Quick Answer
कंडिशनर केसांना किती लावून वेळ ठेवायचे, हे तुम्ही कोणत्या प्रकारचा कंडिशनर वापरत आहात यावर अवलंबून असते. रोजचा रिन्स-आउट कंडिशनर साधारण १ ते ३ मिनिटे केसांना लावून ठेवणे पुरेसे असते. डीप कंडिशनर किंवा हेअर मास्क साधारण १० ते २० मिनिटे ठेवता येतो. तर लीव्ह-इन कंडिशनर पुढच्या वेळी केस धुईपर्यंत केसांवरच राहतो.
सारांश
तुमच्या केसांची नैसर्गिक रचना आणि पीएच (pH) चे संतुलन टिकवून ठेवण्यासाठी कंडिशनर किती वेळ केसांना लावून ठेवायचा? हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
कंडिशनर गरजेपेक्षा जास्त वेळ केसांवर लावून ठेवल्यास केसांमध्ये जास्त ओलावा शोषला जाऊन ते फुगू शकतात. असे परत परत झाले तर केसांच्या बाहेरील थरावर ताण येऊन ते कमकुवत होऊ शकतात. त्यामुळे कंडिशनरच्या प्रकारानुसार ते लावून ठेवण्यासाठी योग्य वेळ माहिती असणे महत्त्वाचे आहे. यामुळे केसांवर नको असलेला थर जमा होणार नाही आणि ते मऊ व व्यवस्थित राहतील.
कंडिशनर केसांच्या बाहेरील थराला मऊ आणि व्यवस्थित ठेवण्यास, तसेच केस जास्त मजबूत आणि सहज विंचरता येतील असे ठेवण्यास मदत करतो. मात्र, तुम्ही कोणता कंडिशनर वापरता याइतकेच तो किती वेळ केसांवर लावून ठेवता हेही महत्त्वाचे आहे.
अनेक जण केसांना कंडिशनर लावतात, काही वेळ थांबतात आणि अंदाजाने तो धुऊन टाकतात. मात्र, प्रत्येक कंडिशनर वेगवेगळ्या कालावधीसाठी वापरण्यासाठी तयार केलेला असतो. काही कंडिशनर कमी वेळात काम करतात, तर काहींना जास्त वेळ लागतो.
या लेखात आपण कंडिशनरचा प्रकार, तुमच्या केसांचा प्रकार आणि तुमच्या केसांच्या रुटीनमुळे फायदा होण्याऐवजी गरजेपेक्षा जास्त कंडिशनिंग होत असल्याची चिन्हे कोणती? यानुसार कंडिशनर किती वेळ केसांवर लावून ठेवावा? हे सोप्या भाषेत समजून घेणार आहोत.
कंडिशनर लावण्याची वेळ का महत्त्वाची आहे?
कंडिशनर फक्त काही वेळासाठी केस मऊ करण्यापुरते मर्यादित नाही. तो केसांमधील घर्षण कमी करण्यास, केसांच्या बाहेरील थराला मऊ ठेवण्यास आणि केस धुतल्यानंतर ते सहज विंचरता येतील असे करण्यास मदत करतो.
कंडिशनर योग्य वेळेपुरता केसांवर लावून ठेवल्यास पुढील फायदे मिळू शकतात:
-
केसांमधील गुंता सहज सोडवता येते.
-
केस जास्त गुळगुळीत आणि मऊ वाटतात.
-
विंचरताना केसांवर होणारे घर्षण कमी होते.
-
केस जड न वाटता मऊ राहतात.
-
केस सुकल्यानंतर ते व्यवस्थित टिकून राहण्यास मदत होते.
मात्र, कंडिशनर किती वेळ लावून ठेवायचा यालाही एक मर्यादा आहे. तो खूप लवकर धुऊन टाकल्यास त्याला योग्य प्रकारे काम करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार नाही. उलट, चुकीचा कंडिशनर गरजेपेक्षा जास्त वेळ केसांवर ठेवल्यास केसांवर त्याचा थर जमा होऊ शकतो. त्यामुळे केस चिपचिपीत, निस्तेज किंवा जड वाटू शकतात. त्यांना स्टाइल करणे सुद्धा कठीण होऊ शकते.
