Quick Answer
मिनॉक्सिडिल हे केसगळती कमी करण्यास आणि आधीपासून अस्तित्वात असलेल्या कमकुवत किंवा निष्क्रिय केसांच्या मुळांना पुन्हा सक्रिय करून केसांची वाढ सुधारण्यास मदत करू शकते; मात्र ते नवीन हेअर फॉलिकल्स तयार करत नाही. सुरुवातीच्या किंवा मध्यम अवस्थेतील आनुवंशिक केसगळतीमध्ये, विशेषतः क्राउन/व्हर्टेक्स भागात, याचा फायदा अधिक होऊ शकतो. परिणाम दिसण्यासाठी काही महिने लागू शकतात आणि उपचार बंद केल्यास मिळालेली केसांची वाढ हळूहळू कमी होऊ शकते. मिनॉक्सिडिल केसगळतीच्या मूळ कारणांवर उपचार करत नसल्यामुळे, पोषणाची कमतरता, हार्मोनल बदल किंवा ताण यांसारख्या कारणांकडेही लक्ष देणे महत्त्वाचे आहे.
मिनॉक्सिडिल नवीन केसांच्या मुळांची (Hair Follicles) निर्मिती करत नाही. मात्र, निष्क्रिय (Dormant) झालेल्या केसांच्या मुळांना पुन्हा सक्रिय करून विरळ झालेल्या भागात नवीन केस उगवण्यासाठी मदत करू शकते. जर तुमचे केस गेल्या ५ वर्षांच्या आत गळायला सुरुवात झाली असेल आणि टाळूच्या वरच्या (Crown/Vertex) भागात केस विरळ झाले असतील, तर मिनॉक्सिडिलचा चांगला फायदा होऊ शकतो.
परंतु, अनेक वर्षांपासून टक्कल पडले असेल किंवा त्या भागात कायमस्वरूपी जखम (Scarring) झाली असेल, तर अपेक्षित केसांची वाढ होण्याची शक्यता कमी असते. तसेच, उपचार अर्धवट थांबवल्यास झालेली केसांची वाढही हळूहळू कमी होऊ शकते.
मिनॉक्सिडिल केस गळण्याचा वेग कमी करण्यास मदत करू शकते. मात्र, शरीरातील केस गळण्यामागील मूळ कारणांवर ते उपचार करत नाही. त्यामुळे दीर्घकाळ परिणाम मिळवण्यासाठी केस गळण्याच्या मूळ कारणांवर उपचार करणेही तितकेच आवश्यक आहे.
जर तुमचे केस गळत असतील, तर मिनॉक्सिडिलबद्दल तुम्ही नक्कीच ऐकले असेल. कदाचित ते तुम्ही मेडिकलमध्ये पाहिले असेल, इंटरनेटवर त्याबद्दल वाचले असेल किंवा नक्कीच ऐकलं असेल आणि तेव्हा मनात पहिला प्रश्न येतो : मिनॉक्सिडिलमुळे खरोखर नवीन केस उगवतात का, की फक्त केस गळण्याचा वेग कमी होतो?
या लेखात आपण मिनॉक्सिडिलमागील वैज्ञानिक तथ्ये सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तसेच, ते नेमके कुठे प्रभावी ठरते आणि कोणत्या बाबतीत त्याच्या मर्यादा आहेत, हेही जाणून घेऊया.
मिनॉक्सिडिल म्हणजे काय?
केस गळतीवर सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या औषधांपैकी मिनॉक्सिडिल हे एक आहे. केस गळण्याची समस्या कमी करण्यासाठी आणि विरळ झालेल्या भागात पुन्हा केसांची वाढ होण्यास मदत करण्यासाठी याचा वापर केला जातो. पुरुष आणि महिलांमधील आनुवंशिक केस गळतीवर (Androgenetic Alopecia) परिणामकारक ठरलेल्या मोजक्या उपचारांपैकी हा एक उपचार आहे.
मिनॉक्सिडिल २% आणि ५% सोल्यूशन, ५% फोम तसेच कमी डोसच्या गोळ्यांच्या स्वरूपात उपलब्ध आहे. टाळूवर लावायचे सोल्यूशन किंवा फोम बहुतांश वेळा डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळू शकते. मात्र, मिनॉक्सिडिलच्या गोळ्या केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्याव्यात.
