Quick Answer
मेथी केस मऊ ठेवण्यास, केसांचा गुंता आणि केस तुटणे कमी करण्यास मदत करू शकते. केसांसाठी मेथीचे फायदे प्रामुख्याने केस मऊ ठेवणे आणि टाळूची काळजी घेणे यापुरते मर्यादित आहेत. पण, केसांची वाढ वेगाने होण्यासाठी मेथी प्रभावी असल्याचे ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. केसांना मेथी कशी लावावी, हे समजून घेण्यासोबतच ॲलर्जी होण्याची शक्यता लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. केसगळती सतत होत असेल, तर फक्त मेथीवर अवलंबून न राहता त्यामागचे कारण ओळखणे गरजेचे आहे.
केस जास्त गळत असतील, केस कोरडे वाटत असतील किंवा डोक्यात कोंडा असेल, तर घरात खूप वेळा एक सल्ला दिला जातो, “मेथी भिजवून केसांना लावा.” पण केसांसाठी मेथी खरोखरच जितकी प्रभावी मानली जाते, तितकी ती आहे का?
केसांची काळजी घेण्यासाठी घरगुती उपाय म्हणून मेथीचा वापर दीर्घकाळापासून केला जात आहे. मेथीमुळे केस मऊ वाटण्यास आणि टाळूची काळजी घेण्यास मदत होऊ शकते. मात्र, केस वाढीसाठी मेथी प्रभावी ठरते, याचे माणसांवर झालेल्या ठोस संशोधनाचे पुरावे अजूनही मर्यादित आहेत. तसेच, नैसर्गिक असली तरी काही लोकांना मेथीमुळे ॲलर्जी होऊ शकते.
केसांमध्ये मेथी लावण्याचे फायदे काय आहेत?
केसांसाठी मेथीचे फायदे प्रामुख्याने केस आणि टाळूच्या काळजीशी संबंधित आहेत. मेथीला नवीन केस उगवण्यासाठीचा हमखास उपचार मानू नये. केसांसाठी मेथीचे उपयोग समजून घेताना तिच्याकडून नेमक्या कोणत्या परिणामांची अपेक्षा ठेवता येते, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
१. कोरडे केस मऊ वाटण्यास मदत करू शकते
भिजवलेली मेथी वाटल्यावर तिचा गुळगुळीत असा लेप तयार होतो. हा लेप केसांच्या लांबीवर लावला तर केस काही प्रमाणात मऊ आणि सहज हाताळता येण्यासारखे वाटू शकतात.
केसांचा गुंता कमी होत असेल, तर ते सोडवताना केसांवर येणारा ताण आणि केस तुटणे सुद्धा कमी होऊ शकते. मात्र, हा परिणाम केसांच्या बाहेरील काळजीशी संबंधित आहे, केसांची नवीन मुळे तयार होण्याशी नाही.
२. टाळूच्या काळजीसाठी वापरता येऊ शकते
मेथीचा लेप पारंपरिक पद्धतीने कोरड्या किंवा अस्वस्थ वाटणाऱ्या टाळूवरही लावला जातो. केसांसाठी मेथीचे उपयोग करताना टाळूची स्थिती लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. टाळूला सतत खाज येत असेल, लालसरपणा किंवा जाड थर दिसत असेल, तर फक्त घरगुती उपायांवर अवलंबून राहू नये.
कोंड्यासाठी त्वचारोगतज्ज्ञ झिंक पायरिथिओन (zinc pyrithione), सॅलिसिलिक ॲसिड (salicylic acid), सेलेनियम सल्फाइड (selenium sulphide) किंवा कीटोकोनाझोल (ketoconazole) यांसारखे घटक असलेल्या अँटी डँड्रफ शॅम्पू (anti-dandruff shampoo) वापरण्याचा सल्ला देतात.
३. तुटणाऱ्या केसांसाठी पूरक काळजी घेण्यास मदत होऊ शकते
केस खूप कोरडे आणि गुंतलेले असतील, तर ही पद्धत ते सहज सोडवण्यास मदत करण्यास आणि त्यामुळे केस तुटणे कमी करण्यास उपयोगी ठरू शकते.
