icon Skip to content

केस पातळ होण्याची कारणे आणि उपाय

Dr Kalyani Deshmukh

Dr Kalyani Deshmukh
Dr. Kalyani Deshmukh brings 7 years of experience in dermatology, specializing in the diagnosis of complex conditions and performing advanced dermatosurgical procedures. Her areas of expertise include clinical dermatology, trichology, dermatosurgery and aesthetic medicine.

केस पातळ होण्याची कारणे आणि उपाय

Quick Answer

केस पातळ दिसत असतील तर त्यामागे केस तुटणे, जास्त केसगळती होणे, पोषणाची कमतरता किंवा आनुवंशिक कारणे असू शकतात. केस दाट कसे करावे? याचा योग्य मार्ग कारण समजून घेण्यापासून सुरू होतो. संतुलित आहार, केसांची योग्य निगा आणि गरजेनुसार योग्य उपचार यामुळे केसांचे आरोग्य आणि घनता सुधारण्यास मदत होऊ शकते.


तुम्ही आरशात स्वतःकडे पाहताना तुमची आधीसारखी दाट वेणी आता थोडी विरळ झाल्याचे किंवा डोक्याची त्वचा पूर्वीपेक्षा जास्त दिसू लागल्याचे जाणवत असेल, तर हा बदल थोडा चिंताजनक वाटू शकतो. अशा वेळी सर्वात आधी मनात येते की नवीन तेल, शॅम्पू किंवा सप्लिमेंट वापरून पाहावे. केसांची घनता कशी वाढवावी, याचा विचार करताना मात्र केवळ प्रोडक्ट बदलणे पुरेसे नसते.

पण केस दाट कसे करावे? याचे योग्य उत्तर फक्त प्रोडक्ट बदलण्यात नाही, तर एका महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर समजून घेण्यात दडलेले आहे. तो म्हणजे ‘तुमचे केस पातळ का दिसत आहेत?’

काही लोकांचे केस जास्त गळत असल्यामुळे विरळ दिसू लागतात, काहींचे केस तुटत असतात, तर काही लोकांच्या केसांच्या मुळांमधून हळूहळू पातळ केसांची वाढ होऊ लागते. कारण समजून घेतल्यानंतरच योग्य उपाय निवडता येतो. त्यामुळे पातळ केस दाट करण्याचे उपाय करण्यापूर्वी केस पातळ होण्यामागचे कारण समजून घेणे महत्त्वाचे आहे.


केस पातळ होणे आणि केसांची संख्या कमी होणे यात काय फरक आहे?

केस पातळ दिसणे ही नेहमी एकसारखी सामान्य समस्या नसते. चला, हे समजून घेऊया:

काय होत आहे?

तुम्हाला काय दिसू शकते?

एकेक केस पातळ होणे

केस आधीपेक्षा बारीक आणि कमजोर वाटतात

केसांची संख्या कमी होणे

भांग रुंद होतो किंवा डोक्याची त्वचा जास्त दिसू लागते

केस तुटणे

छोटे-छोटे तुटलेले केस आणि वेगवेगळ्या लांबीचे केस दिसतात

जास्त केसगळती होणे

आंघोळ करताना, केस विंचरताना किंवा उशीवर नेहमीपेक्षा जास्त केस दिसतात

आनुवंशिक कारणांमुळे होणाऱ्या केसांच्या पातळपणात केसांची मुळे हळूहळू लहान होऊ शकतात आणि त्यातून वाढणारे केसही बारीक होत जातात. महिलांमध्ये याची सुरुवात अनेकदा रुंद होत जाणाऱ्या भांगातून, तर पुरुषांमध्ये मागे सरकणाऱ्या हेअरलाइनमधून किंवा डोक्याच्या वरच्या भागातील केस पातळ होण्यापासून दिसू शकते. अशा वेळी केसांची Density वाढवण्याचे उपाय निवडताना कारण लक्षात घेणे आवश्यक आहे.


केस पातळ होण्याची मुख्य कारणे कोणती आहेत?

पातळ केस घनदाट कसे करायचे? हे समजून घेण्यासाठी सर्वप्रथम त्यामागचे कारण जाणून घेणे गरजेचे आहे. केस दाट कसे करावे याचे उत्तरही याच कारणावर अवलंबून असते.

  • कुटुंबातून केस पातळ होण्याचा आलेला पॅटर्न

पुरुष आणि महिला दोघांमध्येही आनुवंशिक कारणांमुळे केस हळूहळू पातळ होऊ शकतात. यामध्ये कालांतराने केसांची मुळे लहान होऊ लागतात. उपचार न मिळाल्यास केसांचा पातळपणा वाढत जाऊ शकतो, त्यामुळे ही समस्या लवकर ओळखणे फायदेशीर ठरते.

