health conditions like autoimmune diseases and cancer.

Traya’s Holistic 3 Science Formula

Traya’s 3 Science Formula is a synergistic mix of Ayurveda, Allopathy & Food Science designed specifically to cater to hair fall conditions stemming from multiple root causes. With clinically tested ingredients and adaptogenic herbs, Traya’s Science-Backed formula clears internal blockages and boosts hair regeneration naturally. When blended with a healing dietary plan, it delivers great results in attaining long-term hair growth.

Traya Free hair test (™)

Traya’s Hair Dx test is powered by a proprietary algorithm to examine a user's hair & health profile. With the help of a distinctive image-capturing technique & physician- formulated examination, it is able to precisely check the type, stage & root causes of a certain hair fall condition.

2 lakh+ Indians

Traya Free hair test (™) has been taken by more than 2 lakh+ Indians - Data acquired from Traya customers.

Ayush Certified - Digest Boost, Cholest Vati and Consti Clear are Ayush Certified Products.

Traya’s Ayurvedic Products are based on natural and Ayurvedic formulations. These are completely safe for human use, but it is possible that certain ingredients may cause allergic reactions to some individuals.

Accurate hair check

The Traya free hair test (™) is a proprietary algorithm developed with the help of our in-house hair experts that provides Accurate hair and health checks, provided you mention all the correct details about yourself. It gives a precise checks about the type, stage and root cause of a specific hair fall condition.

Long Lasting Visible Hair Results

Traya’s complete customized plan gives visible and long-lasting results provided you’re on Traya’s hair maintenance kit. Since Traya works on the internal root causes of hair fall and hence our customers have seen long lasting results

Trusted by 100+ Hair Experts

Traya has been tried and loved by over 100 hair experts all over India to maintain healthy hair growth.

Award Winning Trusted Brand

India’s Healthcare Excellence initiated by Brands Impact has awarded Traya as the Most Effective Haircare Product of the Year 2022

FDA approved ingredients

These are completely safe for human use, but it is possible that certain ingredients may cause allergic reactions to some individuals.

Traya Women Santulan (™)

Traya’s Women Santulan is a unique technology that uses a combination of herbs treated in a specific manner (kalpa) to meet the bio-specific needs of women going through different stages of life. Santulan is a supplementary range to Traya’s 3 Science Formula which balances and nourishes the body inside-out delivering long-lasting hair growth results and overall health.

Hair Growth Plan starts at Rs 1699 pm* - The price mentioned is for a male of age 23 with stage 1 type hair fall based on the results of the hair test taken on the website. Prices may vary for individual customers depending on the results of the hair test and internal root causes

Hair Growth Plan starts at Rs 2000 pm* - The price mentioned is for a male of age 25 with stage 1 type hair fall based on the results of the hair test taken on the website. Prices may vary for individual customers depending on the results of the hair test and internal root causes.