हे औषध थेट टाळूवर काम करते. कमजोर केसांच्या मुळांना पुन्हा सक्रिय करण्यास ते मदत करू शकते. पण शरीरात कोणत्या कारणामुळे केस गळत आहेत; जसे की हार्मोन्समधील बदल, पोषणाची कमतरता किंवा ताण तणाव यावर मिनॉक्सिडिल उपचार करत नाही.
मिनॉक्सिडिल केसांच्या मुळांवर कसे काम करते?
मिनॉक्सिडिलचा वापर अनेक वर्षांपासून केला जात असला, तरी ते नेमके कसे काम करते? याबद्दल अजूनही संशोधन सुरू आहे. मात्र, आतापर्यंतच्या अभ्यासांमधून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, मिनॉक्सिडिल केसांच्या मुळांवर (Hair Follicles) अनेक प्रकारे परिणाम करते आणि त्यामुळे केसांच्या वाढीस मदत होते. चला, मिनॉक्सिडिल नेमके कोणत्या प्रकारे केसांच्या मुळांवर काम करते ते समजून घेऊया:
टाळूतील रक्तप्रवाह सुधारण्यास मदत करते
मिनॉक्सिडिल हे वासोडायलेटर (Vasodilator) प्रकारातील औषध आहे. म्हणजेच, ते टाळूभोवतीच्या सूक्ष्म रक्तवाहिन्या थोड्या रुंद होण्यास मदत करते. त्यामुळे केसांच्या मुळांपर्यंत ऑक्सिजन, पोषक घटक आणि केसांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले घटक अधिक चांगल्या प्रकारे पोहोचतात. यामुळे केसांच्या मुळांना वाढीसाठी अनुकूल वातावरण मिळते.
केसांच्या विश्रांतीच्या टप्प्याचा कालावधी कमी करते
प्रत्येक केस वाढीच्या ठरावीक चक्रातून जातो. या चक्रामध्ये वाढ (Growth), विश्रांती (Rest) आणि गळणे (Shedding) या टप्प्यांचा समावेश होतो. मिनॉक्सिडिल विश्रांतीच्या अवस्थेत असलेल्या केसांच्या मुळांना पुन्हा वाढीच्या टप्प्यात जाण्यास मदत करते. यामुळे उपचार सुरू केल्यानंतर पहिल्या काही आठवड्यांत केस थोडे जास्त गळत असल्याचे जाणवू शकते. ही प्रक्रिया अनेकदा नवीन केसांच्या वाढीचा नैसर्गिक भाग असते. म्हणजेच, जुने केस गळून त्यांच्या जागी नवीन केस येण्यासाठी केसांची मुळे पुन्हा सक्रिय होत असतात.
केसांची वाढ होण्याचा काळ अधिक वेळ टिकवून ठेवते
मिनॉक्सिडिल केवळ केसांच्या विश्रांतीचा टप्पा कमी करत नाही, तर त्यांच्या वाढीचा टप्पा अधिक काळ टिकवून ठेवण्यासही मदत करते. त्यामुळे प्रत्येक केसाला दीर्घकाळ वाढण्याची संधी मिळते. नियमित वापरामुळे कालांतराने केस अधिक दाट, मजबूत आणि लांब दिसू शकतात.
केसांच्या मुळांचा आकार वाढवण्यास मदत करते
आनुवंशिक केसगळतीमध्ये DHT (डायहायड्रोटेस्टोस्टेरॉन) या हार्मोनमुळे केसांची मुळे हळूहळू लहान होत जातात. त्यामुळे केस पातळ, कमकुवत आणि लवकर गळतात. मिनॉक्सिडिल या प्रक्रियेचा परिणाम काही प्रमाणात कमी करण्यास मदत करते. त्यामुळे आधीपासून अस्तित्वात असलेल्या केसांच्या मुळांमधून अधिक जाड आणि मजबूत केस वाढू शकतात.
मात्र, एक गोष्ट लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. मिनॉक्सिडिल नवीन केसांची मुळे तयार करत नाही. ते फक्त टाळूवर आधीपासून असलेल्या, पण निष्क्रिय किंवा कमकुवत झालेल्या केसांच्या मुळांना पुन्हा सक्रिय करण्याचे काम करते. म्हणूनच, "मिनॉक्सिडिलमुळे अगदी नवीन केस तयार होतात का?" या प्रश्नाचे सरळ उत्तर आहे, नाही! ते नवीन केसांची निर्मिती करत नाही, तर अस्तित्वात असलेल्या केसांच्या मुळांची कार्यक्षमता सुधारण्यास मदत करते.