  • आहारातून पुरेसे पोषण न मिळणे

शरीराला पुरेसे प्रोटीन किंवा आयरन न मिळाल्यास केस जास्त गळू शकतात. खूप कमी कॅलरी असलेला आहार घेतल्यानेही केसांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे केसांवर तुम्ही काय लावत आहात? हे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच रोजच्या आहारातून तुम्हाला काय मिळत आहे? हेही महत्त्वाचे आहे. योग्य पोषणाकडे लक्ष देणे हा पातळ केसांसाठी उपाय करण्याचा महत्त्वाचा भाग आहे.

  • ताणतणाव, आजार किंवा शरीरात झालेला मोठा बदल

जास्त ताप येणे, मोठा आजार होणे, झपाट्याने वजन कमी होणे किंवा बाळाच्या जन्मानंतर काही महिलांमध्ये अचानक जास्त केसगळती होऊ शकते. याला टेलोजन एफ्लुवियम (telogen effluvium) असे म्हणतात. अनेक प्रकरणांमध्ये मूळ कारण दूर झाल्यानंतर ही स्थिती हळूहळू सुधारू शकते.

  • केसांवर कठोर कृती करणे

वारंवार केसांना जास्त उष्णता देणे, खूप घट्ट वेणी किंवा अंबाडा बांधणे, ओले केस घासणे आणि जोरात केस विंचरणे यामुळे केस तुटण्याचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे केसांची संख्या प्रत्यक्षात कमी झाली नसली तरी ते विरळ आणि पातळ दिसू शकतात.

पातळ केस घनदाट कसे करायचे?

प्रत्येक व्यक्तीसाठी एकच उपाय उपयोगी ठरेल असे नाही. पातळ केस दाट करण्याचे उपाय म्हणजे जे तुमच्या केस पातळ होण्यामागच्या मूळ कारणावर काम करतात. केस दाट कसे करावे याचा विचार करताना आहार, केसांची निगा आणि गरजेनुसार उपचार या सर्व गोष्टींकडे लक्ष द्यावे.

आहारात केसांसाठी आवश्यक पोषणाचा समावेश करा

दररोज पुरेशा प्रमाणात प्रोटीन घेण्याकडे लक्ष द्या. डाळी, पनीर, अंडी, दूध, सोया, मासे किंवा तुमच्या आवडीचे इतर प्रोटीनयुक्त खाद्यपदार्थ आहारात समाविष्ट करू शकता. आयरनसाठी हिरव्या पालेभाज्या, डाळी आणि आयरनयुक्त इतर खाद्यपदार्थ मदत करू शकतात. संतुलित आहार हा केसांची Density वाढवण्याचे उपाय यामधील एक महत्त्वाचा भाग आहे.

केस तुटणे कमी करा

या छोट्या सवयींपासून सुरुवात करू शकता:

  • सौम्य शॅम्पू वापरा.

  • प्रत्येक वेळी शॅम्पू केल्यानंतर कंडिशनर लावा.

  • ओले केस टॉवेलने जोरात घासू नका.

  • स्ट्रेटनर (straightener), कर्लर (curler) आणि खूप गरम ड्रायरचा वापर कमी करा.

  • केस खूप घट्ट बांधणाऱ्या हेअरस्टाइल्स टाळा.

  • केस विंचरताना ते ओढले जाणार नाहीत याची काळजी घ्या.

जर केस पातळ होण्यामागे आनुवंशिक कारण असेल, तर योग्य उपचार घ्या

आनुवंशिक कारणांमुळे केस पातळ होत असतील, तर फक्त तेल किंवा हेअर मास्क लावणे पुरेसे ठरत नाहीत. मिनॉक्सिडिल (minoxidil) सारखे प्रमाणित उपचार केसांची वाढ टिकवून ठेवण्यास आणि पुढील समस्या कमी करण्यास मदत करू शकतात. याचा परिणाम दिसण्यासाठी काही महिने लागू शकतात आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याचा वापर करणे जास्त योग्य आहे.

याच कारणामुळे केसांची घनता कशी वाढवावी किंवा केस पातळ होणे कसे कमी करावे, याचे उत्तर कोणत्याही एका घरगुती उपायात मिळत नाही. आनुवंशिक कारण असल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य उपचार घेणे महत्त्वाचे ठरू शकते.

केस खरोखरच जाड करता येतात का?