केसांसाठी कंडिशनरचे प्रकार
प्रत्येक प्रकारचा कंडिशनर केसांवर वेगवेगळ्या वेळेपुरता वापरण्यासाठी तयार केलेला असतो आणि त्याचे कामही वेगळे असते. त्यामुळे कंडिशनरचा प्रकार कोणता आहे हे समजून घेतल्यास, केसांच्या गरजेनुसार योग्य उत्पादन निवडणे आणि वापरणे सोपे जाते.
रिन्स-आउट कंडिशनर
रिन्स-आउट कंडिशनर हा शॅम्पू केल्यानंतर थोड्या वेळासाठी केसांवर लावून ठेवून नंतर लगेच धुण्यासाठी असतो. यातील काही घटक केसांवर सहज चिकटून राहतात आणि केस धुतल्यानंतर त्यांच्यातील घर्षण कमी करण्यास मदत करतात. यामुळे केस जास्त गुळगुळीत होतात, गुंता सहज सुटतो आणि केसांच्या बाहेरील थराला मऊपणा मिळतो. बहुतेक वेळा हा कंडिशनर काही मिनिटे केसांवर ठेवणे पुरेसे असते.
डीप कंडिशनर किंवा हेअर मास्क
डीप कंडिशनर आणि हेअर मास्क हे केसांना जास्त प्रमाणात कंडिशनिंग देण्यासाठी वापरले जातात. यामध्ये केसांना ओलावा आणि मऊपणा देणारे घटक तसेच वेगवेगळ्या प्रकारची तेलं असतात.
कंडिशनरमध्ये सामान्यतः पुढील घटक आढळू शकतात:
ह्युमेक्टंट्स (Humectants): हे घटक वातावरणातील किंवा केसांच्या आतील थरातील ओलावा खेचून, केसांमध्ये ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करतात.
इमोलिएंट्स (Emollients): हे मऊपणा देणारे तेलकट घटक असतात. केस खराब झाल्यामुळे त्यांच्या बाहेरील थरात निर्माण झालेल्या छोट्या जागा भरून काढण्यास आणि केसांना जास्त गुळगुळीत ठेवण्यासाठी ते मदत करतात.
या प्रक्रियेमुळे केसांच्या संरक्षणासाठी असलेले नैसर्गिक आवरण टिकवून ठेवण्यास सुद्धा मदत होते. निरोगी केस अतिरिक्त पाणी सहज शोषून घेत नाहीत. खराब झालेल्या केसांच्या बाहेरील थराला पुन्हा संरक्षण मिळाल्याने केसांमध्ये आवश्यक असलेला ओलावा टिकून राहतो आणि केस जास्त सहजपणे हाताळता येतात.
लीव्ह-इन कंडिशनर
लीव्ह-इन कंडिशनर केसांवर लावल्यानंतर धुवून टाकायचा नसतो. तो टॉवेलने पुसून घेतलेल्या किंवा किंचित ओलसर असलेल्या केसांवर लावला जातो आणि पुढच्या वेळी केस धुण्यापर्यंत केसांवर राहतो. हा कंडिशनर केसांमध्ये ओलावा टिकवून ठेवण्यास आणि त्यांना मजबूत ठेवण्यास मदत करतो. तसेच, केस धुतल्यानंतर होणारे घर्षण कमी करणे, केस सहज विंचरता येणे आणि धूळ, प्रदूषण किंवा इतर बाह्य घटकांपासून केसांचे संरक्षण करणे हे कंडिशनरचे प्रमुख उद्देश आहेत.
हा कंडिशनर धुता येत नसल्यामुळे किती प्रमाणात वापरला आहे आणि तो किती घट्ट आहे, याकडे लक्ष देणे महत्त्वाचे असते.
प्रोटीन कंडिशनर आणि बॉन्ड-सपोर्ट उपचार
प्रोटीन कंडिशनर आणि बॉन्ड-सपोर्ट उपचार हे केसांच्या आतल्या रचनेला मजबूत करण्यासाठी तयार केलेले खास उपचार आहेत. ब्लीचिंग, जास्त हीट स्टायलिंग किंवा इतर प्रक्रियांमुळे कमकुवत झालेले केस तसेच ओले असताना खूपच लवचिक किंवा ताणले जाणारे केस यांच्यासाठी हे विशेष उपयोगी ठरू शकतात.