मिनॉक्सिडिलमुळे नवीन केस उगवतात का?
काही प्रमाणात नक्कीच!
वैज्ञानिक संशोधनानुसार, मिनॉक्सिडिल नवीन केसांची मुळे (Hair Follicles) तयार करत नाही. मात्र, टाळूखाली अजूनही जिवंत असलेल्या पण निष्क्रिय किंवा कमकुवत झालेल्या केसांच्या मुळांना पुन्हा सक्रिय करण्यास ते मदत करू शकते. त्यामुळे विरळ झालेल्या भागात पुन्हा केस येऊ लागतात आणि ते नवीन केस उगवल्यासारखे वाटते. प्रत्यक्षात मात्र, हे केस आधीपासून असलेल्या केसांच्या मुळांची पुन्हा सुरू झालेली वाढ असते.
खालील परिस्थितीत मिनॉक्सिडिलचा चांगला फायदा होऊ शकतो:
-
केसांची मुळे ५ वर्षांपेक्षा कमी काळापासून निष्क्रिय असतील.
-
डोक्याच्या मधल्या किंवा मागील वरच्या भागातील (क्राउन/व्हर्टेक्स) केस विरळ झाले असतील.
-
आनुवंशिक केसगळती (Androgenetic Alopecia) सुरुवातीच्या किंवा मध्यम टप्प्यात असेल.
खालील परिस्थितीत मिनॉक्सिडिलचा परिणाम मर्यादित असू शकतो
-
ज्या भागात पूर्णपणे टक्कल पडले आहे आणि केसांची मुळेच उरलेली नाहीत.
-
कपाळावर (Hairline) केस वाढवण्यासाठी. कारण मिनॉक्सिडिलला अधिकृत मान्यता मुख्यतः डोक्याच्या क्राउन (Vertex) भागासाठी आहे, हेअरलाइनसाठी नाही.
-
अनेक वर्षांपासून केस गळत असतील आणि केसांची मुळे दीर्घकाळ निष्क्रिय झाली असतील.
म्हणूनच, मिनॉक्सिडिलचा परिणाम प्रत्येक व्यक्तीमध्ये सारखा नसतो. केसगळती किती जुनी आहे, कोणत्या भागात आहे आणि केसांची मुळे अजूनही सक्रिय होण्याच्या स्थितीत आहेत का, यावर त्याचा परिणाम अवलंबून असतो.
मिनॉक्सिडिलमुळे स्त्रियांना सुद्धा नवीन केस येऊ शकतात का?
होय. मिनॉक्सिडिलचा फायदा स्त्रियांनाही होऊ शकतो. विशेषतः स्त्रियांमध्ये होणाऱ्या आनुवंशिक केसगळतीवर (Female Pattern Hair Loss) हा प्रभावी उपचार मानला जातो आणि त्याला FDA ची मान्यताही मिळालेली आहे. साधारणपणे २% मिनॉक्सिडिल सोल्यूशन डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय वापरता येते. मात्र, ५% मिनॉक्सिडिल फोम वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे अधिक योग्य ठरते, कारण प्रत्येकाची केसगळती आणि टाळूची स्थिती वेगळी असू शकते.
या उपचाराच्या परिणामकारकतेबाबत झालेल्या ४८ आठवड्यांच्या क्लिनिकल अभ्यासात ३८१ स्त्रियांचा समावेश होता. या अभ्यासात ५% टॉपिकल मिनॉक्सिडिल वापरणाऱ्या स्त्रियांमध्ये केसांची संख्या वाढल्याचे आणि टाळूवरील विरळ भागाचे कव्हरेज सुधारल्याचे आढळले. प्लेसिबो (औषध नसलेला उपचार) वापरणाऱ्या स्त्रियांच्या तुलनेत हा फरक लक्षणीय होता.
मिनॉक्सिडिल कोणासाठी योग्य ठरू शकते?
पुरुष आणि महिलांमधील अँड्रोजेनेटिक अलोपेशिया (Pattern Hair Loss) या प्रकारच्या केसगळतीसाठी टॉपिकल मिनॉक्सिडिल हा सर्वात प्रभावी आणि प्राथमिक उपचार मानला जातो. तुमच्या केसगळतीचे कारण आणि टाळूची स्थिती तपासल्यानंतर डॉक्टर पुढील परिस्थितींमध्ये मिनॉक्सिडिल वापरण्याचा सल्ला देऊ शकतात:
-
तुम्हाला सौम्य ते मध्यम स्वरूपाचा अँड्रोजेनेटिक अलोपेशिया असल्याचे निदान झाले असेल.
