icon Skip to content

केसांसाठी एरंडेल तेल वापरल्यावर परिणाम दिसायला किती वेळ लागतो?

Dr Kalyani Deshmukh

Dr Kalyani Deshmukh
Dr. Kalyani Deshmukh brings 7 years of experience in dermatology, specializing in the diagnosis of complex conditions and performing advanced dermatosurgical procedures. Her areas of expertise include clinical dermatology, trichology, dermatosurgery and aesthetic medicine.

केसांसाठी एरंडेल तेल वापरल्यावर परिणाम दिसायला किती वेळ लागतो?

Quick Answer

केसांसाठी एरंडेल तेलाचा नियमित वापर केल्यानंतर साधारण ६ ते ८ आठवड्यांत केसांचा लुक आणि पोत यामध्ये थोडा फरक जाणवू शकतो. एरंडेल तेलामुळे केस मजबूत होण्यास मदत होते. मात्र, एरंडेल तेल लावल्याने केसांची वाढ होते, याबाबतचे वैज्ञानिक पुरावे मर्यादित आहेत. ते केसांना संरक्षण देऊन केस तुटण्यापासून वाचवण्यास आणि टाळूचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करू शकते. केसांची लांबी आणि दाटपणा यामध्ये फरक जाणवण्यासाठी मात्र ३ ते ४ महिने लागू शकतात.

सारांश

एरंडेल तेल टाळूवरील जळजळ कमी करण्यास आणि केसांची वाढ करण्यास मदत करू शकते, असे मानले जाते. त्याची परिणामकारकता त्याच्या दाट पोतामुळे आणि त्यामध्ये असलेल्या विशिष्ट फॅटी अॅसिड्समुळे ठरते. इतर हलक्या तेलांच्या तुलनेत एरंडेल तेल केसांवर संरक्षणासाठी थर तयार करते आणि रोजच्या धूळ, प्रदूषण किंवा इतर कारणांमुळे होणाऱ्या नुकसानापासून केसांचे संरक्षण करण्यास मदत करू शकते.

मात्र, एरंडेल तेल वापरायला सुरुवात केल्यानंतर लगेच परिणाम दिसतीलच असे नाही, त्यामुळे संयम ठेवणे महत्त्वाचे आहे.

एरंडेल तेल केसांच्या बाहेरील थराला जास्त ओलावा देण्यासाठी उपयोगी ठरू शकते; मात्र, आनुवंशिक टक्कलपणा किंवा हार्मोन्समुळे होणारी केसगळती फक्त एरंडेल तेलाने थांबवता येत नाही. त्यामुळे केसांचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी दीर्घकाळ केसांची निगा राखण्याच्या पद्धतीचा एक भाग म्हणून त्याचा वापर करणे जास्त फायद्याचे ठरते.

या लेखात आपण एरंडेल तेल टाळूवर कसे काम करते? त्याचा वापर केल्यानंतर साधारण किती वेळात, काय बदल जाणवू शकतात? आणि केसगळतीचे मूळ कारण दूर करणे आणि केसांना बाहेरून तेल लावणे दोन्हीही गरजेचं का आहे? हे समजून घेणार आहोत.

एरंडेल तेल केसांच्या वाढीसाठी कसे काम करते?

एरंडेल तेल केसांचे संरक्षण करून आणि टाळूचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी केसांची वाढ होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार करण्यास मदत करते. एरंडेल तेलामुळे केस वाढतात का? असा प्रश्न अनेकांना पडतो. याचे उत्तर असे की, एरंडेल तेल केस लवकर तुटण्यापासून थांबवू शकते. हे केसांवर एक थर तयार करून त्यांना जास्त लवचिक बनवते. त्यामुळे केस तुटण्याचे प्रमाण कमी होऊन त्यांची लांबी टिकून राहण्यास मदत होते.

