icon Skip to content

प्री आणि प्रो बायोटिक कॅप्सूलचे फायदे

Dr Kalyani Deshmukh

Dr Kalyani Deshmukh
Dr. Kalyani Deshmukh brings 7 years of experience in dermatology, specializing in the diagnosis of complex conditions and performing advanced dermatosurgical procedures. Her areas of expertise include clinical dermatology, trichology, dermatosurgery and aesthetic medicine.

प्री आणि प्रो बायोटिक कॅप्सूलचे फायदे

Quick Answer

आजकाल अचानक असा एक ट्रेंड सुरू झाला आहे की आजार कोणताही असो, फक्त प्री अँड प्रो बायोटिक कॅप्सूल्स वापरा आणि सगळं ठीक होईल. सर्दी, खोकला, डोकेदुखीपासून ते अनेक गंभीर आजारांच्या उपचारांसाठीही प्रोबायोटिक्स किंवा प्रोबायोटिक कॅप्सूल्स घेण्याचा सल्ला खूप वेळा दिला जातो. पण हे खरंच आहे का की, प्रत्येक आजाराच्या उपचारासाठी ते प्रभावी ठरतात का?


या ब्लॉगमध्ये आपण प्री आणि प्रो बायोटिक कॅप्सूलचे उपयोग आणि या विषयामागची खरी परिस्थिती जाणून घेणार आहोत. तसेच प्रो बायोटिक आणि प्री बायोटिक कॅप्सूल्स म्हणजे नेमके काय? त्यांचे फायदे आणि नुकसान काय आहेत? आणि त्यांचे सेवन कशा प्रकारे करावे? हे सुद्धा सविस्तर जाणून घेणार आहोत. यासोबतच, याबाबत असलेल्या काही गैरसमजांची खरी माहिती सुद्धा ‘प्री आणि प्रो बायोटिक कॅप्सूलचे फायदे’ या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेल.

तुम्ही तुमच्या आरोग्यावर आणि केसांवर याचा काय परिणाम होऊ शकतो, असा विचार करत असाल. तर Traya ची **फ्री हेअर टेस्ट घ्या ** आणि तुमच्या केसांसाठी कोणते पोषक घटक सर्वात महत्त्वाचे आहेत, हे जाणून घ्या.

प्री बायोटिक आणि प्रो बायोटिक कॅप्सूल म्हणजे काय?

प्री बायोटिक कॅप्सूल हे शरीरात आधीपासून असलेल्या चांगल्या बॅक्टेरियाची वाढ आणि त्यांचे कार्य सुधारण्यासाठी घेतलं जाणारं एक फूड सप्लिमेंट आहे. यामध्ये साधारणपणे शरीराला न पचणाऱ्या फायबरचे स्रोत असतात, जे आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियासाठी अन्नासारखे काम करतात. तर, प्रो बायोटिक कॅप्सूलमध्ये जिवंत सूक्ष्मजीव किंवा चांगले बॅक्टेरिया असतात, जे आतड्यांमधील सूक्ष्मजीवांचे संतुलन राखण्यास मदत करू शकतात. 

म्हणजेच, प्रो बायोटिक कॅप्सूल्स थेट नवीन चांगले बॅक्टेरिया शरीरात पोहोचवतात, तर प्री बायोटिक कॅप्सूल्स आधीपासून असलेल्या चांगल्या बॅक्टेरियाच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार करण्यास मदत करतात. त्यामुळे प्री आणि प्रो बायोटिक मधील फरक समजून घेतल्यास या दोन्हींचे कार्य वेगळे असले तरी ते एकमेकांना पूरक ठरू शकतात, हे स्पष्ट होते.

प्रो बायोटिक कॅप्सूल्सचा वापर सामान्यतः काही विशिष्ट पचनाच्या समस्या किंवा आतड्यांच्या आरोग्याशी संबंधित त्रासांमध्ये केला जातो. काही परिस्थितींमध्ये त्यांचा वापर केल्याने पचनसंस्थेतील सूक्ष्मजीवांचे संतुलन राखण्यास मदत होऊ शकते. तर, प्री बायोटिक कॅप्सूल्स आतड्यांचं एकूण आरोग्य सुधारण्यास मदत करू शकतात आणि संभाव्यतः प्रो बायोटिक्सच्या परिणामांवरही प्रभाव टाकू शकतात. मात्र, प्रत्येक व्यक्तीला या सप्लिमेंट्सची गरज असेलच असं नाही. त्यांचा वापर करण्यापूर्वी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणं योग्य ठरू शकतं. अशा प्रकारे, हे दोन्ही कॅप्सूल्स म्हणजे काय आणि त्यांचा वापर का केला जातो, हे तुम्हाला समजलं. आता प्री बायोटिक आणि प्रो बायोटिक कॅप्सूल याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया.

Pre and Probiotic capsules uses in Marathi | प्री बायोटिक आणि प्रो बायोटिक कॅप्सूलचे फायदे

आत्तापर्यंत तुम्ही प्री बायोटिक आणि प्रो बायोटिक कॅप्सूल म्हणजे काय आणि आपल्या शरीरासाठी त्यांचे महत्त्व काय आहे, हे सविस्तर जाणून घेतलं. आता प्री आणि प्रो बायोटिक कॅप्सूलचे उपयोग समजून घेऊया आणि हे कॅप्सूल्स आपल्याला कोणत्या प्रकारे मदत करू शकतात, हे जाणून घेऊया.