आपल्या रोजच्या मॉइश्चर-बेस्ड कंडिशनरपेक्षा हे वेगळे असतात. यांचा वापर उत्पादनावर दिलेल्या सूचनांप्रमाणे करणे महत्त्वाचे आहे. प्रोटीनचा अतिरेक झाल्यास केस कडक, कोरडे किंवा ठिसूळ होऊ शकतात, त्यामुळे त्यांचा योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेच्या अंतराने वापर करणे आवश्यक आहे.
कंडिशनर लावून ठेवण्याची योग्य वेळ : केसांच्या प्रकारानुसार कंडिशनर किती वेळ लावून ठेवावा?
कंडिशनरचे वेगवेगळे प्रकार आणि त्यांचे काम समजून घेणे ही पहिली पायरी आहे. पण, कंडिशनरचा केसांवर जास्त चांगला परिणाम झाला पाहिजे यासाठी तुमच्या केसांचा प्रकार, केसांचा दाटपणा, पोत आणि केसांमधील ओलावा शोषून घेण्याची क्षमता (Porosity) यांचाही विचार करणे महत्त्वाचे आहे.
खाली केसांच्या प्रकारानुसार साधारण किती वेळ कंडिशनर केसांवर ठेवावा, हे दिले आहे:
| केसांचा प्रकार | रोजचे कंडीशनर | डीप कंडिशनर |
|---|---|---|
| बारीक केस | १ ते ३ मिनिटे | ५ ते १० मिनिटे |
| तेलकट केस | १ ते २ मिनिटे ( फक्त केसांच्या टोकांना) | १० ते १५ मिनिटे |
| कुरळे/ जास्त कुरळे केस | ३ ते ५ मिनिटे | २० ते ३० मिनिटे |
| जाड केस | ३ ते ५ मिनिटे | १५ ते २० मिनिटे |
| खराब झालेले/ कलर केलेले केस | ४ ते ५ मिनिटे | २० ते ३० मिनिटे |
ही माहिती तुम्हाला फायदेशीर आहे. तुम्ही वापरत असलेल्या उत्पादनाच्या पॅकेजिंगवर असलेल्या सूचनांकडे नेहमी लक्ष द्या, कारण प्रत्येक कंडिशनरची रचना आणि वापरण्याची पद्धत वेगळी असू शकते.
कंडिशनर केसांवर जास्त वेळ लावून ठेवल्यास काय होते?
कंडिशनर जास्त वेळ केसांवर ठेवल्याने नेहमीच केस जास्त चांगले कंडिशनिंग होतात असे नाही. उलट, केसांवर गरजेपुरता कंडिशनिंगचा थर राहण्याऐवजी जास्तीचा गरज नसलेला थर जमा होऊ शकतो.
लगेच दिसणारे परिणाम
कंडिशनर जास्त वेळ लावून ठेवल्यानंतर केसांमध्ये पुढील बदल जाणवू शकतात:
-
केस गरजेपेक्षा जास्त मऊ होतात आणि त्यांचा नैसर्गिकपणा टिकून राहत नाही.
-
केस गुळगुळीत वाटण्याऐवजी त्यांच्यावर थर जमा झाल्यासारखे वाटतात.
-
ओले असताना केस जड वाटतात.
-
केस सुकल्यानंतर मुळांजवळचे केस चपटे दिसतात.
असे होण्याचे कारण म्हणजे कंडिशनरमधील जास्तीचे घटक केसांच्या बाहेरील थरावर राहतात. त्यामुळे केसांमधील घर्षण कमी होण्याऐवजी त्यांच्यावर गरजेपेक्षा जास्त कंडिशनर जमा होऊ शकते.
कमी काळ असणाऱ्या समस्या
कंडिशनरचा केसांशी जास्त वेळ संपर्क राहिल्यास त्याचा परिणाम आणखी जाणवू शकतो. यामुळे:
-
केस निस्तेज आणि लोंबकळलेले दिसू शकतात.