केस जास्त चमकदार दिसण्याव्यतिरिक्त, एरंडेल तेल पुढील प्रकारे मदत करू शकते:

  • केस पातळ होण्याच्या प्रक्रियेचा वेग कमी करण्यास मदत: एरंडेल तेलामध्ये असलेले एक फॅटी अॅसिड केस पातळ होण्यास कारणीभूत असणाऱ्या काही प्रक्रियांवर परिणाम करते. त्यामुळे केसांची वाढ होण्याच्या अवस्थेत केस जास्त काळ टिकून राहण्यास मदत होऊ शकते.
  • एरंडेल तेल प्रत्येक केसाभोवती एक संरक्षणात्मक थर तयार करते. त्यामुळे केसांमधील ओलावा टिकून राहतो आणि ते कोरडे व ठिसूळ होण्यापासून वाचण्यास मदत होते.
  • रक्ताभिसरण सुधारण्यास मदत: या तेलाने टाळूची मालिश केल्याने रक्त पुरवठा चांगला होतो. त्यामुळे केसांच्या मुळांना आवश्यक असलेले पोषक घटक मिळण्यास मदत होते.

केसांच्या वाढीसाठी एरंडेल तेल लावण्याची योग्य पद्धत कोणती?

एरंडेल तेल घट्ट असल्यामुळे ते तसेच लावण्यापेक्षा एखाद्या हलक्या तेलासोबत मिसळून वापरणे जास्त सोयीचे ठरते. ते मधासारखे घट्ट असल्यामुळे फक्त तेच तेल लावल्यास केसांवर पसरवणे आणि नंतर केस धुणे कठीण होऊ शकते.

  1. मिश्रण तयार करा : एरंडेल तेल आणि खोबरेल तेल किंवा जोजोबा तेल समान प्रमाणात मिसळा.
  2. तेल कोमट करा : तेलाचे मिश्रण थोडे कोमट करण्यासाठी त्याची वाटी काही वेळ कोमट पाण्यात ठेवा. कोमट तेल सहज पसरते आणि टाळूवर लावणे सोपे जाते.
  3. केसांचे भांग पाडा : केसांचे छोटे भाग करून भांग पाडा, जेणेकरून तेल थेट टाळूवर आणि केसांच्या मुळांपर्यंत लावता येईल.
  4. टाळूची मालिश करा : बोटांच्या टोकांच्या मऊ भागाने सुमारे ५ मिनिटे हळूहळू गोलाकार पद्धतीने टाळूची मालिश करा. यामुळे टाळूतील रक्त प्रवाह सुधारण्यास मदत मिळू शकते.
  5. केस धुवा : सौम्य शॅम्पूने केस धुवा. तेल पूर्णपणे निघालेले नाही असे वाटत असेल तर दोन वेळा शॅम्पू करावा लागू शकतो. टाळू पूर्णपणे स्वच्छ राहील याची काळजी घ्या, जेणेकरून रोमछिद्रे स्वच्छ राहतील.

एरंडेल तेल केसांना किती वेळ लावून ठेवावे?

एरंडेल तेल केसांना साधारण १ ते २ तास लावून ठेवावे. एरंडेल तेल इतर तेलांच्या तुलनेत खूप घट्ट असल्यामुळे ते किती वेळ लावून ठेवले पाहिजे, याचा विचार करणे महत्त्वाचे आहे.

एरंडेल तेल खूप वेळ केसांवर आणि टाळूवर लावून ठेवल्यास त्याचा थर जमा होऊन केसांच्या मुळांभोवती असलेली छिद्रे बंद होऊ शकतात. तर खूप कमी वेळ लावून ठेवले, तर केस आणि टाळूवर योग्य प्रकारे काम करण्यासाठी तेलाला पुरेसा वेळ मिळणार नाही.

तेल किती वेळ लावून ठेवावे?

