Quick Answer
केसांची मुळे हळूहळू लहान होणे (Hair Miniaturization) हे आनुवंशिक केसगळतीचे सुरुवातीचे लक्षण आहे. ही प्रक्रिया हळूहळू आणि नकळत होत असल्यामुळे बहुतेक लोकांच्या ती लगेच लक्षात येत नाही. शरीरात तयार होणारे DHT हे हार्मोन कालांतराने केसांच्या मुळांचा आकार लहान करते. त्यामुळे केसांच्या प्रत्येक वाढीच्या चक्रासोबत केस आधीपेक्षा पातळ, फिकट आणि लहान होत जातात.
यावर वेळेवर उपचार केले नाहीत, तर कालांतराने केसांची मुळे केसांची वाढ पूर्णपणे थांबवू शकतात. मात्र, ही प्रक्रिया सुरुवातीलाच लक्षात आली, तर तिचा वेग कमी करण्याची आणि आधी गळालेले केस पुन्हा उगवण्याची संधी अजूनही असते.
सारांश
बहुतेक लोकांना केस विरळ होत आहे असे जाणवले की, त्यामागे ताणतणाव किंवा ऋतुमानानुसार होणारी केसगळती असेल असे वाटते. पण तुमचे केस कालांतराने जास्त पातळ, लहान आणि फिकट होत असतील, तर त्यामागे इतर कारणे सुद्धा असू शकतात. तुमच्या केसांच्या मुळांचा आकार लहान होत असतो, यालाच हेअर मिनिएचरायझेशन (Hair Miniaturization) म्हणतात आणि हे आनुवंशिक केसगळतीचे सर्वात सुरुवातीचे जैविक लक्षण आहे.
हे लक्षण दिसून येईपर्यंत ही प्रक्रिया अनेक महिन्यांपासून, तर कधी कधी अनेक वर्षांपासून सुरू असू शकते. हा ब्लॉग तुम्हाला ही प्रक्रिया सुरुवातीच्या टप्प्यात कशी ओळखावी? ती कशामुळे होत आहे? हे समजून घेण्यास आणि त्यासाठी तुम्ही काय करू शकता? हे जाणून घेण्यास मदत करेल.
मिनिएचराइज्ड (लहान मुळे असलेले) केस कसे दिसतात?
तुम्ही डोक्याच्या वरच्या भागातून किंवा कपाळावरील पुढच्या केसांमधून हात फिरवला आणि बाकीच्या केसांच्या तुलनेत काही केस असामान्यपणे पातळ वाटले, तर हे केसांच्या मुळांचा आकार कमी होत असल्याचे लक्षण असू शकते. खाली निरोगी केस आणि मिनिएचराइज्ड (लहान मुळे असलेले) केस यातील फरक दिला आहे:
| वैशिष्ट्य | निरोगी केस | मिनिएचराइज्ड (लहान मुळे असलेले) केस |
|---|---|---|
| केसांची जाडी | जाड आणि एकसारखी | बारीक, नाजूक आणि असमान |
| केसांचा रंग | पूर्णपणे रंगीत | फिकट आणि कधीकधी रंगहीन |
| केसांची लांबी | नियमितपणे वाढून लांब होतात | ठराविक लांबीपर्यंत पोहोचण्याआधीच गळून पडतात |
| टाळूचे स्वरूप | केसांमधून टाळू दिसत नाही | डोक्याच्या वरच्या भागात किंवा कपाळाच्या दोन्ही बाजूंना टाळू दिसू लागतो |
| केसांचा पोत | मजबूत आणि खरखरीत | मऊ, बारीक आणि बाळाच्या केसांसारखा |
DHT मुळे केसांच्या मुळांचा आकार लहान कसा होतो?