हे दोन्ही कॅप्सूल्स आतड्यांच्या आरोग्याशी संबंधित असले तरी त्यांचे कार्य अगदी सारखे नसते. प्री बायोटिकचे फायदे प्रामुख्याने आतड्यांमध्ये आधीपासून असलेल्या चांगल्या बॅक्टेरियांसाठी पोषक वातावरण तयार करण्याशी संबंधित असतात, तर प्रो बायोटिक्समध्ये जिवंत आणि उपयुक्त सूक्ष्मजीव असतात. त्यामुळे दोन्हींचा वापर योग्य पद्धतीने केल्यास आतड्यांचे आरोग्य राखण्यास मदत होऊ शकते.

1. पचनक्रिया सुधारण्यास मदत करते

प्रो बायोटिक कॅप्सूल्सचा सर्वात महत्त्वाचा फायदा आपल्या पचनक्रियेशी संबंधित असतो. याच्या सेवनामुळे पचनक्रिया सुधारण्यास आणि अन्न पचण्यासही मदत होऊ शकते. प्रो बायोटिक कॅप्सूलचे फायदे समजून घेताना पचनसंस्थेतील चांगल्या आणि इतर बॅक्टेरियांमधील संतुलनाची भूमिका लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

या बॅक्टेरियांमधील संतुलनामुळे आपल्या शरीराला अनेक फायदे मिळू शकतात. उदाहरणार्थ, यामुळे पोटात गॅस होण्याची समस्या कमी होऊ शकते, पोटाची सूज कमी होऊ शकते आणि अपचनाची समस्या कमी होण्यास मदत होऊ शकते. काही प्रो बायोटिक्स नियमित शौचास होण्यास आणि आतड्यांची हालचाल सुरळीत ठेवण्यासही मदत करू शकतात. मात्र, प्रो बायोटिक कॅप्सूल कशासाठी वापरतात हे व्यक्तीच्या आरोग्यस्थितीनुसार बदलू शकते. कोणत्या प्रकारचा प्रो बायोटिक घ्यायचा हेही व्यक्तीच्या समस्येनुसार बदलू शकते.

2. इम्यून सिस्टम मजबूत करण्यास मदत करते

प्रो बायोटिक कॅप्सूल्सचा दुसरा फायदा आपल्या इम्यून सिस्टम म्हणजेच प्रतिकारशक्तीशी संबंधित आहे. हे आपल्या इम्यून सिस्टमला योग्य प्रकारे कार्य करण्यासाठी आधार देऊ शकतात. आपल्या आतड्यांमध्ये असलेले सूक्ष्मजीव आणि रोगप्रतिकारक यंत्रणा यांचा जवळचा संबंध असतो. त्यामुळे आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवणे हे संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे ठरते.

प्रो बायोटिक्स आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियांचे संतुलन राखण्यास मदत करू शकतात. तसेच, काही हानिकारक सूक्ष्मजीवांची वाढ रोखण्यास आणि शरीरातील दाहक प्रक्रिया नियंत्रित ठेवण्यासही ते मदत करू शकतात. यामुळे शरीराच्या नैसर्गिक संरक्षण यंत्रणेला आधार मिळू शकतो. मात्र, प्रो बायोटिक्स हे आजारांपासून पूर्णपणे संरक्षण देणारे किंवा प्रतिकारशक्ती वाढवणारे औषध आहेत असे समजणे योग्य नाही. त्यामुळे प्रो बायोटिक कॅप्सूलचे उपयोग समजून घेताना त्यांचा वापर कोणत्या परिस्थितीत केला जातो, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.

3. मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करतात

प्रो बायोटिक कॅप्सूल्सचं आणखी एक कार्य म्हणजे मानसिक आरोग्याशी संबंधित संभाव्य फायदा. हेल्थलाइननुसार, लॅक्टोबॅसिलस आणि बिफिडोबॅक्टेरियम यांसारख्या काही बॅक्टेरियांचा मानसिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यात आला आहे. लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया शरीरातील काही रासायनिक प्रक्रियांवर परिणाम करून चिंता आणि तणावाच्या लक्षणांमध्ये मदत करू शकतात.

तर दुसरीकडे, बिफिडोबॅक्टेरियम लाँगमसारख्या काही बॅक्टेरियांचाही तणाव आणि मूडशी संबंधित परिणामांसाठी अभ्यास करण्यात आला आहे. आपल्या आतड्यांचे आरोग्य आणि मेंदूचे कार्य यांच्यातील संबंधाला ‘गट-ब्रेन ॲक्सिस’ असं म्हटलं जातं. त्यामुळे आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवणे मानसिक आरोग्यासाठीही उपयुक्त ठरू शकते. मात्र, ॲन्झायटी किंवा डिप्रेशनसारख्या समस्यांवर केवळ प्रो बायोटिक्सवर अवलंबून राहू नये. त्यामुळे प्री बायोटिकचे फायदे आणि प्रो बायोटिक्सच्या संभाव्य फायद्यांचा विचार करताना संपूर्ण आरोग्यस्थिती लक्षात घेणे गरजेचे आहे.

4. डायरियाची समस्या कमी करण्यास मदत करते

डायरिया ही पोटाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये पातळ शौच होणे, पोटदुखी होणे, तसेच काही वेळा शौचामध्ये रक्त किंवा श्लेष्मा येणे अशी लक्षणं दिसू शकतात. अशा वेळी काही विशिष्ट प्रो बायोटिक्स डायरियाची समस्या कमी करण्यास मदत करू शकतात. विशेषतः अँटिबायोटिक्स घेतल्यानंतर होणाऱ्या डायरियामध्ये काही प्रो बायोटिक स्ट्रेनचा उपयोग होऊ शकतो.