त्यामुळे केसांसाठी मेथीचे फायदे हे मुख्यतः केसांच्या काळजीशी जोडणे जास्त योग्य आहे. केस गळण्यासाठी मेथी वापरली जाते म्हणून प्रत्येक प्रकारची केसगळती थांबेल, असे मानणे योग्य नाही.
मेथीमुळे केसांची वाढ खरोखर होते का?
याच ठिकाणी तुम्ही याबद्दल योग्य अपेक्षा ठेवणे महत्त्वाचे आहे.
मेथी आणि केसांशी संबंधित काही छोटे आणि सुरुवातीच्या टप्प्यातील अभ्यास उपलब्ध आहेत. मात्र, घरी तयार केलेला मेथीचा लेप लावल्याने नवीन केस वेगाने उगवू लागतात, असे सिद्ध करणारे ठोस पुरावे अजूनही उपलब्ध नाहीत. त्यामुळे केस वाढीसाठी मेथी वापरताना तिच्याकडे हमखास उपचार म्हणून पाहू नये.
केसगळतीची अनेक कारणे असू शकतात, जसे की:
-
कुटुंबातून मिळणारी केस पातळ होण्याची समस्या
-
आयरन किंवा प्रोटीन्सची कमतरता
-
थायरॉइडची समस्या
-
ताणतणाव किंवा आजारपणानंतर जास्त केसगळती होणे
-
टाळूचा आजार
-
केस सतत घट्ट बांधणे
अमेरिकन ॲकॅडमी ऑफ डर्मेटोलॉजीच्या मते, केसगळतीवरील योग्य उपचार त्यामागील कारणावर अवलंबून असतात. पोषक तत्त्वांची कमतरता भरून काढल्यानंतर केस पुन्हा उगवू शकतात, तर केसगळतीच्या इतर प्रकारांमध्ये दुसऱ्या उपचारांची गरज भासू शकते.
त्यामुळे मेथीचा वापर पूरक घरगुती काळजी म्हणून करा; पण, तिला प्रमाणित केसांच्या वाढीवरील उपचारांचा पर्याय मानू नका.
केसांना मेथी कशी लावावी?
तुम्ही पहिल्यांदाच मेथीचा वापर करत असाल, तर केसांना मेथी कशी लावावी, याची पद्धत सोपी ठेवा. त्यामध्ये अनेक पदार्थ मिसळण्याची गरज नाही.
मेथीचा साधा लेप
१. एक ते दोन चमचे मेथीचे दाणे पाण्यात भिजत ठेवा.
२. दाणे मऊ झाल्यानंतर ते बारीक वाटून घ्या.
३. लेप खूप घट्ट वाटत असेल, तर त्यात थोडे पाणी मिसळा.
४. सर्वात आधी हा लेप त्वचेच्या छोट्या भागावर थोड्या प्रमाणात लावून पाहा.
५. जळजळ किंवा खाज येत नसेल, तर लेप हलक्या हाताने टाळूवर आणि केसांच्या लांबीवर लावा.
६. लेप पूर्णपणे वाळून खूप कडक होण्यापूर्वी केस आणि टाळू स्वच्छ धुवा.
केसांना मेथी कशी लावावी, यासाठी प्रत्येक व्यक्तीने एकाच ठरावीक पद्धतीने कृती करणे आवश्यक नाही. मेथी रात्रभर केसांना लावून ठेवणे किंवा आठवड्यातून अनेक वेळा वापरणे सुद्धा आवश्यक नाही.
केस खूप कोरडे असतील, तर मेथीचा लेप थोड्या खोबरेल तेलासोबत वापरता येऊ शकतो. मेथीचा हेअर मास्क तयार करताना त्यात लिंबू किंवा अनेक तीव्र पदार्थ एकाच वेळी मिसळणे टाळा, विशेषतः तुमची त्वचा संवेदनशील असेल तर असे करणे टाळा.