मानवी शरीरातील टेस्टोस्टेरॉन या हार्मोनचे रूपांतर DHT मध्ये होते. हे रूपांतर 5-अल्फा रिडक्टेस (5-alpha reductase) या एन्झाइममुळे होते. तयार झालेले DHT आनुवंशिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या केसांच्या मुळांमधील रिसेप्टर्सशी जोडले जाते. त्यामुळे कालांतराने या केसांच्या मुळांचा आकार लहान होऊ लागतो. याच प्रक्रियेचा परिणाम बाहेरूनही दिसतो. विशेषतः डोक्याच्या वरच्या भागात, कपाळाच्या दोन्ही बाजूंना आणि कपाळाच्या वरच्या बाजूला केसांची घनता कमी झालेली किंवा केस विरळ झाल्याचे जाणवू शकते.
DHT आणि डर्मल पॅपिला
प्रत्येक केसांच्या मुळाच्या तळाशी डर्मल पॅपिला (Dermal Papilla) नावाची एक रचना असते. केसांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले सिग्नल देणे आणि केसांच्या मुळांना सक्रिय ठेवणे हे तिचे महत्त्वाचे काम असते. मात्र, DHT वारंवार या भागातील रिसेप्टर्सशी जोडले गेले, तर तिथे जळजळ (Inflammation) होऊ शकते. यामुळे डर्मल पॅपिलाचा आकार आणखी लहान होतो आणि त्याचाच परिणाम होऊन त्यातून पूर्वीपेक्षा पातळ व कमकुवत केस वाढू लागतात.
केसांच्या वाढीच्या चक्रात होणारे बदल
केसांची वाढ साधारणपणे तीन टप्प्यांत होते:
-
ॲनाजेन (Anagen), हा केसांच्या सक्रिय वाढीचा टप्पा आहे. साधारणपणे तो ३ ते ६ वर्षे टिकतो.
-
कॅटाजेन (Catagen), हा केसांच्या वाढीचा संक्रमणाचा टप्पा असून तो साधारण २ ते ३ आठवडे टिकतो.
-
टेलोजेन (Telogen), हा केसांच्या विश्रांतीचा आणि गळण्याचा टप्पा आहे. तो साधारण ३ महिने टिकतो.
DHT मुळे केसांच्या सक्रिय वाढीचा ‘ॲनाजेन’ हा टप्पा वेळेआधीच कमी होतो. कालांतराने प्रत्येक वाढीच्या चक्रात केसांना वाढण्यासाठी मिळणारा वेळ कमी होत जातो आणि त्यामुळे नवीन केसांची वाढही कमी दिसू लागते. यामुळेच मिनिएचराइज्ड ( लहान मुळे असलेले) केस एका ठराविक लांबीपेक्षा पुढे वाढतच नाहीत, असे अनेकदा दिसून येते.
केसांच्या मुळांना आणखी कोणत्या गोष्टींचा त्रास होतो?
DHT हा केसांच्या मुळांचा आकार लहान होण्यामागील प्रमुख घटक आहे. मात्र, काही इतर कारणांमुळे ही प्रक्रिया जास्त वेगाने होऊ शकते आणि केस विरळ होण्याची समस्या वाढू शकते.
-
टाळूची योग्य स्वच्छता न राखणे, जास्त प्रमाणात तेलकटपणा जमा होणे किंवा कोंडा यामुळे टाळूवर सतत जळजळ राहू शकते.
-
विशेषतः लोह, व्हिटॅमिन डी, झिंक आणि बायोटिनची कमतरता केसांच्या आरोग्यावर परिणाम करू शकते.
-
केसांना वारंवार हीट स्टायलिंग करणे, केमिकल ट्रीटमेंट्स घेणे किंवा केसांना कलर करणे यामुळे केसांचे नुकसान होऊ शकते.
-
सततच्या ताणतणावामुळे कॉर्टिसोलची पातळी वाढू शकते आणि त्याचा केसांच्या वाढीच्या चक्रावर परिणाम होऊ शकतो.
तुमच्या केसांच्या मुळांचा आकार लहान होत असल्याची चिन्हे
केसांच्या मुळांचा आकार लहान होण्याची (Hair Miniaturization) लक्षणे जितक्या लवकर लक्षात येतील; तितक्या लवकर त्याचा वेग कमी करण्यासाठी उपाय करता येतात. त्यामुळे खालील बदलांकडे लक्ष द्या:
-
केसांचे पोत बदलते. कपाळाच्या वरील केस किंवा डोक्याच्या वरच्या भागात असणारे केस आधीपेक्षा बारीक, मऊ आणि बाळाच्या केसांसारखे केस दिसू लागतात.