-
केसांचा नैसर्गिक व्हॉल्यूम कमी होऊ शकतो.
-
केसांची स्टाइल जास्त वेळ टिकत नाही.
-
लांब केसांवर कंडिशनरचा थर किंवा अवशेष जमा होऊ शकतात.
-
कंडिशनर केसांच्या मुळांजवळ लावल्यास टाळू लवकर तेलकट होऊ शकतो.
-
केस कोरडे झाल्यामुळे नाही, तर कंडिशनरचा जास्त थर जमा झाल्यामुळे त्यांची चमक कमी होऊ शकते.
रिन्स-आउट कंडिशनरला हेअर मास्कप्रमाणे जास्त वेळ लावून ठेवणे, बारीक केसांवर खूप घट्ट किंवा जड कंडिशनर वापरणे किंवा आधीच कंडिशनिंग केलेल्या केसांवर जास्त प्रमाणात लीव्ह-इन कंडिशनर लावून ठेवल्यामुळे ही समस्या जास्त जाणवू शकते.
दीर्घकाळ प्रमाणाबाहेर कंडिशनर वापरण्याची सवय
जर तुम्ही वारंवार कंडिशनर जास्त प्रमाणात किंवा जास्त वेळ वापरत राहिलात, तर केस नेहमीच जड आणि निस्तेज वाटू शकतात :
-
केसांचा आकार किंवा स्टाइल टिकवण्यासाठी खूप मऊ वाटू शकतात.
-
ओले असताना ताणलेले किंवा कमकुवत वाटू शकतात.
-
केसांना व्हॉल्यूम देऊन स्टाइल करणे कठीण होऊ शकते.
-
केसांवर जमा झालेला थर काढण्यासाठी वारंवार केस धुवावेसे वाटू शकतात.
याचा अर्थ असा होतो की, केसांच्या बाहेरील थरावर कंडिशनिंग जास्त झाल्यामुळे केसांचा नैसर्गिक समतोल बिघडू लागला आहे.
तुमचे केस जास्त कंडिशनिंग झाल्याची लक्षणे
कंडिशनर जास्त वापरल्यामुळे केस नेहमी कोरडे किंवा खराब दिसतीलच असे नाही. उलट, सुरुवातीला केस खूप मऊ आणि गुळगुळीत वाटू शकतात.
खालीलपैकी काही लक्षणे दिसत असतील, तर तुमच्या केसांवर कंडिशनरचा जास्त वापर होत असण्याची शक्यता आहे:
-
केस खूप मऊ वाटतात, पण ते मजबुत जाणवत नाही.
-
केसांच्या मुळांजवळचा व्हॉल्यूम लवकर कमी होतो.
-
कुरळ्या केसांचा नैसर्गिक आकार टिकत नाही.
-
केसांच्या टोकांवर कंडिशनरचा थर जमा झाल्यासारखा वाटतो.
-
केसांच्या बटा एकमेकांपासून सहज वेगळ्या होत नाहीत.
-
केस धुतल्यानंतरही ते निस्तेज दिसतात.
-
ओले केस गरजेपेक्षा जास्त ताणले जातात किंवा त्यांना व्यवस्थित हाताळणे कठीण जाते.
यापैकी अनेक गोष्टी तुमच्या बाबतीत होत असतील, तर उपाय म्हणून आणखी कंडिशनर वापरण्याची गरज नसते. त्याऐवजी कंडिशनरचे प्रमाण, वापरण्याची वेळ आणि केसांवर ठेवण्याचा वेळ यामध्ये योग्य संतुलन असणे जास्त महत्त्वाचे आहे.
कंडिशनर योग्य पद्धतीने कसा लावावा?
कंडिशनर योग्य पद्धतीने लावताना केसांच्या ज्या भागावर बाहेरचे घटक किंवा सततच्या घर्षणामुळे परिणाम झाला आहे, त्या भागावर प्रामुख्याने कंडिशनर लावावा.
चांगला परिणाम मिळवण्यासाठी ही सोपी पद्धत वापरा:
-
सुरुवातीला केसांमधील जास्तीचे पाणी काढा: केस खूप ओले असतील तर कंडिशनर पाण्यात मिसळून त्याचा प्रभाव कमी होऊ शकतो.