खरं तर, अँटिबायोटिक्समुळे आतड्यांमधील चांगल्या आणि इतर बॅक्टेरियांचं संतुलन बिघडू शकतं. अशा वेळी प्रो बायोटिक्स हे संतुलन पूर्ववत करण्यास मदत करू शकतात. डायरियाची समस्या कमी करण्यासाठी लॅक्टोबॅसिलस रम्नोसस, लॅक्टोबॅसिलस कॅसी आणि यीस्ट सॅक्रोमायसेस बौलार्डी यांसारख्या प्रो बायोटिक स्ट्रेनचा अभ्यास करण्यात आला आहे. मात्र, डायरिया जास्त दिवस राहिल्यास किंवा शरीरात पाण्याची कमतरता जाणवत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

5. वजन कमी करण्यास मदत करू शकते

प्रो बायोटिक कॅप्सूलचे फायदे वजन व्यवस्थापनासाठीही काही प्रमाणात होऊ शकतात. वजन वाढलेलं असणं किंवा लठ्ठपणासोबत हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि इतर आरोग्यविषयक समस्या उद्भवण्याचा धोका वाढू शकतो. काही प्रो बायोटिक्स आतड्यांमधील सूक्ष्मजीवांचे संतुलन सुधारण्यास मदत करू शकतात, ज्याचा शरीरातील चयापचयावर परिणाम होऊ शकतो.

काही विशिष्ट प्रो बायोटिक स्ट्रेन आहारातील चरबीच्या शोषणावर किंवा शरीरातील चरबीच्या साठवणुकीशी संबंधित प्रक्रियांवर परिणाम करू शकतात. त्यामुळे वजन व्यवस्थापनात त्यांची काही भूमिका असू शकते. मात्र, केवळ प्रो बायोटिक कॅप्सूल्स घेतल्याने वजन कमी होईल असे नाही. संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि योग्य जीवनशैली यांसोबतच त्यांचा विचार करणे अधिक योग्य आहे. वजन कमी करण्यासाठी प्रो बायोटिक्स घ्यायचे असल्यास डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

6. हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते

प्री आणि प्रो बायोटिक कॅप्सूलचे उपयोग हृदयाच्या आरोग्यासाठीही होऊ शकतात. काही विशिष्ट प्रो बायोटिक्समुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलच्या पातळीवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. लॅक्टोबॅसिलस रॉयटेरी आणि बिफिडोबॅक्टेरियम ॲनिमॅलिस लॅक्टिस यांसारख्या काही स्ट्रेनचा कोलेस्ट्रॉलशी संबंधित परिणामांसाठी अभ्यास करण्यात आला आहे.

यासोबतच, काही प्रो बायोटिक्स रक्तदाबाच्या नियंत्रणातही थोडी मदत करू शकतात. आतड्यांमधील सूक्ष्मजीवांचे संतुलन, शरीरातील दाह आणि चयापचय यांचा हृदयाच्या आरोग्याशी संबंध असू शकतो. मात्र, प्रो बायोटिक्समुळे हार्ट अटॅक किंवा हृदयविकाराचा धोका निश्चितपणे कमी होतो असे म्हणता येत नाही. हृदय निरोगी ठेवण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम, वजन नियंत्रण आणि रक्तदाब-कोलेस्ट्रॉलची नियमित तपासणी अधिक महत्त्वाची आहे.

7. त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत करू शकते

प्रो बायोटिक आणि प्री बायोटिक टॅबलेट्सचे फायदे त्वचेसाठीही होऊ शकतात. आतड्यांचे आरोग्य आणि त्वचेचे आरोग्य यांच्यातील संबंधाला ‘गट-स्किन ॲक्सिस’ म्हटलं जातं. आतड्यांमधील सूक्ष्मजीवांचे संतुलन शरीरातील दाह आणि रोगप्रतिकारक यंत्रणेवर परिणाम करू शकते, ज्याचा अप्रत्यक्ष परिणाम त्वचेवर होऊ शकतो.

काही प्रो बायोटिक्स कोरडी त्वचा, ॲक्ने किंवा एक्झिमासारख्या काही त्वचाविषयक समस्यांमध्ये मदत करू शकतात, असे संशोधनातून दिसून आले आहे. मात्र, प्रत्येक व्यक्तीला याचा समान फायदा होईलच असे नाही. प्रो बायोटिक्सचा त्वचेवर लावण्याचा म्हणजेच टॉपिकल स्वरूपातील वापर आणि तोंडावाटे घेण्याचा परिणामही वेगळा असू शकतो. त्यामुळे त्वचेची गंभीर किंवा सततची समस्या असल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.

8. केसांच्या वाढीमध्ये मदत करू शकतात

निरोगी केसांच्या वाढीसाठी तुमच्या टाळूचं निरोगी असणं गरजेचं आहे. अशा वेळी प्रो बायोटिक्स फायदेशीर बॅक्टेरियांची वाढ वाढवून आणि हानिकारक बॅक्टेरियांना थांबवून टाळूचं नैसर्गिक संतुलन राखण्यास मदत करू शकतात. यामुळे डँड्रफ किंवा ऑयली स्काल्पसारख्या काही समस्यांमध्ये मदत होऊ शकते.