-
तुमची केसगळती नुकतीच सुरू झाली असेल आणि केसांची मुळे (Hair Follicles) अजूनही सक्रिय असतील.
-
तुम्ही गर्भवती नसाल किंवा बाळाला स्तनपान करत नसाल.
-
तुम्ही दररोज नियमितपणे आणि दीर्घकाळ मिनॉक्सिडिल वापरण्याची तयारी ठेवत असाल.
मिनॉक्सिडिलचे परिणाम दिसण्यासाठी लागणारा वेळ :
मिनॉक्सिडिल वापरणारे अनेक जण उपचार अर्धवट सोडून देतात. यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे नेमके परिणाम कधी दिसतील आणि कसे दिसतील पुरेशी माहिती नसणे. मिनॉक्सिडिलचा परिणाम प्रत्येकासाठी वेगळा असू शकतो. तरीही, उपचारादरम्यान साधारणपणे कोणते बदल दिसू शकतात, याची माहिती खाली दिलेली आहे.
|
कालावधी |
अनुभव कसा असेल? |
याचा अर्थ काय? |
|
पहिले १ ते ६ आठवडे |
केसगळती तात्पुरती वाढल्यासारखी वाटू शकते. |
ही टेलोजन इफ्लुवियम (Telogen Effluvium) नावाची नैसर्गिक प्रक्रिया आहे. मिनॉक्सिडिल विश्रांतीच्या अवस्थेतील जुने केस गळून नवीन केसांना वाढण्यासाठी जागा तयार करते. ही तात्पुरती प्रक्रिया असून घाबरण्याचे कारण नाही. उपचार सुरूच ठेवा. |
|
२ ते ३ महिने |
बारीक, मऊ आणि फिकट रंगाचे (Vellus) केस दिसू लागतात. |
याचा अर्थ निष्क्रिय झालेली केसांची मुळे पुन्हा सक्रिय होत आहेत. नव्या केसांच्या वाढीची ही सुरुवातीची सकारात्मक चिन्हे आहेत. |
|
४ ते ६ महिने |
केस अधिक दाट दिसू लागतात आणि केसगळती कमी होते. |
या काळात मिनॉक्सिडिलचे स्पष्ट परिणाम दिसू लागतात. संशोधनानुसार बहुतेक लोकांना याच कालावधीत केसांच्या वाढीत लक्षणीय सुधारणा जाणवते. |
|
१२ महिने |
सर्वोत्तम परिणाम दिसतात. |
सातत्याने वापर केल्यास साधारण एक वर्षानंतर मिनॉक्सिडिलचा कमाल फायदा दिसतो. त्यानंतर परिणाम स्थिर होण्याची (Plateau) शक्यता असते. |
मिनॉक्सिडिल वापरणे बंद केल्यास केसांचे काय होते?
मिनॉक्सिडिल सुरू करण्यापूर्वी अनेक जण या महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. मिनॉक्सिडिल केसगळती कायमची थांबवत नाही, तर ती नियंत्रित ठेवण्यास मदत करते. त्यामुळे उपचार बंद केल्यानंतर त्याचा परिणाम हळूहळू कमी होऊ लागतो. मिनॉक्सिडिल वापरणे थांबवल्यानंतर साधारणपणे पुढील बदल दिसू शकतात:
-
टाळूची स्थिती पुन्हा पूर्ववत होऊ लागते.
-
साधारण १२ ते १६ आठवड्यांत मिनॉक्सिडिलमुळे वाढलेले किंवा टिकून राहिलेले केस गळू लागतात.
-
३ ते ६ महिन्यांत बहुतेक लोकांच्या केसांची स्थिती उपचार सुरू करण्यापूर्वी जशी होती, तशीच पुन्हा होऊ शकते.
-
काही व्यक्तींमध्ये, उपचार सुरू करण्यापूर्वीपेक्षाही केसांची घनता कमी झाल्याचे जाणवू शकते.
-
मिनॉक्सिडिलमुळे मिळालेले परिणाम कायमस्वरूपी नसतात. ते टिकवून ठेवण्यासाठी नियमित आणि सातत्यपूर्ण वापर आवश्यक असतो.
-
त्यामुळे मिनॉक्सिडिल सुरू करणे म्हणजे दीर्घकालीन उपचार आहे.