तुम्हाला केस दाट कसे करावे? हे जाणून घ्यायचे असेल, तर इथे दोन गोष्टींमधील फरक समजून घेणे गरजेचे आहे.


तुमच्या प्रत्येक केसाची नैसर्गिक जाडी ही कुटुंबातून मिळालेल्या गुणधर्मांवर जास्त प्रमाणात अवलंबून असते. शॅम्पू, तेल किंवा हेअर मास्क केसांच्या मुळांना कायमस्वरूपी जाड करू शकत नाहीत.

पण, एखाद्या आजारामुळे, पोषणाच्या कमतरतेमुळे किंवा आनुवंशिक कारणांमुळे केस पातळ होत असतील, तर त्यामागच्या योग्य कारणावर उपचार केल्याने केसांचा पातळपणा कमी होण्यास आणि काही लोकांमध्ये केसांची जाडी सुधारण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे पातळ केसांसाठी उपाय निवडताना केवळ केसांचा बाह्य पोत सुधारण्याऐवजी मूळ कारणावर लक्ष देणे महत्त्वाचे आहे.

तेल आणि घरगुती उपायांनी केस घनदाट होऊ शकतात का?

तेल केस मऊ ठेवण्यास आणि कोरडेपणा कमी करण्यास मदत करू शकते. पण, फक्त तेल लावल्याने केसांची नवीन मुळे तयार होत नाहीत. त्याचप्रमाणे कांदा, अंडे, कोरफड किंवा इतर घरगुती उपाय सुद्धा प्रत्येक प्रकारच्या केस पातळ होण्याच्या समस्येवर हमखास उपचार मानता येत नाही.

केस दाट करण्यासाठी घरगुती उपाय करताना हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, त्यांचा परिणाम प्रत्येक व्यक्तीमध्ये सारखा असेलच असे नाही. हे उपाय केसांची निगा राखण्याचा एक भाग असू शकतात; मात्र केसगळतीचे मूळ कारण असल्यास त्यासाठी वेगळ्या उपचारांची गरज लागू शकते.

या उपायांचा वापर केल्याने केस जास्त चांगले वाटत असतील, तर ते केसांची काळजी घेण्याचा एक भाग असू शकतात. पण, केस पातळ होण्यामागच्या मूळ कारणावर वेगळ्या पद्धतीने उपचार करावे लागू शकतात.

केस दाट करण्यासाठी घरगुती उपाय निवडताना टाळूची स्थिती आणि केसांचा प्रकारही लक्षात घ्या. कोणत्याही उपायामुळे खाज, जळजळ किंवा लालसरपणा जाणवत असल्यास तो उपाय थांबवणे योग्य आहे.

समस्येबाबत डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

पुढीलपैकी काही लक्षणे जाणवत असतील, तर त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे जास्त योग्य ठरेल:

  • केस अचानक खूप जास्त पातळ होऊ लागले असतील

  • डोक्यावर गोलाकार रिकामी जागा दिसत असेल

  • भांग झपाट्याने रुंदावत असेल

  • हेअरलाइन सतत मागे सरकत असेल

  • डोक्याच्या त्वचेवर दुखत असेल, लालसरपणा किंवा खूप खाज येत असेल

  • अनेक महिन्यांपासून ही समस्या सतत वाढत असेल

केस पातळ होण्यामागचे कारण जितक्या लवकर समजते, तितक्या लवकर योग्य उपचार सुरू करण्याची संधी अधिक चांगली असते. त्यामुळे केसांची Density वाढवण्याचे उपाय सुरू करण्याआधी गरज असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.

निष्कर्ष

केस घनदाट करण्याची सुरुवात कोणत्याही एका तेलाने, शॅम्पूने किंवा सप्लिमेंटने होत नाही. सर्वात आधी हे समजून घ्या की तुमचे केस तुटत आहेत, जास्त गळत आहेत की केसांच्या मुळांमधून हळूहळू पातळ केस वाढू लागले आहेत.

पौष्टिक आहार, केसांची सौम्य निगा आणि गरज असल्यास योग्य उपचार करणे हे एकत्रितपणे चांगले परिणाम देऊ शकतात. पातळ केस दाट करण्याचे उपाय करताना समस्येच्या मूळ कारणाकडे दुर्लक्ष करू नका.

केस सतत पातळ होत आहेत? Traya ची फ्री हेअर टेस्ट घ्या आणि तुमच्या केसांना नेमकी कोणत्या प्रकारच्या मदतीची गरज आहे, हे जाणून घ्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

1. केस घनदाट कसे करायचे?