विशेषतः लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलससारख्या काही प्रो बायोटिक स्ट्रेनचा त्वचा आणि टाळूच्या आरोग्याशी संबंधित अभ्यास करण्यात आला आहे. आतड्यांचे आरोग्य, पोषणाचे शोषण, प्रतिकारशक्ती आणि शरीरातील दाह यांचा अप्रत्यक्ष परिणाम केसांच्या आरोग्यावर होऊ शकतो. त्यामुळे प्री बायोटिकचे फायदे आणि प्रो बायोटिक्सचे संभाव्य परिणाम केसांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही अभ्यासले जात आहेत. मात्र, केसगळती कमी करण्यासाठी किंवा नवीन केस उगवण्यासाठी प्रो बायोटिक्स प्रभावी असल्याचे ठोस पुरावे अद्याप मर्यादित आहेत.न केस उगवण्यासाठी प्रो बायोटिक्स प्रभावी असल्याचे ठोस पुरावे अद्याप मर्यादित आहेत.

केसांची वाढ न होण्यामागे किंवा केस गळती होण्यामागे आनुवंशिकता, हार्मोनल बदल, पोषणाची कमतरता, तणाव, टाळूच्या समस्या आणि इतर अनेक कारणं असू शकतात. त्यामुळे कारण समजून न घेता केवळ प्रो बायोटिक्स किंवा इतर सप्लिमेंट्स घेणे योग्य नाही. आम्ही तुम्हाला सर्वात आधी Traya Hair Test करण्याचा सल्ला देतो. यामुळे केसगळतीमागील संभाव्य कारण समजून घेण्यास आणि त्यानुसार योग्य उपचारांची दिशा ठरवण्यास मदत होऊ शकते.

Pre & Probiotic Granules for Oral Suspension Uses in Marathi

खूप वेळा जेव्हा तुम्ही प्री बायोटिक आणि प्रो बायोटिकची औषधं घेता, तेव्हा त्यावर Pre and Probiotic Granules for Oral Suspension असं लिहिलेलं दिसतं. पण याचा अर्थ काय आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? शेवटी ग्रॅन्युल्स आणि ओरल सस्पेन्शन म्हणजे काय? चला, समजून घेऊया.

याचा अर्थ असा की, तुम्हाला दिलेली बायोटिकची औषधं ग्रॅन्युलर म्हणजेच दाणेदार स्वरूपात आहेत, ज्यामध्ये प्री बायोटिक आणि प्रो बायोटिक दोन्ही असतात. हे औषध साधारणपणे पाणी, इतर लिक्विड किंवा डॉक्टरांनी सुचवलेल्या लिक्विडसोबत मिसळून घ्यावं. ओरल सस्पेन्शन म्हणजे औषध द्रवामध्ये मिसळून तोंडावाटे घेण्याचे स्वरूप. ग्रॅन्युल्स पूर्णपणे द्रवामध्ये मिसळल्यानंतर ते डॉक्टरांनी किंवा पॅकेजवर दिलेल्या सूचनेनुसार घ्यावे. औषध तयार केल्यानंतर ते किती वेळ वापरायचे, तेही लेबलवरील सूचनांनुसार पाहणे महत्त्वाचे आहे.

खरं तर हे औषध ग्रॅन्युलर म्हणजेच दाणेदार स्वरूपात तयार करून विकण्याव्यतिरिक्त कॅप्सूल, टॅबलेट, लिक्विड, पावडर अशा इतरही अनेक स्वरूपात मॅन्युफॅक्चर केलं जातं. कोणतं स्वरूप निवडायचं हे औषधातील घटक, व्यक्तीचं वय आणि डॉक्टरांचा सल्ला यावर अवलंबून असू शकतं. विशेषतः मुलांसाठी किंवा ज्यांना कॅप्सूल गिळण्यास त्रास होतो, त्यांच्यासाठी ग्रॅन्युल्स किंवा सस्पेन्शनचे स्वरूप काही वेळा सोयीचे ठरू शकते. अशा औषधांच्या बाबतीत प्रो बायोटिक कॅप्सूल कशासाठी वापरतात यासोबतच औषध कोणत्या स्वरूपात आणि कोणत्या कारणासाठी दिले आहे, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

याचे फायदे पुढीलप्रमाणे आहेत:

  • आतड्यांचं आरोग्य सुधारण्यास मदत करते: प्री बायोटिक्स आणि प्रो बायोटिक्स आतड्यांमधील उपयुक्त बॅक्टेरियांच्या संतुलनाला आधार देऊ शकतात. त्यामुळे पचनसंस्थेचं आरोग्य टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते.

  • त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत करते: आतड्यांचं आरोग्य आणि त्वचेचं आरोग्य यांच्यात संबंध असल्यामुळे काही प्रो बायोटिक्स त्वचेच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरू शकतात.

  • वजन कमी करण्यास मदत करू शकते: काही विशिष्ट प्रो बायोटिक्स वजन व्यवस्थापनात काही प्रमाणात मदत करू शकतात. मात्र, केवळ या औषधावर अवलंबून न राहता संतुलित आहार आणि नियमित व्यायाम करणंही महत्त्वाचं आहे.

प्री बायोटिक आणि प्रो बायोटिक ग्रॅन्युल्स वापरण्यापूर्वी पॅकेजवरील सूचना काळजीपूर्वक वाचा आणि डॉक्टरांनी दिलेला डोस व वापरण्याची पद्धत पाळा. प्रत्येक व्यक्तीला प्रो बायोटिक्सचा परिणाम सारखा मिळेलच असं नाही.