-
मिनॉक्सिडिल बंद केल्यावर फक्त केसांची वाढ थांबत नाही, तर उपचारादरम्यान मिळालेला फायदा देखील हळूहळू नाहीसा होतो.
मिनॉक्सिडिलचे फायदे आणि मर्यादा
|
फायदे |
मर्यादा |
|
FDA मान्यताप्राप्त आणि वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले. |
नवीन केसांची मुळे (Hair Follicles) तयार करत नाही. |
|
टॉपिकल मिनॉक्सिडिलसाठी बहुतेक वेळा डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची गरज नसते. |
अपेक्षित परिणाम दिसण्यासाठी अनेक महिने लागू शकतात. |
|
पुरुष आणि स्त्रिया दोघांसाठीही उपयुक्त. |
चांगले परिणाम टिकवून ठेवण्यासाठी दीर्घकाळ नियमित वापर आवश्यक. |
|
विरळ झालेले केस दाट दिसण्यास मदत करते आणि निष्क्रिय केसांच्या मुळांना पुन्हा सक्रिय करू शकते. |
वापरणे बंद केल्यास मिळालेले परिणाम हळूहळू नाहीसे होतात. |
|
सोल्यूशन, फोम आणि ओरल टॅब्लेट अशा विविध स्वरूपात उपलब्ध. |
पूर्णपणे टक्कल पडलेल्या किंवा व्रण (Scarring) असलेल्या भागांवर फारसा परिणाम होत नाही. |
|
सातत्याने वापर केल्यास साधारण १२ महिन्यांत परिणाम दिसू शकतो. |
पोषणाची कमतरता, हार्मोन्समधील असंतुलन, ताणतणाव किंवा इतर मूळ कारणांवर उपचार करत नाही. |
मिनॉक्सिडिलचे संभाव्य दुष्परिणाम
मिनॉक्सिडिल वापरताना काही दुष्परिणाम जाणवू शकतात. मात्र, त्वचेवर लावण्यात येणाऱ्या (Topical) मिनॉक्सिडिलचे बहुतांश दुष्परिणाम सौम्य असतात आणि योग्य काळजी घेतल्यास ते नियंत्रणात ठेवता येतात. दुसरीकडे, ओरल मिनॉक्सिडिल (गोळी) शरीरात शोषले जात असल्याने त्याचे दुष्परिणाम अधिक गंभीर असू शकतात. त्यामुळे ते फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावे.
टॉपिकल मिनॉक्सिडिलचे सामान्य दुष्परिणाम
-
टाळूला खाज येणे किंवा जळजळ होणे.
-
उपचाराच्या सुरुवातीच्या काही आठवड्यांत केसगळती तात्पुरती वाढणे.
-
विशेषतः स्त्रियांच्या चेहऱ्यावर नको असलेल्या केसांची वाढ होणे.
-
टाळू कोरडा पडणे, कोंड्यासारखे पापुद्रे येणे किंवा त्वचा सोलणे.
ओरल मिनॉक्सिडिलचे गंभीर दुष्परिणाम
ओरल मिनॉक्सिडिल ही फक्त टाळूवर लावायची औषधी नसून ती रक्तप्रवाहात मिसळते. त्यामुळे तिचा परिणाम संपूर्ण शरीरावर होऊ शकतो. म्हणूनच ती केवळ डॉक्टरांच्या देखरेखीखालीच वापरावी.
-
चक्कर येणे किंवा डोके हलके वाटणे.
-
शरीरात पाणी साचणे (Fluid Retention) आणि सूज येणे.
-
हृदयाचे ठोके वेगाने वाढणे. (Tachycardia)
-
डोळ्यांच्या आसपास सूज येणे. (Periorbital Edema)
फक्त मिनॉक्सिडिल पुरेसे का ठरत नाही?
अशी चार प्रमुख कारणे आहेत, ज्यावर मिनॉक्सिडिल थेट काम करू शकत नाही:
-
पोषणाची कमतरता: लोह (Iron), बायोटिन, प्रथिने आणि झिंक यांसारख्या आवश्यक पोषक घटकांची कमतरता असल्यास केसांच्या मुळांना वाढीसाठी आवश्यक पोषण मिळत नाही.
-
हार्मोन्समधील असंतुलन: थायरॉईडचे विकार, PCOS किंवा प्रसूतीनंतर होणारे हार्मोनल बदल यांमुळे होणारी केसगळती केवळ मिनॉक्सिडिलने पूर्णपणे नियंत्रित होत नाही.