-
केसांचा भांग रुंद/पातळ होतो. वरून पाहिल्यावर आधीपेक्षा टाळूचा जास्त भाग दिसू लागतो.
-
कपाळाच्या बाजूचे केस मागे जातात. कपाळाच्या दोन्ही बाजूंच्या केसांची रेषा हळूहळू, पण सतत मागे सरकू लागते.
-
केस पुन्हा वाढण्याचा वेग कमी होतो. आधी ज्या लांबीपर्यंत केस सहज वाढायचे, तिथे पोहोचण्यासाठी आता त्यांना जास्त वेळ लागतो.
-
गळणारे केस जास्त पातळ असतात. आंघोळ करताना किंवा केस विंचरताना गळणारे केस नेहमीच्या केसांच्या तुलनेत जास्त बारीक आणि लहान दिसतात.
तुमचे वय २० ते ३०च्या सुरुवातीच्या टप्प्यात असेल आणि यापैकी काही लक्षणे जाणवत असतील, तर ते सामान्य आहे.
केसांच्या मुळांचा आकार लहान होण्याची चिन्हे
सुरुवातीला होणारे बदल अतिशय सूक्ष्म असल्यामुळे ही प्रक्रिया सहज लक्षात येत नाही.
बहुतेक लोक केसांमध्ये होणारे हे बदल ताणतणावामुळे किंवा ऋतुमानानुसार होणाऱ्या केसगळतीमुळे होत आहेत असे समजून दुर्लक्ष करतात. मात्र, केस विरळ झाल्याचे स्पष्टपणे जाणवायला लागेपर्यंत केसांच्या मुळांचा आकार लहान होण्याची प्रक्रिया अनेक महिन्यांपासून, कधी कधी तर अनेक वर्षांपासून सुरू झालेली असू शकते.
म्हणूनच केस जास्त गळण्याची वाट पाहण्यापेक्षा, सुरुवातीला दिसणारी लक्षणे ओळखणे जास्त महत्त्वाचे आहे.
केसांच्या मुळांचा आकार लहान होत आहे, हे कसे समजते?
केसांच्या मुळांचा आकार लहान होत आहे का? हे त्वचारोगतज्ज्ञ (Dermatologist) टाळूच्या साध्या तपासणीद्वारे ओळखू शकतात. यासाठी ट्रायकोस्कोपी (Trichoscopy) नावाची तपासणी केली जाते. यामध्ये केस मोठ्या आकारात पाहण्यासाठी विशेष लेन्सचा वापर केला जातो आणि केसांच्या जाडीची तपासणी केली जाते. जर तुमच्या केसांच्या मुळांचा व्यास २०% किंवा त्याहूनही जास्त कमी झालेला आढळला, तर हे केसांच्या मुळांचा आकार लहान होत असल्याचे लक्षण मानले जाते.
तुम्ही घरच्या घरीही प्राथमिक पातळीवर एक साधी तपासणी करू शकता. डोक्याच्या वरच्या भागातील आणि कपाळाच्या दोन्ही बाजूंच्या केसांच्या जाडीची डोक्याच्या मागील बाजूच्या केसांशी तुलना करा. दोन्ही भागांतील केसांच्या जाडीमध्ये स्पष्ट फरक जाणवत असेल, तर त्वचारोगतज्ज्ञांकडून तपासणी करून घेणे योग्य ठरेल.
केसांच्या मुळांचा लहान झालेला आकार पुन्हा आधीसारखा करता येणे शक्य आहे का?
मुख्यतः हे प्रक्रिया किती लवकर लक्षात येते यावर अवलंबून असते. केसांच्या मुळांची अवस्था साधारणपणे तीन प्रकारची असू शकते; सक्रिय, निष्क्रिय आणि मृत. मिनिएचराइज्ड (लहान मुळे असलेल्या) केसांची मुळे बहुतेक वेळा मृत झालेली नसतात, तर ती निष्क्रिय झालेली असतात. या टप्प्यावर योग्य उपचार घेतल्यास त्यांना पुन्हा सक्रिय करता येण्याची शक्यता असते.