Pre & Probiotic with L-Glutamine Capsules Uses in Marathi

तुम्ही खूप वेळा पाहिलं असेल की, काही औषधांवर Pre & Probiotic with L-Glutamine Capsules असं लिहिलेलं असतं किंवा डॉक्टर या नावाची प्रिस्क्रिप्शन देऊन तुम्हाला हे औषध घेण्याचा सल्ला देतात. पण शेवटी हे एल-ग्लुटामाईन कॅप्सूल्स म्हणजे काय आणि ते घेतल्याने काय फायदे होतात? हे कोणी घ्यायला हवे? चला, समजून घेऊया.

प्री बायोटिक हे पचवता न येणारं फायबर आहे, तर प्रो बायोटिक म्हणजे आतड्यांमध्ये असलेले जिवंत सूक्ष्मजीव आहेत. आतड्यांमध्ये असलेल्या उपयुक्त प्रो बायोटिक्ससाठी प्री बायोटिक हा एक महत्त्वाचा डाएट सोर्स असतो. तर दुसरीकडे, एल-ग्लुटामाईन हे एक अमिनो ॲसिड आहे, जे शरीरातील विविध प्रक्रियांमध्ये भूमिका बजावतं. आतड्यांच्या पेशींना आणि इम्यून फंक्शनला त्याची भूमिका असू शकते. त्यामुळे प्री बायोटिक, प्रो बायोटिक आणि एल-ग्लुटामाईन हे घटक एकत्रितपणे आतड्यांच्या आरोग्याला आधार देण्यासाठी वापरले जाऊ शकतात.

अशा प्रकारच्या कॅप्सूल्सचा वापर विशेषतः पचनसंस्थेचं आरोग्य सुधारण्यासाठी, आतड्यांमधील उपयुक्त बॅक्टेरियांचं संतुलन राखण्यासाठी आणि काही परिस्थितींमध्ये शरीराला अतिरिक्त पोषणाचा आधार देण्यासाठी केला जाऊ शकतो. मात्र, प्रत्येक व्यक्तीला एल-ग्लुटामाईन किंवा प्रो बायोटिक सप्लिमेंटची गरज असेलच असं नाही. त्याचा वापर व्यक्तीची आरोग्यस्थिती, आहार आणि डॉक्टरांचा सल्ला यानुसार ठरवणं योग्य आहे.

Pre & Probiotic with L-Glutamine Capsules कोणी घ्यायला हवे, चला जाणून घेऊया:

  • ज्यांना पचनाशी संबंधित समस्या आहेत: वारंवार गॅस, पोट फुगणे, अपचन किंवा आतड्यांच्या आरोग्याशी संबंधित काही समस्या जाणवत असतील, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने अशा सप्लिमेंट्सचा विचार केला जाऊ शकतो. मात्र, सतत पचनाच्या समस्या असल्यास त्यामागचं मूळ कारण शोधणं महत्त्वाचं आहे.

  • आजारपणातून किंवा सर्जरीनंतर बरे होत असलेले व्यक्ती: आजारपण किंवा सर्जरीनंतर शरीराला रिकव्हर होण्यासाठी योग्य पोषणाची गरज असते. अशा वेळी काही व्यक्तींना एल-ग्लुटामाईन आणि प्रो बायोटिक्स असलेले सप्लिमेंट्स डॉक्टरांच्या सल्ल्याने दिले जाऊ शकतात. मात्र, सर्जरीनंतर स्वतःहून कोणतेही सप्लिमेंट घेऊ नये.

  • ॲथलीट्स आणि सक्रिय जीवनशैली असलेले व्यक्ती: नियमित व्यायाम किंवा कठोर शारीरिक प्रशिक्षण करणाऱ्या व्यक्तींना शरीरावर अधिक ताण येऊ शकतो. अशा वेळी संतुलित आहारातून पुरेसं प्रोटीन, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळणं महत्त्वाचं आहे. काही परिस्थितींमध्ये डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांच्या सल्ल्याने अशा सप्लिमेंट्सचा वापर केला जाऊ शकतो.

  • ज्यांची इम्यून सिस्टम कमकुवत आहे: आतड्यांचं आरोग्य आणि शरीराची प्रतिकारशक्ती यांचा एकमेकांशी संबंध असतो. त्यामुळे काही व्यक्तींमध्ये प्रो बायोटिक्स आतड्यांमधील उपयुक्त बॅक्टेरियांचं संतुलन राखण्यास मदत करू शकतात. मात्र, कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तींनी प्रो बायोटिक्स किंवा एल-ग्लुटामाईन स्वतःहून घेण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेणं अधिक सुरक्षित आहे.

 प्री बायोटिक आणि प्रो बायोटिक चे स्रोत कोणते आहेत?

अनेक खाद्य पदार्थांच्या मदतीने आपल्याला सहजपणे प्री बायोटिक्स मिळू शकतात. चला जाणून घेऊया की प्री बायोटिक्स मिळवण्यासाठी कोणते खाद्य पदार्थ खाणं महत्त्वाचं ठरतं:

  • दही

  • केळं, सफरचंद आणि आंबट फळं

  • हिरव्या पालेभाज्या

  • बीन्स, डाळी आणि मटार

  • होल ग्रेन्स

तसंच, खाद्य पदार्थांच्या मदतीने प्रो बायोटिक्स म्हणजेच जिवंत आणि फायदेशीर सूक्ष्मजीव कोणत्या पदार्थांमधून मिळवता येतात, तेही जाणून घेऊया:

  • केफिर

  • आंबट कोबी

  • किमची

  • कोंबुचा

याशिवाय, डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर  प्री बायोटिक आणि प्रो बायोटिक यांचंही सेवन करू शकता. हे कॅप्सूल्स तुम्हाला सहजपणे मेडिकल स्टोअर्समध्ये मिळू शकतात. जर खाद्य पदार्थांमधून तुम्हाला पुरेसे प्रो बायोटिक्स आणि प्री बायोटिक्स मिळत नसतील, तर तुम्ही त्यांचे कॅप्सूल्स सप्लिमेंट म्हणून घेऊ शकता.