-
दीर्घकाळचा ताण (Chronic Stress): सततचा ताण वाढल्याने शरीरातील कॉर्टिसॉल हार्मोनची पातळी वाढते. त्यामुळे केसांची मुळे वेळेपूर्वी विश्रांतीच्या (Resting) अवस्थेत जातात आणि केसगळती वाढू शकते.
-
आतड्यांचे खराब आरोग्य (Poor Gut Health): आहार योग्य असला तरी शरीर आवश्यक पोषक तत्त्वे व्यवस्थित शोषून घेत नसेल, तर त्याचा परिणाम केसांच्या आरोग्यावर होतो.
याच कारणामुळे अनेक लोक मिनॉक्सिडिल नियमित वापरूनही काही काळानंतर अपेक्षित सुधारणा थांबल्याचे (Plateau) अनुभवतात किंवा परिणाम अपुरे राहतात. कारण उपचार फक्त टाळूवर होत असतात, तर केसगळतीचे मूळ कारण शरीराच्या आत कायम राहते.
याच समस्येवर सर्वांगीण दृष्टिकोनातून उपाय करण्यासाठी Traya ची उपचार पद्धती विकसित करण्यात आली आहे.
केसगळतीवर मूळापासून उपचार: Traya चा सर्वांगीण दृष्टिकोन!
मिनॉक्सिडिलचा परिणाम प्रामुख्याने टाळूवरील केसांच्या मुळांपर्यंत मर्यादित असतो. मात्र, Traya केवळ बाह्य उपचारांवर अवलंबून राहत नाही. आयुर्वेद, आधुनिक हेअर सायन्स आणि पोषणशास्त्र (Nutrition) या तीन शाखांचा समन्वय साधून केसगळतीमागील मूळ कारणांवर काम करण्याचा प्रयत्न करते.
-
केसांच्या मुळांना नैसर्गिक पोषण देणे
मिनॉक्सिडिल कृत्रिम पद्धतीने रक्तवाहिन्यांना प्रसरण पावण्यास मदत करून केसांच्या मुळांपर्यंत रक्तपुरवठा वाढवते. आयुर्वेदात भृंगराज ही वनस्पतीही याच प्रकारे केसांच्या मुळांना सक्रिय करण्यास मदत करते, असे मानले जाते. Traya चे Hair Ras हे सप्लिमेंट भृंगराजसह निवडक आयुर्वेदिक घटकांच्या मदतीने केसांच्या मुळांचे पोषण करण्यासाठी तयार करण्यात आले आहे.
-
पोषणातील कमतरता भरून काढणे
मिनॉक्सिडिल केसांच्या वाढीचा कालावधी वाढवू शकते, पण केसांच्या मुळांना आवश्यक पोषक घटक पुरवू शकत नाही. शरीरात बायोटिन, लोह (Iron) किंवा झिंक यांसारख्या पोषक तत्त्वांची कमतरता असल्यास केसांची वाढ मर्यादित राहू शकते. ही कमतरता लक्षात घेऊन Traya ने पुरुषांसाठी Hair Vitamin आणि स्त्रियांसाठी Hair Vitamin For Her तयार केले आहेत. हे सप्लिमेंट्स केसांच्या मुळांना आवश्यक असलेले पोषक घटक शरीरातून उपलब्ध करून देण्यास मदत करतात.
-
पोषक तत्त्वांचे योग्य शोषण होण्यास मदत
संतुलित आहार घेत असलात तरी शरीर पोषक तत्त्वे योग्य प्रकारे शोषून घेत नसेल, तर त्याचा फायदा केसांच्या मुळांपर्यंत पोहोचत नाही. मिनॉक्सिडिल या समस्येवर उपाय देत नाही. Traya चे Health Tatva पचनसंस्था आणि पोषक तत्त्वांचे शोषण सुधारण्यास मदत करण्यासाठी तयार करण्यात आले आहे, जेणेकरून आहारातील आवश्यक पोषण केसांच्या मुळांपर्यंत प्रभावीपणे पोहोचू शकेल.