केस दाट कसे करावे यासाठी सर्वात आधी केस पातळ होण्यामागचे कारण समजून घ्या. पुरेशा प्रमाणात प्रोटीन आणि आयरन घ्या. केस तुटणे कमी करा आणि केस आनुवंशिक कारणांमुळे पातळ होत असतील किंवा आरोग्याशी संबंधित काही समस्या असेल, तर योग्य उपचार घ्या. गरजेनुसार केस दाट करण्यासाठी घरगुती उपाय देखील केसांच्या निगेचा एक भाग म्हणून वापरता येऊ शकतात.

2. पातळ केस घनदाट होण्यासाठी किती वेळ लागतो?

हे केस पातळ होण्याच्या कारणावर आणि उपचारांवर अवलंबून असते. केसांची वाढ हळूहळू होते, त्यामुळे बदल दिसून येण्यासाठी काही महिने लागू शकतात. काही उपचारांमध्ये सहा महिने किंवा त्याहून जास्त वेळ लागू शकतो.

3. केसांची वाढ कशी वाढवायची?

संतुलित आहार, पुरेशा प्रमाणात प्रोटीन, केसांची सौम्य निगा आणि केस पातळ होण्यामागच्या योग्य कारणावर उपचार करणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. गरज नसताना सप्लिमेंट्स किंवा घरगुती उपायांवर अवलंबून राहणे टाळा. केसांची घनता कशी वाढवावी याचा विचार करताना केसगळतीचे कारण समजून घेणे हा पहिला टप्पा असतो.

4. पातळ केसांसाठी कोणते उपाय करता येतात?

केस तुटणे कमी करण्यासाठी सौम्य शॅम्पू आणि कंडिशनर वापरणे, हीट स्टायलिंग कमी करणे, केस घट्ट न बांधणे आणि संतुलित आहार घेणे यांसारख्या सवयी उपयोगी ठरू शकतात. यासोबतच पातळ केसांसाठी उपाय निवडताना केस पातळ होण्यामागचे कारण लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

5. घरगुती उपायांनी केस दाट करता येतात का?

तेल, कांदा, अंडे किंवा कोरफड यांसारखे उपाय केसांच्या निगेसाठी वापरले जाऊ शकतात. मात्र, केस दाट करण्यासाठी घरगुती उपाय प्रत्येक व्यक्तीमध्ये किंवा प्रत्येक प्रकारच्या केसगळतीमध्ये समान परिणाम देतीलच असे नाही. केस सतत पातळ होत असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य आहे.

6. केसांची घनता वाढवण्यासाठी काय करावे?

पुरेसे प्रोटीन आणि आयरन असलेला संतुलित आहार घेणे, केस तुटणे कमी करणे आणि गरज असल्यास योग्य वैद्यकीय उपचार घेणे महत्त्वाचे आहे. केसांची Density वाढवण्याचे उपाय निवडताना तुमच्या केसांची समस्या नेमकी कशामुळे होत आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे.


संदर्भ : 

  1. American Academy of Dermatology Association. Hair Loss: Who Gets and Causes. American Academy of Dermatology. aad.org

  2. American Academy of Dermatology Association. Hair Loss: Tips for Managing. American Academy of Dermatology. aad.org

  3. American Academy of Dermatology Association. Hair Loss: Diagnosis and Treatment. American Academy of Dermatology. aad.org

  4. Asghar, F., et al. (2020). Female Pattern Hair Loss: An Update. Indian Dermatology Online Journal, 11(4), 493–501. DOI: 10.4103/idoj.IDOJ_334_19. pubmed.ncbi.nlm.nih.gov

  5. Rebora, A. (2021). Telogen Effluvium: A Review of the Science and Current Obstacles. Journal of Dermatological Science. DOI: 10.1016/j.jdermsci.2021.01.007. pubmed.ncbi.nlm.nih.gov

 

Read More Blogs

केसांची चांगली वाढ होण्यासाठी काय करावे? केसांच्या वाढीसाठी प्रभावी उपाय

केसांची चांगली वाढ होण्यासाठी काय करावे? केसांच्या वाढीसाठी प्रभावी उपाय

Quick Answer नवीन केस उगवण्यासाठी सर्वात आधी केस गळण्यामागचे कारण ओळखणे गरजेचे आहे....

नवीन केस उगवण्यासाठी कोणते तेल सर्वोत्तम आहे? टक्कल पडण्यावर उपाय काय?

नवीन केस उगवण्यासाठी कोणते तेल सर्वोत्तम आहे? टक्कल पडण्यावर उपाय काय?