-
योग्य प्रमाणात कंडिशनर घ्या: सुरुवातीला थोडे कंडिशनर घ्या आणि गरज वाटल्यास नंतर थोडे जास्त लावा.
-
केसांच्या लांबीवर लक्ष द्या: केसांच्या मधल्या भागापासून टोकांपर्यंत कंडिशनर लावणे जास्त योग्य असते, कारण या भागाला साधारणपणे जास्त कंडिशनिंगची गरज असते.
-
कंडिशनर समान प्रमाणात पसरवा: बोटांनी किंवा रुंद दातांच्या कंगव्याने कंडिशनर केसांमध्ये व्यवस्थित पसरवा.
-
कंडिशनरच्या प्रकारानुसार वेळ ठरवा: सामान्य (रोजचा) कंडिशनर कमी वेळ ठेवावा, तर हेअर मास्क किंवा डीप कंडिशनरला तुलनेने जास्त वेळ लागू शकतो.
-
केस व्यवस्थित धुवा: कंडिशनर पूर्णपणे व्यवस्थित धुवून काढा. केस मऊ आणि गुळगुळीत वाटले पाहिजेत; त्यावर कंडिशनरचा थर जमा झाल्यासारखे किंवा केस जड वाटू नयेत.
निष्कर्ष
योग्य पद्धतीने कंडिशनरचा वापर केला, तर केस जास्त गुळगुळीत, मऊ आणि सहज हाताळता येण्यासारखे होऊ शकतात. मात्र, कंडिशनर एकटाच केसांच्या प्रत्येक समस्येवर उपाय करू शकत नाही. कंडिशनर योग्य पद्धतीने वापरून सुद्धा केस कोरडे, कमकुवत, चपटे किंवा हाताळायला कठीण वाटत असतील, तर समस्या फक्त कंडिशनर किती वेळ ठेवला यापुरती मर्यादित नसू शकते.
अशाच परिस्थितीत Traya सारखे उपाय केसांच्या आरोग्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतात. फक्त केसांच्या बाहेरील गोष्टींवर लक्ष देण्याऐवजी, Traya त्वचाविज्ञान, आयुर्वेद आणि पोषणशास्त्र यांचा एकत्रित वापर करून केसांच्या समस्यांमागील कारणे समजून घेण्यावर भर देते.
एकाच उत्पादनावर अवलंबून राहण्याऐवजी, Traya हार्मोन्सचे संतुलन आणि शरीरातील पोषक घटकांचे योग्य शोषण यांसारख्या शरीराच्या आतील घटकांकडेही लक्ष देते. त्यामुळे केसांच्या बाहेरच्या काळजी सोबत केसांचे आरोग्य मुळांपासून टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.
दीर्घकाळ टिकणारे परिणाम मिळवण्यासाठी फक्त बाहेरून केसांची काळजी घेणे पुरेसे नसते. तर बाह्य निगा आणि शरीराचे अंतर्गत आरोग्य यांचा योग्य समतोल साधून संपूर्ण शरीराच्या आरोग्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
1. कंडिशनर केसांवर १५ मिनिटे लावून ठेवणे योग्य आहे का?
होय, जर तो डीप कंडिशनर किंवा हेअर मास्क असेल आणि तो १५ मिनिटे ठेवण्यासाठी तयार केलेला असेल, तर तसे करता येते. मात्र, नियमित रिन्स-आउट कंडिशनर १५ मिनिटे ठेवण्याची सहसा गरज नसते. इतका वेळ ठेवल्यास केस जड किंवा गरजेपेक्षा जास्त मऊ होऊ शकतात.
2. कंडिशनर केसांवर १ तास लावून ठेवू शकतो का?
रोज वापरला जाणारा कंडिशनर एवढा वेळ केसांवर लावून ठेवणे सहसा योग्य नाही. डीप कंडिशनरच्या बाबतीतही १ तास ठेवल्याने नेहमीच जास्त फायदा होईलच असे नाही. उलट, केसांवर उत्पादनाचा थर जमा होऊ शकतो आणि त्यांना स्टाइल करणे कठीण होऊ शकते.
3. केसांवर कंडिशनरचा वापर जास्त झाल्यास कोणती लक्षणे दिसतात?