मेथी लावण्याचे कोणते नुकसान होऊ शकते?
मेथी ही स्वयंपाकघरात वापरली जाणारी सामान्य गोष्ट आहे. पण, काही लोकांना मेथीची ॲलर्जी होऊ शकते. त्यामुळे केसांसाठी मेथीचे उपयोग करताना संभाव्य त्रासाचीही माहिती असणे गरजेचे आहे.
खाज, लालसरपणा किंवा जळजळ होऊ शकते
कोणताही घरगुती लेप संवेदनशील टाळूवर लावल्यास खाज किंवा जळजळ होऊ शकते. टाळूवर लावल्या जाणाऱ्या अनेक प्रकारच्या उत्पादनांमुळे ॲलर्जी असलेल्या त्वचेला त्रास होऊ शकतो. यामध्ये खाज आणि जळजळ यांसारखी लक्षणे दिसू शकतात.
गंभीर ॲलर्जीची प्रतिक्रियाही होऊ शकते
एका प्रकाशित झालेल्या घटनेत, कोंड्यासाठी डोक्यावर मेथीचा लेप लावल्यानंतर एका महिलेला चेहऱ्यावर सूज आली आणि श्वास घेताना घरघर होऊ लागली. अशी गंभीर प्रतिक्रिया सामान्य नाही. पण, यावरून हे स्पष्ट होते की “नैसर्गिक” म्हणजे नेहमी ॲलर्जीपासून मुक्त असेलच असे नाही.
शेंगदाण्याची ॲलर्जी असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी
मेथी आणि शेंगदाण्यातील काही प्रोटीन्समध्ये परस्पर प्रतिक्रिया दिसून आली आहे. तुम्हाला शेंगदाण्याची तीव्र ॲलर्जी असल्यास, मेथीचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे जास्त योग्य ठरेल.
केसगळती होत असेल, तर फक्त मेथी लावणे पुरेसे आहे का?
कधीतरी मेथी लावल्यानंतर तुमचे केस मऊ वाटत असतील, तर तुम्ही ती केसांच्या नेहमीच्या काळजीचा एक भाग म्हणून वापरू शकता. पण, अनेक महिन्यांपासून केसगळती होत असेल, केसांचा भांग रुंदावत असेल किंवा पोनीटेलचा घेर कमी होत असेल, तर फक्त वेगवेगळे घरगुती लेप लावत राहणे पुरेसे नाही.
आयरन किंवा प्रोटीन्सची कमतरता सुद्धा केसगळतीचे कारण ठरू शकते. पण, तपासणी न करता पूरक आहार घेतल्याने फायदा होईलच असे नाही. उलट, काही पोषक तत्त्वे गरजेपेक्षा जास्त प्रमाणात घेतल्यास केसगळती वाढू शकते. केस गळण्यासाठी मेथी वापरण्यापूर्वी केसगळतीचे कारण समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत वेगवेगळे घरगुती उपाय करण्याऐवजी तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरू शकते.
अशा परिस्थितीत केसगळतीमागचे खरे कारण समजून घेणे जास्त महत्त्वाचे आहे. ट्रायाची मोफत हेअर टेस्ट तुमच्या आहार, ताणतणाव, टाळू आणि केसगळतीच्या पद्धतीशी संबंधित प्रश्नांच्या माध्यमातून सुरुवात करण्यास मदत करू शकते.
निष्कर्ष
मेथी केस मऊ ठेवण्यासाठी आणि केसांच्या घरगुती काळजीचा एक भाग म्हणून उपयोगी ठरू शकते. केसांसाठी मेथीचे फायदे समजून घेताना तिच्याकडून अतिशयोक्तीपूर्ण परिणामांची अपेक्षा न ठेवणे महत्त्वाचे आहे. यामुळे नवीन केस उगवतात किंवा प्रत्येक प्रकारची केसगळती थांबते, याचे ठोस पुरावे उपलब्ध नाहीत.