आधीसारख्या अवस्थेत कोणत्या गोष्टी आणू शकतो?
-
जिवंत असलेल्या, पण निष्क्रिय झालेल्या केसांच्या मुळांना पुन्हा सक्रिय करता येऊ शकते.
-
केसांची मुळे अजूनही संरचनात्मकदृष्ट्या टिकून असतील आणि केस विरळ होण्याची समस्या सुरुवातीच्या किंवा मध्यम टप्प्यात असेल, तर सुधारणा होण्याची शक्यता असते.
-
तंतुमय व्रणाच्या ऊती (Fibrous scar tissue) तयार होण्यापूर्वी केसांच्या मुळांचा आकार लहान होण्याची प्रक्रिया लक्षात आली, तर केसांच्या मुळांचा लहान झालेला आकार पुन्हा आधीसारखा करता येणे शक्य आहे.
आधीसारख्या अवस्थेत कोणत्या गोष्टी आणू शकत नाही?
-
अनेक वर्षे उपचार न घेतल्यामुळे ज्या केसांच्या मुळांची जागा तंतुमय व्रणाच्या ऊतींनी घेतली आहे, अशा केसांच्या मुळांना पुन्हा आधीसारख्या अवस्थेत आणता येत नाही.
-
अनेक वर्षांपासून टक्कल असलेल्या भागात केसांची मुळे पूर्णपणे निष्क्रिय झाली असतील, तर तेथील केस पुन्हा वाढवणे शक्य नसते.
तुम्ही जितक्या लवकर उपचार सुरू कराल, तितके केस जास्त टिकून राहण्याची आणि पुन्हा वाढ होण्याची शक्यता असते.
केसांच्या मुळांचा आकार लहान असल्यास वैद्यकीय पद्धतीने उपचार कसे केले जातात?
केसांच्या मुळांचा आकार लहान होण्याची प्रक्रिया पूर्णपणे थांबवण्यासाठी किंवा आधीसारख्या अवस्थेत पुन्हा आणण्यासाठी एकच उपचार पुरेसा नसतो. सर्वात जास्त प्रभावी पद्धतीमध्ये एकाच वेळी तीन गोष्टींवर लक्ष दिले जाते; DHT कमी करणे, निष्क्रिय झालेल्या केसांच्या मुळांना पुन्हा सक्रिय करणे आणि आनुवंशिकतेपलीकडे केसांच्या मुळांचा आकार लहान होण्याचा वेग वाढवणाऱ्या शरीरातील इतर कारणांवर उपचार करणे.
यापैकी फक्त एका कारणावर उपचार करून इतरांकडे दुर्लक्ष केले, तर अनेक वेळा उपचारांचा परिणाम काही काळानंतर एका पातळीवर येऊन थांबतो. कारण कोणत्याही बाह्य उपचारांना योग्य प्रतिसाद देण्यासाठी केसांच्या मुळांना शरीराच्या आतूनही योग्य पोषण आणि अनुकूल वातावरण मिळणे आवश्यक असते. याच ठिकाणी ट्राया (Traya) ची पद्धत महत्त्वाची ठरते.
ट्राया (Traya) – केसांच्या मुळांचा आकार लहान होण्यावर मुळापासून उपचार
बहुतेक उपचार फक्त केसांच्या मुळांचा आकार लहान होण्यामागील एकाच कारणावर लक्ष केंद्रित करतात. उदाहरणार्थ, टाळूसाठी एखादे सीरम, पोषणासाठी सप्लिमेंट किंवा कॉर्टिसोल कमी करण्यासाठी ताणतणाव कमी करणारे उत्पादन सुचवतात. मात्र, केसांच्या मुळांचा आकार लहान होण्यामागे एकच कारण बहुतेक क्वचितच वेळा असते. ट्राया (Traya चे ३-सायन्स मॉडेल आयुर्वेद, हेअर सायन्स आणि न्यूट्रिशन या तिन्ही पद्धतींचा समतोल साधून बनवण्यात आलेले आहे. प्रत्येक उत्पादन केसांच्या मुळांवर परिणाम करणाऱ्या विशिष्ट कारणावर काम करते, त्यामुळे कोणताही महत्त्वाचा घटक दुर्लक्षित राहत नाही.