-
ताणामुळे होणारी केसगळती कमी करण्यासाठी
योग्य आहार आणि पोषण असूनही सततचा ताण (Chronic Stress) केसगळती वाढवू शकतो. ताणामुळे शरीरातील कॉर्टिसॉल हार्मोनची पातळी वाढते आणि केसांची मुळे पुन्हा विश्रांतीच्या अवस्थेत जाऊ शकतात. Traya चे Calm Ras ताणाशी संबंधित या प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करून तणावामुळे होणारी केसगळती कमी करण्यास मदत करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आले आहे.
-
टाळूची बाहेरूनही योग्य काळजी
अंतर्गत उपचारांबरोबरच टाळूची योग्य निगा राखणेही महत्त्वाचे आहे. Scalp Oil आणि Growth Oil Shots मध्ये कोल्ड-प्रेस्ड तेलांसह आयुर्वेदिक घटकांचा समावेश असून ते केसांच्या मुळांचे बाहेरून पोषण करण्यासाठी वापरले जातात.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
1. पूर्णपणे टक्कल पडलेल्या भागावर मिनॉक्सिडिलमुळे नवीन केस उगवू शकतात का?
नाही. मिनॉक्सिडिल प्रभावीपणे काम करण्यासाठी जिवंत केसांची मुळे (Hair Follicles) असणे आवश्यक असते. जर त्या भागातील केसांची मुळे पूर्णपणे नष्ट झाली असतील किंवा टाळूवर कायमस्वरूपी व्रण (Scarring) असतील, तर मिनॉक्सिडिलचा अपेक्षित फायदा मिळत नाही. त्यामुळे केसगळतीच्या सुरुवातीच्या टप्प्यात उपचार सुरू केल्यास चांगले परिणाम मिळण्याची शक्यता अधिक असते.
2. मिनॉक्सिडिलचे परिणाम दिसण्यासाठी किती वेळ लागतो?
मिनॉक्सिडिलचा परिणाम एका रात्रीत दिसत नाही. बहुतेक लोकांमध्ये नियमित वापरानंतर ४ ते ६ महिन्यांत केसांच्या वाढीतील सुरुवातीची सुधारणा दिसू लागते. सातत्याने उपचार सुरू ठेवल्यास साधारण १२ महिन्यांनंतर त्याचा सर्वोत्तम परिणाम दिसून येतो.
3. मिनॉक्सिडिल सुरू केल्यानंतर सुरुवातीला केसगळती का वाढते?
मिनॉक्सिडिल वापरण्याच्या सुरुवातीच्या काही आठवड्यांत केसगळती वाढल्यासारखी वाटू शकते. या प्रक्रियेला टेलोजन इफ्लुवियम (Telogen Effluvium) म्हणतात. या काळात विश्रांतीच्या अवस्थेतील जुने केस गळून नवीन केसांच्या वाढीसाठी जागा तयार होते. ही अवस्था साधारण २ ते ६ आठवडे टिकू शकते आणि अनेकदा उपचार प्रभावीपणे सुरू असल्याचे लक्षण मानली जाते. त्यामुळे या टप्प्यावर उपचार थांबवू नयेत.
4. मिनॉक्सिडिल इतर केसगळतीवरील उपचारांसोबत वापरता येते का?
होय. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मिनॉक्सिडिल इतर उपचारांसोबत वापरता येऊ शकते. पुरुषांमध्ये ते फिनास्टेराइड (Finasteride) सोबत दिले जाऊ शकते. तसेच आयुर्वेदिक सप्लिमेंट्स, पोषणपूरक (Nutritional Supplements) आणि टाळूची काळजी घेणारे उपचार यांसोबतही त्याचा वापर केला जाऊ शकतो. मात्र, कोणतेही उपचार एकत्र सुरू करण्यापूर्वी त्वचारोगतज्ज्ञ किंवा हेअर एक्स्पर्टचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
5. मिनॉक्सिडिलचा परिणाम काही काळानंतर कमी झाला तर काय करावे?
जर सुमारे १२ महिन्यांनंतर मिनॉक्सिडिलचा परिणाम स्थिर झाला किंवा अपेक्षित सुधारणा दिसेनाशी झाली, तर त्यामागे पोषणाची कमतरता, हार्मोन्समधील असंतुलन किंवा दीर्घकाळचा ताण यांसारखी मूळ कारणे असू शकतात. अशा वेळी केवळ मिनॉक्सिडिलवर अवलंबून न राहता, केसगळतीमागील मूळ कारणे शोधून त्यावर सर्वांगीण (Holistic) उपचार करणे अधिक फायदेशीर ठरू शकते.





