तसेच, मेथी लावण्याचे नुकसान याकडेही दुर्लक्ष करू नका. संवेदनशील त्वचा असलेल्या किंवा ॲलर्जीची समस्या असलेल्या लोकांना यामुळे त्रास होऊ शकतो. केस गळण्यासाठी मेथी वापरायची असल्यास, केसगळतीमागचे खरे कारण समजून घेणे जास्त महत्त्वाचे आहे.
केसगळती होत आहे आणि त्यामागचे कारण पोषणाची कमतरता, ताणतणाव की टाळूची समस्या आहे, हे समजत नाहीये? मग ट्रायाची मोफत हेअर टेस्ट घ्या आणि तुमच्या केसांच्या समस्येमागचे खरे कारण समजून घ्या.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
१. केसांना मेथी लावण्याचे फायदे काय आहेत?
मेथीचा लेप केसांना मऊ आणि सहज हाताळता येण्यासारखे बनवू शकतो. टाळूच्या काळजीसाठी सुद्धा मेथीचा पारंपरिक पद्धतीने वापर केला जातो. पण, केसांची वाढ होण्यासाठी मेथी प्रभावी असल्याचे पुरावे मर्यादित आहेत.
२. केसांना मेथी कशी लावावी?
मेथीचे दाणे भिजवून त्याचा बारीक लेप तयार करा आणि सुरुवातीला थोड्या प्रमाणात वापरा. खाज किंवा जळजळ होत नसेल, तर हा लेप केस आणि टाळूवर लावा आणि त्यानंतर केस व टाळू व्यवस्थित धुवा.
३. मेथीमुळे केसांची वाढ होते का?
मेथी आणि केसांची वाढ यासंदर्भात माणसावर झालेल्या संशोधनाचे ठोस पुरावे अजूनही पुरेसे उपलब्ध नाहीत. त्यामुळे मेथीचा वापर केसांच्या काळजीचा एक भाग म्हणून करता येऊ शकतो. पण, तिला प्रमाणित उपचारांचा पर्याय मानू नये.
संदर्भ :
-
Patil, S. P., Niphadkar, P. V., & Bapat, M. M. (1997). Allergy to Fenugreek (Trigonella foenum graecum). Annals of Allergy, Asthma & Immunology, 78(3), 297–300. DOI: 10.1016/S1081-1206(10)63185-7. PubMed
-
Takei, M., et al. (2024). Fenugreek Allergy Caused by Cross-Reactivity with Peanut: An In Vitro Analysis. Journal of Allergy and Clinical Immunology Global, 3(3), 100292. DOI: 10.1016/j.jacig.2024.100292.PubMed
-
American Academy of Dermatology Association. How to Treat Dandruff.Read the article
-
American Academy of Dermatology Association. Hair Loss: Who Gets and Causes. Read the article
-
American Academy of Dermatology Association. Hair Loss: Tips for Managing. Read the article
Read More Blogs
टक्कल पडल्यानंतर केस कसे उगवावे? (Hair Regrowth kashi karavi)
Quick Answer टक्कल पडल्यानंतर लवकर केस उगवण्यासाठी सर्वात आधी टक्कल पडण्याची अवस्था आण...
पातळ केस दाट करण्यासाठी घरगुती उपाय, डाएट आणि व्हिटॅमिन्स
Quick Answer पातळ केस दाट कसे करावे? यासाठी फक्त घरगुती उपायांवर अवलंबून राहणे पुरे...
घरच्या घरी केस गळणे कसे थांबवावे? जाणून घ्या १३ सोपे उपाय
Quick Answer घरच्या घरी केस गळणे कसे थांबवावे? यासाठी प्रोटीन, व्हिटॅमिन्स आणि मिनर...
केसगळती थांबवणारा शॅम्पू : योग्य निवड आणि वापराबद्दल संपूर्ण माहिती
Quick Answer केसांशी संबंधित कोणतीही समस्या आली की, आपण सर्वात आधी शॅम्पू आणि तेलाक...





