  • किमान वेळ: ३० मिनिटे, यामुळे तेलातील फॅटी अॅसिड्स केसांच्या बाहेरील थरावर पसरण्यास आणि टाळूला मऊ ठेवण्यास मदत होते.
  • शिफारस केलेला वेळ: १ ते २ तास, यामुळे टाळूला कंडिशनिंग मिळण्यासाठी आणि तेल योग्य प्रकारे मुरण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो.
  • रात्रभर ठेवणे: बहुतेक केसांच्या प्रकारांसाठी हे सुरक्षित असू शकते आणि अतिशय कोरडे किंवा खराब झालेले केस असतील तर काही जण हा पर्याय निवडतात. उशीला तेल लागू नये यासाठी केसांवर मऊ सुती कापड किंवा शॉवर कॅप लावू शकता.
  • किती वेळा वापरावे: आठवड्यातून १ ते २ वेळा तेल वापरता येऊ शकते. दररोज एरंडेल तेल लावल्याने टाळूवर तेलाचा थर जमा होऊ शकतो आणि केसांच्या मुळांभोवती असलेली छिद्रे बंद होऊ शकतात. तसेच, टाळूला जळजळ होऊ शकते. त्यामुळे तेल रोज वापरणे टाळलेलेच चांगले राहिल.

एरंडेल तेल ४८ तासांपेक्षा जास्त वेळ केस न धुता लावून ठेवणे टाळावे. असे केल्यास टाळू अस्वच्छ होवू शकतो आणि कोंडा वाढण्याची शक्यता असते. दीर्घकाळ तेलाचा थर राहिल्याने Malassezia या बुरशीच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण तयार होऊ शकते.

एरंडेल तेलाचा कोणता परिणाम आणि किती वेळात होवू शकतो?

एरंडेल तेलाचा नियमित वापर केल्याने साधारण ६ ते ८ आठवड्यांत काही बदल जाणवू शकतात. खालील टप्प्यांनुसार तुम्ही त्याचा परिणाम समजून घेऊ शकता:

कालावधी शरीरातील/केसांमधील बदल अपेक्षित परिणाम
पहिला ते दुसरा आठवडा टाळूचा ओलावा वाढणे. कोरडेपणा आणि खाज कमी होऊ शकते. टाळू जास्त संतुलित आणि आरामदायक वाटू शकतो.
चौथा ते सहावा आठवडा केसांची मजबुती वाढते. केस धुताना किंवा विंचरताना केस तुटण्याचे प्रमाण कमी झाल्याचे जाणवू शकते.
सहावा ते आठवा आठवडा केसांचे पोत सुधारते. केसांना हात लावल्यावर ते जास्त दाट वाटू शकतात आणि केस निरोगी दिसू शकतात.
तिसरा ते चौथा महिना केस जास्त दाट दिसू लागतात. केसांची लांबी टिकून राहिल्यामुळे केस जास्त भरदार आणि दाट दिसू शकतात.

केसगळतीसाठी फक्त बाहेरून तेल लावणे पुरेसे आहे का?

एरंडेल तेल केसांना बाहेरून पोषण आणि संरक्षण देण्यासाठी उपयोगी ठरू शकते. मात्र, केसगळतीमागील शरीरातील मूळ कारणांपर्यंत ते पोहोचू शकत नाही. एरंडेल तेलामुळे केस जास्त मऊ आणि निरोगी वाटू शकतात आणि टाळूचे आरोग्यही चांगले राहण्यास मदत होऊ शकते. पण हार्मोन्समधील बदल, जास्त ताणतणाव किंवा पोषणाची कमतरता यांसारख्या केसगळतीवरील कारणांवर ते थेट काम करू शकत नाही.

म्हणूनच फक्त तेलाचा वापर केल्याने अपेक्षित परिणाम मिळत नाहीत.

केसांमध्ये खरा फरक जाणवण्यासाठी बाहेरून केसांची काळजी घेण्यासोबत शरीराच्या आतूनही योग्य पोषण आणि आधार मिळणे आवश्यक आहे. यासाठी Traya ने तीन वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करण्याचा दृष्टिकोन वापरला आहे. Traya बाहेरून केसांची काळजी घेण्यासोबतच केसगळतीसाठी कारणीभूत असलेल्या कारणांवरही लक्ष केंद्रित करते.