या स्रोतांमधून मिळणारे घटक समजून घेताना प्री आणि प्रो बायोटिक मधील फरक लक्षात ठेवणे उपयुक्त ठरते. प्री बायोटिक्स फायदेशीर बॅक्टेरियांसाठी अन्नासारखे काम करतात, तर प्रो बायोटिक्समध्ये जिवंत सूक्ष्मजीव असतात.

प्री आणि प्रो बायोटिक्स कॅप्सूल्सचे नुकसान

जिथे एकीकडे प्री बायोटिक्स आणि प्रो बायोटिक्स कॅप्सूल्सचे फायदे आहेत, तिथे त्यांचे काही नुकसानही होऊ शकते. जरी हे सामान्यतः सुरक्षित मानले जात असले, तरी काही लोकांना याचे काही साइड इफेक्ट्स सुद्धा जाणवू शकतात. हे साइड इफेक्ट्स पुढीलप्रमाणे आहेत:

  • पोटदुखी

  • पोट फुगणे

  • ॲलर्जी

  • अचानक जास्त तहान लागणे

  • थोडं धुसर दिसणे

यापैकी कोणताही साइड इफेक्ट या कॅप्सूल्सच्या सेवनामुळे जाणवत असेल, तर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा आणि त्यांना या साइड इफेक्ट्सबद्दल माहिती द्या. गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय याचं सेवन अजिबात करू नये.

प्रोबायोटिक आणि प्रीबायोटिक कॅप्सूल्सशी संबंधित गैरसमज

प्री आणि प्रो बायोटिक कॅप्सूल्सच्या वापराशी संबंधित अनेक गैरसमज आहेत, ज्यांची सत्यता जाणून घेणे गरजेचे आहे. हळूहळू नवीन जेनरेशनमधील लोक याचा वापर जास्तीत जास्त करू लागले आहेत. अशा वेळी काही दाव्यांची सत्यता तपासणेही गरजेचे आहे. चला तर मग, अशाच काही दाव्यांचा फॅक्ट चेक करूया.

गैरसमज 1. सर्व प्रो बायोटिक कॅप्सूल्स सारखेच असतात

सर्व प्रो बायोटिक कॅप्सूल्स सारखेच असतात, असे म्हणणे अगदी चुकीचे आहे. प्रो बायोटिक्सचे अनेक प्रकार आहेत आणि प्रत्येक कॅप्सूलमध्ये वेगवेगळे गुणधर्म असतात, जे वेगवेगळ्या समस्यांवर काम करतात. याशिवाय, प्रत्येक व्यक्तीसाठी प्रो बायोटिक्स सारखेच प्रभावी ठरतील असेही नाही. प्रत्येक व्यक्तीवर त्याचा परिणाम वेगवेगळा असू शकतो.

त्यामुळे प्रो बायोटिक कॅप्सूलचे उपयोग समजून घेताना कोणता स्ट्रेन वापरला जात आहे आणि तो कोणत्या कारणासाठी वापरला जात आहे, याचा विचार करणे महत्त्वाचे आहे.

गैरसमज 2. प्रो बायोटिक कॅप्सूल्स कोणत्याही समस्येवर उपाय करू शकतात

असे मानले जाते की, प्रो बायोटिक्स टॅबलेट्सचे सेवन केल्याने छोट्या-मोठ्या प्रत्येक आजारापासून आराम मिळू शकतो. पण हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे. प्रो बायोटिक्सचे अनेक फायदे असले तरी ते प्रत्येक आजारावर उपचार करतील असे अजिबात नाहीत. त्यांचा वापर फक्त निरोगी आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी केला पाहिजे, कोणत्याही आजाराच्या उपचारासाठी नाही. प्रो बायोटिक कॅप्सूल कशासाठी वापरतात याचे उत्तर व्यक्तीची समस्या आणि उपलब्ध वैज्ञानिक पुराव्यांनुसार बदलू शकते.

गैरसमज 3. प्रो बायोटिक्स आयुष्यभर घेतले पाहिजे

असे अजिबात आवश्यक नाही. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही याचे सेवन आयुष्यभर करू शकता, पण ते अजिबात गरजेचे नाही. याशिवाय, प्रत्येक व्यक्तीला याचे फायदेही वेगवेगळ्या प्रकारे मिळू शकतात. काही लोकांमध्ये याचे आरोग्याशी संबंधित फायदे कमी वेळातच दिसू लागतात, तर काही व्यक्तींमध्ये त्याचा परिणाम दिसण्यासाठी बराच वेळ लागू शकतो. त्यामुळे प्री बायोटिकचे फायदे किंवा प्रो बायोटिक्सचे फायदे मिळवण्यासाठी ते कायम घेणे आवश्यक आहे, असे समजू नका.