Quick Answer रोझमेरी, पेपरमिंट, आवळा आणि भृंगराज यांसारखे तेलाचे प्रकार टाळूला पोषण...

केस जास्त गळत असतील तर काय करावे? जाणून घ्या केसगळती थांबवण्याचे प्रभावी उपाय

केस जास्त गळत असतील तर काय करावे? जाणून घ्या केसगळती थांबवण्याचे प्रभावी उपाय

Quick Answer जर तुमचे केस जास्त गळत असतील, तर सर्वात आधी केसगळती होण्यामागचे मूळ का...

कमी वयात केस पांढरे होण्याची कारणे आणि उपाय

कमी वयात केस पांढरे होण्याची कारणे आणि उपाय

Quick Answer वयाच्या 21 ते 25 व्या वर्षी केस पांढरे होण्यामागे अनुवंशिकता, पोषणाची ...

Popular Posts

Collapsible content

Disclaimers

The claims and results mentioned are based on multiple internal studies and customer research surveys that Traya has conducted with a statistically significant sample size of users who were under expert observation and guidance.

93% saw results*

Traya conducted an internal study over both men and females facing hair fall and 93% saw results* after using the complete Traya customized plan consistently for a period of 5 months. This study was conducted in December 2022.

5-month money-back guarantee

Traya’s 100% money-back policy is valid only if you have been regular with the complete customized plan for a period of 5 whole consecutive months. Each customised hair kit is valid for only 30 days. If any individual has not seen any regrowth or control in hair fall, you can ask for a refund. However, once you apply for the 5-month - money-back policy, the team would then do a thorough check on consumer regularity based on every order date. An exception to this policy is for those customers undergoing serious health conditions like autoimmune diseases and cancer.

Traya’s Holistic 3 Science Formula

Traya’s 3 Science Formula is a synergistic mix of Ayurveda, Allopathy & Food Science designed specifically to cater to hair fall conditions stemming from multiple root causes. With clinically tested ingredients and adaptogenic herbs, Traya’s Science-Backed formula clears internal blockages and boosts hair regeneration naturally. When blended with a healing dietary plan, it delivers great results in attaining long-term hair growth.

Traya Free hair test (™)

Traya’s Hair Dx test is powered by a proprietary algorithm to examine a user's hair & health profile. With the help of a distinctive image-capturing technique & physician- formulated examination, it is able to precisely check the type, stage & root causes of a certain hair fall condition.

2 lakh+ Indians

Traya Free hair test (™) has been taken by more than 2 lakh+ Indians - Data acquired from Traya customers.

Ayush Certified - Digest Boost, Cholest Vati and Consti Clear are Ayush Certified Products.

Traya’s Ayurvedic Products are based on natural and Ayurvedic formulations. These are completely safe for human use, but it is possible that certain ingredients may cause allergic reactions to some individuals.

Accurate hair check

The Traya free hair test (™) is a proprietary algorithm developed with the help of our in-house hair experts that provides Accurate hair and health checks, provided you mention all the correct details about yourself. It gives a precise checks about the type, stage and root cause of a specific hair fall condition.

Long Lasting Visible Hair Results

Traya’s complete customized plan gives visible and long-lasting results provided you’re on Traya’s hair maintenance kit. Since Traya works on the internal root causes of hair fall and hence our customers have seen long lasting results

Trusted by 100+ Hair Experts

Traya has been tried and loved by over 100 hair experts all over India to maintain healthy hair growth.

Award Winning Trusted Brand

India’s Healthcare Excellence initiated by Brands Impact has awarded Traya as the Most Effective Haircare Product of the Year 2022

FDA approved ingredients

These are completely safe for human use, but it is possible that certain ingredients may cause allergic reactions to some individuals.

Traya Women Santulan (™)

Traya’s Women Santulan is a unique technology that uses a combination of herbs treated in a specific manner (kalpa) to meet the bio-specific needs of women going through different stages of life. Santulan is a supplementary range to Traya’s 3 Science Formula which balances and nourishes the body inside-out delivering long-lasting hair growth results and overall health.

Hair Growth Plan starts at Rs 1699 pm* - The price mentioned is for a male of age 23 with stage 1 type hair fall based on the results of the hair test taken on the website. Prices may vary for individual customers depending on the results of the hair test and internal root causes

Hair Growth Plan starts at Rs 2000 pm* - The price mentioned is for a male of age 25 with stage 1 type hair fall based on the results of the hair test taken on the website. Prices may vary for individual customers depending on the results of the hair test and internal root causes.