  • एरंडेल तेल खूप घट्ट असते आणि त्यामुळे केस धुण्यास कठीण वाटत असेल, तर त्याऐवजी Scalp Oil सारखे हलके तेल वापरता येऊ शकते. यामध्ये आयुर्वेदिक वनस्पतींचा वापर केला जातो, ज्यामुळे टाळूचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते आणि जास्त चिकट थर जमा होण्याची शक्यता कमी असते.
  • तेल लावल्यानंतर टाळू व्यवस्थित स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे. यासाठी Defense Shampoo सारखा सौम्य शॅम्पू वापरता येतो. तो टाळूवरील प्रमाणापेक्षा जास्त जमा झालेले तेल आणि घाण स्वच्छ करण्यास मदत करतो, ज्यामुळे टाळू स्वच्छ आणि ताजातवाना राहतो.

मात्र, शरीराला आवश्यक असलेले पोषक घटक मिळत नसतील किंवा सतत ताणतणाव असेल, तर कितीही चांगले तेल वापरले तरी केसगळतीच्या मूळ कारणावर त्याचा परिणाम होणार नाही.

  • बाहेरून केसांचे संरक्षण करण्यासाठी तेलाचा वापर करत असतानाच, शरीराला Hair Vitamin सारख्या सप्लिमेंटमधून केसांची वाढ होण्यासाठी आवश्यक असलेले लोह आणि बायोटिन मिळण्यास मदत होऊ शकते.
  • हे पोषक घटक केसांच्या मुळांपर्यंत पोहोचण्यास मदत करण्यासाठी Hair Ras शरीराच्या आतून काम करते आणि रक्ताचे आरोग्य व शरीरातील संतुलन सुधारण्यास मदत करू शकते.
  • केसगळतीमागे शरीरातील पचन प्रक्रिया कमी होणे किंवा ऊर्जेची कमतरता कारणीभूत असेल, तर Health Tatva चा दिनचर्येत समावेश केल्याने शरीराला आवश्यक असणारा आधार मिळू शकतो आणि केसांना वाढीच्या अवस्थेत टिकून राहण्यास मदत होऊ शकते.

शरीरातील या कमतरता दूर केल्यावर एरंडेल तेलाचा वापर जास्त परिणामकारक वाटू शकतो, कारण अशा प्रकारे फक्त केसांच्या बाहेरील भागावर नाही, तर केसगळतीच्या समस्येच्या वेगवेगळ्या कारणांवर एकत्रितपणे काम केले जाते.

एरंडेल तेल तुमच्या केसांची निगा राखण्याच्या दिनचर्येतील एक उपयोगी भाग ठरू शकते; पण, केसगळती थांबवण्यासाठी हा काही जादूचा उपाय नाही. दीर्घकाळ टिकणारे चांगले परिणाम मिळवण्यासाठी बाहेरून केसांचे संरक्षण आणि शरीराचे आतून चांगले आरोग्य यांचा समतोल महत्त्वाचा आहे. टाळूची आवश्यक काळजी आणि शरीराला आवश्यक असलेले पोषण देऊन तुम्ही केसांच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण तयार करू शकता. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे उपचारात नियमितपणा ठेवणे, संयम बाळगणे आणि केसांच्या समस्येकडे सर्व बाजूंनी लक्ष देणारी योग्य दिनचर्या पाळणे गरजेचे आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

एरंडेल तेलामुळे केस वाढायला किती वेळ लागतो?

एरंडेल तेलाचा नियमित वापर केल्यानंतर ६ ते ८ आठवड्यांत केस तुटण्याचे प्रमाण कमी होते आणि केसांचे पोत सुधारू शकते. केसांचा दाटपणा आणि लांबी टिकून राहण्यासाठी साधारण ३ ते ४ महिने लागू शकतात. यानंतरचा परिणाम केसगळतीमागील शरीराच्या आतील समस्यांवर योग्य प्रकारे उपचार केले जात आहेत की नाही, यावरही अवलंबून असतो.

एरंडेल तेलाचे केसांवर कोणते दुष्परिणाम होऊ शकतात?