टाळूसाठी असलेले ReCaP Serum, केसांच्या मुळांजवळील DHT वर थेट काम करण्यास, निष्क्रिय झालेल्या स्टेम सेल्सना पुन्हा सक्रिय करण्यास आणि नियमित वापर केल्यास केसांची घनता सुधारण्यास मदत करते. शरीराच्या आतून पोषण देण्यासाठी Hair Vitamin with DHT Blockers मध्ये भोपळ्याच्या बियांचा अर्क आहे. हे DHT चा तुमच्या शरीरामध्ये होणारा परिणाम नैसर्गिकरित्या कमी करण्यास मदत करते. यासोबतच, केसांच्या मुळांचा आकार लहान होण्याचा वेग वाढवणाऱ्या पोषणातील कमतरता भरून काढण्यास सुद्धा मदत करते. तसेच, Hair Ras मध्ये भृंगराज, अश्वगंधा आणि आवळा यांचा समावेश आहे. हे घटक केसांच्या मुळांचे आरोग्य टिकवून ठेवण्यास आणि केसांच्या मुळांचा आकार लहान होण्याच्या प्रक्रियेचा वेग नैसर्गिकरित्या कमी करण्यास मदत करतात. यामुळे फायनास्टराइडशी संबंधित दुष्परिणामांचा धोका न घेता केसांच्या आरोग्याला आधार मिळू शकतो.
Calm Ras कॉर्टिसोलच्या पातळीवर थेट काम करते. दीर्घकाळचा ताणतणाव हा आनुवंशिकतेव्यतिरिक्त केसांच्या मुळांचा आकार लहान होण्यामागील सर्वसामान्य कारणांपैकी एक आहे. कॉर्टिसोलची पातळी कमी ठेवण्यास मदत केल्यामुळे केसांच्या मुळांना वाढीच्या अवस्थेत अधिक काळ टिकून राहण्यास मदत होऊ शकते.
Scalp Oil with Growth Oil Shots मधील कोल्ड-प्रेस्ड तेल आणि आयुर्वेदिक घटक थेट टाळूपर्यंत पोहोचतात. यामुळे रक्त प्रवाह सुधारण्यास, जळजळ कमी होण्यास आणि केसांच्या मुळांना आवश्यक असलेले बाह्य पोषण मिळण्यास मदत होते. अशा प्रकारे ट्राया (Traya) ची आतून बाहेरपर्यंत परिणामकारक असलेली उपचार पद्धत पूर्ण होते.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
1. केसांच्या मुळांचा आकार लहान होणे आनुवंशिक असते का?
होय, बहुतेक वेळा हे आनुवंशिक असते. तुमच्या कुटुंबात केसगळतीची समस्या असेल, तर तुमच्या केसांच्या मुळांमध्ये DHT चा परिणाम जास्त असण्याची शक्यता असते. जरी तुमची आनुवंशिक संवेदनशीलता कमी असली तरी फक्त आनुवंशिकता हेच एक कारण नसते. जरी तुमची आनुवंशिक संवेदनशीलता कमी असली तरी ताणतणाव, पोषणाची कमतरता आणि हार्मोन्समधील असंतुलन यांसारखे घटक या प्रक्रियेचा वेग जास्त वेगाने वाढवू शकतात.
2. केसगळती थांबवण्यासाठी नवीन उपचार कोणते आहेत?