गैरसमज 4. दही खा आणि सर्व प्रकारचे प्रोबायोटिक्स मिळवा

ही स्कीम ऐकायला जरी छान वाटत असली, तरी ती पूर्णपणे खरी नाही. फक्त दही खाल्ल्याने तुम्हाला सर्व प्रकारचे प्रो बायोटिक्स मिळू शकत नाहीत. दह्यासोबत इतर अनेक खाद्यपदार्थांचाही आहारात समावेश करायला हवा आणि गरज भासल्यास त्याचे सप्लिमेंट घेण्याचाही विचार करायला हवा.

मिथक 5. जर अँटिबायोटिक्स घेत असाल, तरच प्रो बायोटिक्स घ्या

असे अजिबात गरजेचे नाही. तुम्ही अँटिबायोटिक्स घेत आहात की नाही, याने फरक पडत नाही. अँटिबायोटिक्सचे सेवन करत नसतानाही तुम्ही प्रो बायोटिक्स घेऊ शकता. अँटिबायोटिक्समुळे आतड्यांमधील चांगल्या आणि वाईट बॅक्टेरियाचे संतुलन नक्कीच बिघडू शकते. अशा वेळी प्रो बायोटिक्सची गरज भासू शकते. मात्र, अँटिबायोटिक्सचे सेवन न करणाऱ्या व्यक्तीही प्रो बायोटिक्स घेऊ शकतात.

निष्कर्ष

प्री आणि प्रो बायोटिक कॅप्सूलचे उपयोग प्रामुख्याने पचनसंस्थेच्या आरोग्याशी संबंधित काही परिस्थितींमध्ये पाहिले जातात. हे कॅप्सूल्स आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियांची संख्या आणि संतुलन राखण्यास मदत करून पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करू शकतात. यासोबतच, आतड्यांचे आरोग्य सुद्धा चांगले राहते.

पण, प्रत्येक व्यक्तीच्या शरीराची गरज आणि आरोग्याची स्थिती वेगळी असते. त्यामुळे प्री आणि प्रो बायोटिक्सचे परिणामही प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळे असू शकतात. केवळ सप्लिमेंट्सवर अवलंबून न राहता संतुलित आहार, पुरेसे पाणी, नियमित व्यायाम आणि योग्य जीवनशैली यांनाही महत्त्व द्यावे.

पण, यांचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. जेणेकरून तुमच्या वैयक्तिक गरजा आणि आरोग्याची स्थिती लक्षात घेऊन योग्य मार्गदर्शन मिळू शकेल. जर तुम्ही आधीपासून कोणतीही औषधे घेत असाल, आजारपणातून रिकव्हर होत असाल किंवा तुम्हाला सतत पचनाशी संबंधित समस्या जाणवत असतील, तर स्वतःहून कोणतेही सप्लिमेंट सुरू करू नये. योग्य प्रकारचे प्री बायोटिक किंवा प्रो बायोटिक, त्याचा डोस आणि किती काळ घ्यायचे हे तज्ज्ञांच्या सल्ल्याने ठरवणे अधिक योग्य ठरेल.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

1. प्री आणि प्रो बायोटिक कॅप्सूल्सचा काय उपयोग आहे?

प्री आणि प्रो बायोटिक कॅप्सूलचे उपयोग समजून घेताना त्यांचा पचनसंस्थेवर होणारा संभाव्य परिणाम महत्त्वाचा आहे. प्री आणि प्रो बायोटिक कॅप्सूल्स डायरियाची समस्या कमी करण्यास, इम्यून सिस्टम मजबूत करण्यास आणि पचनसंस्था सुधारून पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करतात. यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास, मानसिक आरोग्य सुधारण्यास आणि तणाव कमी करण्यास सुद्धा मदत होऊ शकते. तसेच, केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठीही हे महत्त्वाचे ठरू शकतात.

2. प्रो बायोटिक कॅप्सूल्स कधी घ्याव्या?

सामान्यतः प्रोबायोटिक कॅप्सूल्सचे सेवन रिकाम्या पोटी किंवा ब्रेकफास्टनंतर करावे. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय याचे सेवन करणे हानिकारक ठरू शकते. त्यामुळे योग्य वेळ आणि घेण्याची पद्धत जाणून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

3. महिलांनी रोज प्रोबायोटिक्स घ्यावे का?

हो, महिलांसाठीही प्रोबायोटिक कॅप्सूल्स फायदेशीर ठरू शकतात. पण, प्रत्येक व्यक्तीचे शरीर आणि आरोग्याची स्थिती वेगवेगळी असते. त्यामुळे तुम्ही महिला असाल, तर प्रोबायोटिक कॅप्सूल्स घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले ठरेल.

4. दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात का?

दह्यासोबतच इतर अनेक खाद्यपदार्थांमध्ये प्रोबायोटिक्स आढळतात. दही, केफिर, खट्टी कोबी, यीस्ट, किमची आणि कोंबुचा यामध्ये प्रो बायोटिक्सचे प्रमाण चांगले असते.

5. प्री बायोटिक आणि प्रो बायोटिक म्हणजे काय?