एरंडेल तेलाचा अतिवापर केल्यास टाळूवर तेलाचा थर जमा होऊ शकतो. ज्या व्यक्तींच्या शरीरात रिसिनोलिक अॅसिडचा प्रभाव आहे त्यांना ‘कॉन्टॅक्ट डर्माटायटिस’ म्हणजे त्वचेची जळजळ किंवा पुरळ येऊ शकते. तसेच, टाळूवर बुरशी येण्याची समस्या होण्याची शक्यता असते. एरंडेल तेलाच्या घट्टपणामुळे Malassezia या बुरशीच्या वाढीस अनुकूल वातावरण तयार होऊन कोंडा वाढू शकतो. कधीकधी हेअर फेल्टिंग ही समस्या होऊ शकते. यामध्ये केस एकमेकांत इतके गुंततात आणि घट्ट चिकटतात की गुंता काढणे शक्य होत नाही आणि केस कापावे लागू शकतात. त्यामुळे पहिल्यांदा वापरण्यापूर्वी त्वचेच्या छोट्या भागावर पॅच टेस्ट करणे योग्य ठरते.

केस वाढवण्यासाठी एरंडेल तेलाचा वापर कसा करावा?

थोडेसे एरंडेल तेल कोमट करून त्यात खोबरेल तेल किंवा जोजोबा तेलासारखे हलके तेल समान प्रमाणात मिसळा. केसांचे छोटे भाग करून हे मिश्रण थेट टाळूवर लावा. त्यानंतर ५ ते १० मिनिटे हलक्या हाताने मालिश करा. तेल कमीत कमी ३० मिनिटे ते रात्रभर ठेवता येते. त्यानंतर सौम्य शॅम्पूने टाळू आणि केस व्यवस्थित धुवा. चांगल्या परिणामांसाठी आठवड्यातून १ ते २ वेळा ही पद्धत वापरता येते.

एरंडेल तेलामुळे केसांची वाढ होते, याचे काही ठोस वैज्ञानिक पुरावे आहेत का?

एरंडेल तेलातील रिसिनोलिक ॲसिड हे प्रोस्टॅग्लॅंडिन D2 सिंथेस नावाच्या एन्झाइमचा परिणाम कमी करू शकते. अँड्रोजेनेटिक ॲलोपेशिया असलेल्या पुरुषांच्या टाळूवर या एन्झाइमचे प्रमाण जास्त आढळते. मात्र, याबाबतचे संशोधन सध्या प्रामुख्याने प्रयोगशाळेतील अभ्यासांपुरतेच मर्यादित आहे. एरंडेल तेलामुळे थेट केसांची वाढ होते, हे सिद्ध करणारे मोठ्या प्रमाणावरील मानवी वैज्ञानिक पुरावे अजून उपलब्ध नाहीत.

केसांच्या प्रकारानुसार एरंडेल तेलाचे परिणाम वेगळे असू शकतात का?

होय. कोरडे, जाड किंवा रासायनिक प्रक्रिया केलेले केस असलेल्या लोकांना एरंडेल तेलाचा परिणाम जास्त जाणवू शकतो. कारण अशा केसांना रिसिनोलिक ॲसिडमुळे मिळणारा ओलावा आणि संरक्षणात्मक थर जास्त उपयोगी ठरू शकतो. पण, बारीक किंवा तेलकट केसांसाठी एरंडेल तेल खूप जड वाटू शकते. अशा वेळी केसांचा पोत सुधारण्याऐवजी तेलाचा थर साचण्याची शक्यता जास्त असते.

एरंडेल तेलामुळे केसांची वाढ होते का?

एरंडेल तेल टाळूचे आरोग्य सुधारण्यास आणि केस तुटणे कमी करण्यास मदत करू शकते, त्यामुळे केस जास्त दाट दिसू शकतात. रिसिनोलिक ॲसिडमुळे PGD2 सिंथेस या एन्झाइमचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे पुरुषांमधील अँड्रोजेनेटिक ॲलोपेशियाचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते. मात्र, एरंडेल तेल थेट नवीन केसांची वाढ घडवून आणते, असे ठोस मानवी पुरावे सध्या उपलब्ध नाहीत.