Redensyl आणि Procapil यांसारख्या नवीन घटकांकडे सध्या लक्ष वेधले जात आहे. हे केसांच्या मुळांमधील निष्क्रिय स्टेम सेल्सना पुन्हा सक्रिय करण्यास आणि टाळूच्या पातळीवर DHT ची क्रिया कमी करण्यास मदत करतात. फायनास्टराइडच्या दुष्परिणामांपासून दूर राहण्याचा पर्याय म्हणून त्यांचा वापर केला जातो. सुरुवातीच्या ते मध्यम स्वरूपाच्या केसगळतीमध्ये, केसगळतीच्या मूळ कारणांवर काम करणाऱ्या अंतर्गत उपचारांसोबत त्यांचा वापर केल्यास चांगले परिणाम मिळू शकतात.
3. Gen Z मधील पुरुषांना लहान वयातच टक्कल का पडत आहे?
जास्त ताणतणाव, असंतुलित आहार, पोषणाची कमतरता आणि सततच्या झोपेची कमतरता यांसारखे घटक तरुण पुरुषांमध्ये आनुवंशिक केसगळतीचा वेग वाढवू शकतात. DHT बद्दलची आनुवंशिक संवेदनशीलता बदललेली नाही; मात्र, ती प्रक्रिया वेगाने वाढवणारे घटक आजच्या काळात अधिक सामान्य झाले आहेत.
4. आनुवंशिक केसगळतीची पहिली अवस्था कोणती?
केसांच्या मुळांचा आकार लहान होणे (Hair Miniaturization) ही आनुवंशिक केसगळतीची सुरुवातीची अवस्था आहे. सुरुवातीला केस स्पष्टपणे विरळ किंवा टक्कल पडलेले दिसण्याआधीच ते पातळ, लहान आणि फिकट होत जातात. ही प्रक्रिया अनेक महिने किंवा वर्षांपासून हळूहळू होत असल्यामुळे बहुतेकांच्या लक्षात ती लगेच येत नाही.
5. केसगळती १००% आनुवंशिक असते का?
नाही. आनुवंशिकता तुमच्या केसांच्या मुळांवर DHT चा असलेला परिणाम ठरवते; मात्र, तुम्हाला किती वेगाने किंवा किती प्रमाणात केसगळती होईल हे केवळ आनुवंशिकतेवर ठरत नाही. ताणतणाव, पोषणाची कमतरता आणि हार्मोन्समधील असंतुलन यांसारखे शरीरातील इतर घटक आनुवंशिक केसगळती किती वेगाने वाढेल, यावर मोठा परिणाम करू शकतात.
संदर्भ :
- Wimpole Clinic. (n.d.). What Is Hair Miniaturisation And How Can You Reverse It? Wimpole Clinic.
- Chavan D. (2025). Reversing Hair Follicle Miniaturization. HairMD.
- Hims. (2022). What is Hair Miniaturization? Hims.
- Hairmax. (2025). Hair Miniaturization: How to Reverse It Naturally. Hairmax.
- New Beauty. (2025). What Triggers Hair Miniaturization? 6 Real Solutions to Slow Hair Loss. New Beauty.
Read More Blogs
केसगळतीसाठी मिनॉक्सिडिल ५% : वापरण्याची योग्य पद्धत, परिणाम आणि दुष्परिणाम
Quick Answer मिनॉक्सिडिल ५% हे अँड्रोजेनेटिक अलोपेशियामध्ये केसांच्या मुळांना सक्रिय ठ...
मिनॉक्सिडिल १०% (Minoxidil 10%) चे फायदे आणि दुष्परिणाम
Quick Answer मिनॉक्सिडिल १०% हे जास्त क्षमतेचे टॉपिकल फॉर्म्युलेशन असून, केसगळतीसाठ...
मिनोक्सिडिल आणि केसांची पुनर्वाढ: पुरुषांसाठी संपूर्ण माहिती
Quick Answer मिनोक्सिडिल पुरुषांमधील आनुवंशिक केसगळती (Male Pattern Baldness) कमी करण्...
केसगळती रोखण्यासाठी मिनॉक्सिडिल २%: वापर, परिणाम आणि दुष्परिणाम यांचे संपूर्ण मार्गदर्शन
Quick Answer मिनॉक्सिडिल २% हे आनुवंशिक केसगळतीमध्ये, विशेषतः सुरुवातीच्या टप्प्यात...





