प्री आणि प्रो बायोटिक मधील फरक अगदी सोप्या भाषेत समजून घ्यायचा असेल, तर प्रो बायोटिक्स हे शरीरात असणारे जिवंत सूक्ष्मजीव आहेत, जे शरीरावर फायदेशीर परिणाम करतात. हे सूक्ष्मजीव आपल्या शरीरात, विशेषतः आतड्यांमध्ये नेहमीच असतात आणि शरीराला अनेक आरोग्यविषयक फायदे मिळवून देतात. तर प्री बायोटिक्स हे खाद्यपदार्थांमध्ये आढळणारे घटक आहेत, जे आतड्यांमध्ये असलेल्या फायदेशीर बॅक्टेरिया किंवा सूक्ष्मजीवांसाठी अन्नाचे काम करतात. यामुळे या फायदेशीर सूक्ष्मजीवांना वाढण्यास आणि व्यवस्थित काम करण्यास मदत होते. आता हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. तुमच्या पोटात बॅक्टेरिया आणि यीस्ट यांसारखे अनेक प्रकारचे सूक्ष्मजीव असतात. हे सूक्ष्मजीव चांगले आणि वाईट अशा दोन्ही प्रकारचे असू शकतात. म्हणजेच, काही सूक्ष्मजीव तुमच्या शरीरासाठी फायदेशीर असतात, तर काही नुकसान सुद्धा करू शकतात. जे बॅक्टेरिया किंवा इतर सूक्ष्मजीव तुमच्या शरीरासाठी फायदेशीर असतात, त्यांना आपण प्रो बायोटिक जीव म्हणतो. आता या जीवांनाही व्यवस्थित काम करण्यासाठी आणि शरीराला सुरळीतपणे मदत करण्यासाठी अन्नाची गरज असते. त्यांना वाढण्यासाठी आणि त्यांची संख्या वाढवण्यासाठी त्यांना आपल्याप्रमाणेच अन्न आवश्यक असते. त्यांना आवश्यक असलेल्या या अन्नालाच आपण प्री बायोटिक म्हणतो. तर अशा प्रकारे, प्रो बायोटिक म्हणजे आतड्यांमध्ये असणारे फायदेशीर सूक्ष्मजीव आणि प्री बायोटिक म्हणजे त्यांचे अन्न आहे. आता तुम्हाला प्री आणि प्रो बायोटिक मधील फरक समजला असेल.

संदर्भ : 

Popular Posts

Collapsible content

Disclaimers

The claims and results mentioned are based on multiple internal studies and customer research surveys that Traya has conducted with a statistically significant sample size of users who were under expert observation and guidance.

93% saw results*

Traya conducted an internal study over both men and females facing hair fall and 93% saw results* after using the complete Traya customized plan consistently for a period of 5 months. This study was conducted in December 2022.

5-month money-back guarantee

Traya’s 100% money-back policy is valid only if you have been regular with the complete customized plan for a period of 5 whole consecutive months. Each customised hair kit is valid for only 30 days. If any individual has not seen any regrowth or control in hair fall, you can ask for a refund. However, once you apply for the 5-month - money-back policy, the team would then do a thorough check on consumer regularity based on every order date. An exception to this policy is for those customers undergoing serious health conditions like autoimmune diseases and cancer.

Traya’s Holistic 3 Science Formula

Traya’s 3 Science Formula is a synergistic mix of Ayurveda, Allopathy & Food Science designed specifically to cater to hair fall conditions stemming from multiple root causes. With clinically tested ingredients and adaptogenic herbs, Traya’s Science-Backed formula clears internal blockages and boosts hair regeneration naturally. When blended with a healing dietary plan, it delivers great results in attaining long-term hair growth.

Traya Free hair test (™)

Traya’s Hair Dx test is powered by a proprietary algorithm to examine a user's hair & health profile. With the help of a distinctive image-capturing technique & physician- formulated examination, it is able to precisely check the type, stage & root causes of a certain hair fall condition.

2 lakh+ Indians

Traya Free hair test (™) has been taken by more than 2 lakh+ Indians - Data acquired from Traya customers.

Ayush Certified - Digest Boost, Cholest Vati and Consti Clear are Ayush Certified Products.

Traya’s Ayurvedic Products are based on natural and Ayurvedic formulations. These are completely safe for human use, but it is possible that certain ingredients may cause allergic reactions to some individuals.

Accurate hair check

The Traya free hair test (™) is a proprietary algorithm developed with the help of our in-house hair experts that provides Accurate hair and health checks, provided you mention all the correct details about yourself. It gives a precise checks about the type, stage and root cause of a specific hair fall condition.

Long Lasting Visible Hair Results

Traya’s complete customized plan gives visible and long-lasting results provided you’re on Traya’s hair maintenance kit. Since Traya works on the internal root causes of hair fall and hence our customers have seen long lasting results

Trusted by 100+ Hair Experts

Traya has been tried and loved by over 100 hair experts all over India to maintain healthy hair growth.

Award Winning Trusted Brand

India’s Healthcare Excellence initiated by Brands Impact has awarded Traya as the Most Effective Haircare Product of the Year 2022

FDA approved ingredients

These are completely safe for human use, but it is possible that certain ingredients may cause allergic reactions to some individuals.

Traya Women Santulan (™)

Traya’s Women Santulan is a unique technology that uses a combination of herbs treated in a specific manner (kalpa) to meet the bio-specific needs of women going through different stages of life. Santulan is a supplementary range to Traya’s 3 Science Formula which balances and nourishes the body inside-out delivering long-lasting hair growth results and overall health.

Hair Growth Plan starts at Rs 1699 pm* - The price mentioned is for a male of age 23 with stage 1 type hair fall based on the results of the hair test taken on the website. Prices may vary for individual customers depending on the results of the hair test and internal root causes

Hair Growth Plan starts at Rs 2000 pm* - The price mentioned is for a male of age 25 with stage 1 type hair fall based on the results of the hair test taken on the website. Prices may vary for individual customers depending on the results of the hair test and internal root causes.