संदर्भ :

  1. Girdler K, Cabatu A, Olds H, Potts GA. (2026). Use of Castor Oil in Dermatology: A Narrative Review. Cureus. DOI: 10.7759/cureus.103289

Popular Posts

Collapsible content

Disclaimers

The claims and results mentioned are based on multiple internal studies and customer research surveys that Traya has conducted with a statistically significant sample size of users who were under expert observation and guidance.

93% saw results*

Traya conducted an internal study over both men and females facing hair fall and 93% saw results* after using the complete Traya customized plan consistently for a period of 5 months. This study was conducted in December 2022.

5-month money-back guarantee

Traya’s 100% money-back policy is valid only if you have been regular with the complete customized plan for a period of 5 whole consecutive months. Each customised hair kit is valid for only 30 days. If any individual has not seen any regrowth or control in hair fall, you can ask for a refund. However, once you apply for the 5-month - money-back policy, the team would then do a thorough check on consumer regularity based on every order date. An exception to this policy is for those customers undergoing serious health conditions like autoimmune diseases and cancer.

Traya’s Holistic 3 Science Formula

Traya’s 3 Science Formula is a synergistic mix of Ayurveda, Allopathy & Food Science designed specifically to cater to hair fall conditions stemming from multiple root causes. With clinically tested ingredients and adaptogenic herbs, Traya’s Science-Backed formula clears internal blockages and boosts hair regeneration naturally. When blended with a healing dietary plan, it delivers great results in attaining long-term hair growth.

Traya Free hair test (™)

Traya’s Hair Dx test is powered by a proprietary algorithm to examine a user's hair & health profile. With the help of a distinctive image-capturing technique & physician- formulated examination, it is able to precisely check the type, stage & root causes of a certain hair fall condition.

2 lakh+ Indians

Traya Free hair test (™) has been taken by more than 2 lakh+ Indians - Data acquired from Traya customers.

Ayush Certified - Digest Boost, Cholest Vati and Consti Clear are Ayush Certified Products.

Traya’s Ayurvedic Products are based on natural and Ayurvedic formulations. These are completely safe for human use, but it is possible that certain ingredients may cause allergic reactions to some individuals.

Accurate hair check

The Traya free hair test (™) is a proprietary algorithm developed with the help of our in-house hair experts that provides Accurate hair and health checks, provided you mention all the correct details about yourself. It gives a precise checks about the type, stage and root cause of a specific hair fall condition.

Long Lasting Visible Hair Results

Traya’s complete customized plan gives visible and long-lasting results provided you’re on Traya’s hair maintenance kit. Since Traya works on the internal root causes of hair fall and hence our customers have seen long lasting results

Trusted by 100+ Hair Experts

Traya has been tried and loved by over 100 hair experts all over India to maintain healthy hair growth.

Award Winning Trusted Brand

India’s Healthcare Excellence initiated by Brands Impact has awarded Traya as the Most Effective Haircare Product of the Year 2022

FDA approved ingredients

These are completely safe for human use, but it is possible that certain ingredients may cause allergic reactions to some individuals.

Traya Women Santulan (™)

Traya’s Women Santulan is a unique technology that uses a combination of herbs treated in a specific manner (kalpa) to meet the bio-specific needs of women going through different stages of life. Santulan is a supplementary range to Traya’s 3 Science Formula which balances and nourishes the body inside-out delivering long-lasting hair growth results and overall health.

Hair Growth Plan starts at Rs 1699 pm* - The price mentioned is for a male of age 23 with stage 1 type hair fall based on the results of the hair test taken on the website. Prices may vary for individual customers depending on the results of the hair test and internal root causes

Hair Growth Plan starts at Rs 2000 pm* - The price mentioned is for a male of age 25 with stage 1 type hair fall based on the results of the hair test taken on the website. Prices may vary for individual customers depending on the results of the hair test and internal root causes.