केस लोंबकळलेले वाटणे, मुळांजवळचा व्हॉल्यूम कमी होणे, कुरळ्या केसांचा किंवा केलेल्या स्टाइलचा आकार लवकर जाणे, केस धुतल्यानंतरही त्यांच्यावर थर असल्यासारखे वाटणे आणि ओले असताना केस खूप मऊ किंवा जास्त ताणले जाणे ही त्याची सामान्य लक्षणे आहेत. याचा अर्थ केस निरोगीपणे मऊ झाले आहेत असे नसून, त्यांच्यावर कंडिशनिंग जास्त झालेली असण्याची शक्यता असते.
4. कंडिशनर २ मिनिटे लावून ठेवणे पुरेसे आहे का?
अनेक रिन्स-आउट कंडिशनरसाठी २ मिनिटे पुरेशी असतात. या वेळेत केसांमधील घर्षण कमी होण्यास, ते सहज विंचरता येण्यास आणि केसांच्या बाहेरील थराला गुळगुळीत ठेवण्यास मदत होते. मात्र, खूप कोरडे, जाड किंवा खराब झालेले केस असल्यास अधिक पोषण देणारा कंडिशनर किंवा जास्त वेळासाठी वापरला जाणारा डीप कंडिशनिंगचा उपचार जास्त योग्य ठरू शकतो.
5. पुरुष आणि स्त्रियांनी कंडिशनर वेगवेगळ्या वेळेपुरता लावून ठेवावा का?
फक्त स्त्री किंवा पुरुष असल्यामुळे कंडिशनर लावून ठेवण्याची वेळ वेगळी असण्याची गरज नाही. केसांची लांबी, घनता, तेलकटपणा, पोत, ओलावा शोषण्याची क्षमता आणि केसांचे नुकसान यांसारख्या गोष्टी वेळ ठरवण्यासाठी महत्वाच्या असतात. लहान केसांना कंडिशनरचे कमी प्रमाण आणि कमी वेळ पुरेसा ठरू शकतो. मात्र, कंडिशनर किती वेळ लावून ठेवायचा? हे ठरवताना तुमच्या केसांचा प्रकार आणि त्यांची स्थिती महत्त्वाची असते; तुम्ही पुरुष आहात की स्त्री, हे नाही.
6. कंडिशनरमुळे केसांची वाढ होते का?
नाही. कंडिशनर केसांमधील घर्षण कमी करून केस तुटण्यापासून वाचवण्यास मदत करतो. त्यामुळे केस निरोगी आणि दाट दिसू शकतात. मात्र, केसांच्या मुळांवर (Hair Follicles) त्याचा थेट परिणाम होत नाही आणि त्यामुळे केसांची वाढ होत नाही. केस सातत्याने विरळ होत असतील किंवा नवीन केसांची वाढ खूपच कमी होत असेल, तर त्यामागील कारण शोधण्यासाठी तज्ज्ञांकडून योग्य तपासणी करून घेणे महत्वाचे आहे.
संदर्भ:
Read More Blogs
केसांसाठी एरंडेल तेल वापरल्यावर परिणाम दिसायला किती वेळ लागतो?
Quick Answer केसांसाठी एरंडेल तेलाचा नियमित वापर केल्यानंतर साधारण ६ ते ८ आठवड्यांत ...
आनुवंशिक केसगळती करण्यात येणारे वैद्यकीय उपचार आणि शस्त्रक्रिया
Quick Answer आनुवंशिक केसगळतीसाठी एकच उपचार प्रत्येकाला योग्य ठरत नाही. सुरुवातीच्या...
केसांची मुळे लहान होणे: आनुवंशिक केसगळतीचे पहिले लक्षण
Quick Answer केसांची मुळे हळूहळू लहान होणे (Hair Miniaturization) हे आनुवंशिक केसगळत...
डिफ्यूज आनुवंशिक केसगळती: कारणे, लक्षणे आणि उपचार
Quick Answer आनुवंशिक केसगळती नेहमी आपल्या अपेक्षेप्रमाणेच दिसते असे नाही. अनेक लोका...





























